ETV Bharat / technology

इंस्टाग्रामची सेवा ठप्प, ॲप होतय लॉग आऊट - INSTAGRAM DOWN

Instagram Down : Instagram ॲप्लिकेशन अचानक डाऊन झाल्यामुळं अनेक यूजर्संनी तक्रारी केल्या आहेत. downdetector.in या वेबसाइटनेही Instagram डाऊन असल्याची माहिती दिली आहे.

Instagram Down
इंस्टाग्राम (Etv Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Oct 8, 2024, 2:25 PM IST

हैदराबाद Instagram Down : लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram ची सेवा आज पुन्हा एकदा ठप्प झाली. ॲप्लिकेशन अचानक डाऊन झाल्यामुळं अनेक यूजर्स ॲप वापरू शकत नाहीत. सोशल मीडिया आणि वेगवेगळ्या वेबसाइट्सचा आउटेज तपासणारी वेबसाइट डाउनडिटेक्टरवरही लोकांनी इंस्टाग्राम डाऊन असल्याची तक्रार केली आहे. हजारो युजर्सनी इंस्टाग्राम डाऊन डिटेक्टरवर असल्याच्या तक्रारी केल्या.

पोस्ट करता येत नाही : रिपोर्टनुसार, यूजर्सना स्मार्टफोन आणि वेब फॉरमॅटमध्ये ॲप्लिकेशन वापरताना समस्या येत आहेत. मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X वर, वापरकर्त्यांनी इंस्टाग्राम डाउन झाल्याची तक्रार देखील केली. वापरकर्ते म्हणतात, कोणतेही रील किंवा पोस्ट ओपन होत नाही. वापरकर्त्यांनी समस्यांबद्दल तक्रार देखील केली. इंस्टाग्रामचे वेब वापरकर्ते ऍप्लिकेशन उघडत असतात, तेव्हा त्यांना डिस्प्लेवर “सॉरी, समथिंग वेंट राँग” लिहिलेलं दिसतंय.

हँग होण्याची तक्रार : दुसरीकडं, अनेक वापरकर्त्यांचं म्हणणे आहे की त्यांचं इंस्टाग्राम चालू आहे. परंतु त्यांना दरम्यान हँग होण्यासारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. तथापि, या आउटेजबद्दल इंस्टाग्राम आणि त्याची मूळ कंपनी मेटा यांनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली केलेली नाही. इंस्टाग्राम डाऊन होताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडतोय.

स्वयंचलितपणे लॉग आउट : Downdetector वर सुमारे एक हजार युजर्सनी इंस्टाग्राम डाऊन झाल्याची तक्रार केली. इंस्टाग्राम आउटेजची ही समस्या दुपारी 12 च्या सुमारास कायम होती. वापरकर्त्यांनी त्यांच्या तक्रारीत लिहिलंय, इंस्टाग्राम वापरता येत नाहीय. वापरकर्त्यांनी मोठ्या संख्येनं ऍप्लिकेशन्स स्वयंचलितपणे लॉग आउट होत असल्याचं म्हटलं आहे.

हे वाचलंत का :

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.