हैदराबाद Infinix ZERO Flip 5G : गेल्या काही वर्षांत स्मार्टफोन मार्केटमध्ये फ्लिप तसंच फोल्डेबल स्मार्टफोनची क्रेझ झपाट्यानं वाढलीय. सॅमसंग, मोटोरोला, टेक्नो, विवो अशा अनेक ब्रँडनं फोल्डेबल स्मार्टफोन सादर केले आहेत. आता या यादीत आणखी एका स्मार्टफोन निर्माता कंपनीचं नाव जोडलं जाणार आहे. Infinix लवकरच भारतात आपला पहिला फ्लिप स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. Infinix च्या आगामी फ्लिप फोनचं नाव Infinix ZERO Flip 5G आहे.
Infinix ZERO Flip 5G लाँच : Infinix 17 ऑक्टोबर रोजी भारतीय बाजारात Infinix ZERO Flip 5G लाँच करणार आहे. सध्या, सॅमसंग आणि मोटोरोला फ्लिप आणि फोल्डेबल फोनच्या बाजारपेठेत वर्चस्व गाजवत आहेत. अशा परिस्थितीत, Infinix ZERO Flip 5G ची या दोन कंपन्यांशी थेट स्पर्धा होणार आहे. लॉन्च करण्यापूर्वी, Infinix नं आपल्या फ्लिप फोनची फिचर उघड केले आहेत.
Infinix स्वस्तात मस्त : सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या फ्लिप आणि फोल्ड करण्यायोग्य उपकरणांच्या किमती खूप जास्त आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येकाला ते परवडणं फार कठीण आहे. त्यामुळं, बाजारात स्थान निर्माण करण्यासाठी, Infinix स्वस्त दरात Infinix ZERO Flip 5G लाँच करू शकतं.
टॉप नॉच कॅमेरा सेन्सर : Infinix Zero Flip 5G मध्ये शक्तिशाली फिचर असतील. Infinix ZERO Flip 5G च्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. यामध्ये तुम्हाला 50+50 मेगापिक्सलचा टॉप नॉच कॅमेरा सेन्सर मिळणार आहे. तुम्हाला कॅमेरामध्ये OIS आणि अल्ट्रा स्टेडी मोडचा सपोर्ट मिळेल.
तुम्हाला त्याच्या पुढच्या बाजूला 50MP सेल्फी कॅमेरा देखील मिळेल. यामध्ये तुम्हाला 3.64 इंच कव्हर डिस्प्ले मिळेल ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz असेल. इनर डिस्प्ले बद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला तो 6.9 इंचाचा मिळेल. डिस्प्लेमध्ये तुम्हाला गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 चं संरक्षण दिले जाईल. Infinix ZERO Flip 5G मध्ये, तुम्हाला मोठ्या बॅटरीसह जलद चार्जिंगचा सपोर्ट मिळणार आहे.
हे वाचलंत का :