ETV Bharat / technology

क्वांटम कम्युनिकेशनवर IIT मद्रासमध्ये आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित - Quantum Communication

author img

By ETV Bharat Tech Team

Published : Aug 26, 2024, 6:51 PM IST

Conference on Quantum Communication : क्वांटम तंत्रज्ञानातील जागतिक प्रगती तसंच या क्षेत्रातील भारताचं उदयोन्मुख नेतृत्व यावर प्रकाश टाकण्यासाठी IIT मद्रासनं QCMC 2024 परिषेदचं आयोजन करण्यात आलं आहे.

Etv BharatConference on Quantum Communication
IIT मद्रासमध्ये आंतरराष्ट्रीय परिषद (Etv Bharat)

चेन्नई Conference on Quantum Communication : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रासनं (IIT मद्रास) 26 ते 30 ऑगस्ट 2024 या कालावधीत क्वांटम कम्युनिकेशन, मापन आणि संगणन (QCMC 2024) या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन केलं आहे. परिषदेची ही 16 वी आवृत्ती असून ही भारतात होणारी पहिलीच परिषद आहे.

सर्वात प्रतिष्ठित जागतिक परिषद : सेंटर फॉर क्वांटम इन्फॉर्मेशन, कम्युनिकेशन अँड कॉम्प्युटिंग (CQuICC), IIT मद्रास येथील सेंटर ऑफ एक्सलन्स, यांनी या परिषदेचं संयोजन केलं आहे. 1990 मध्ये स्थापित, QCMC हे क्वांटम परिषद विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आंतरविद्याशाखीय क्षेत्रातील शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांसाठी सर्वात प्रतिष्ठित जागतिक परिषद आहे. क्वांटम कॉम्प्युटिंग, क्वांटम कम्युनिकेशन, क्वांटम क्रिप्टोग्राफी आणि क्वांटम सेन्सिंगमधील संशोधनाची माहिती देण्यासाठी जगभरातील तज्ञांन या परिषदेत एकत्र येणार आहेत. परिषद IIT मद्रास, Mphasis F1 Foundation आणि KLA द्वारे प्रायोजित आहे.

50 स्टार्ट-अप क्वांटम तंत्रज्ञानानात काम : आज (26 ऑगस्ट 2024) उद्घाटन सत्रादरम्यान 'भारताच्या राष्ट्रीय क्वांटम मिशन' वर भाषण देताना, नॅशनल क्वांटम मिशनच्या मिशन गव्हर्निंग बोर्डाचे अध्यक्ष डॉ. अजय चौधरी म्हणाले, “आयआयटी मद्रासला परिषद आयोजन करण्याची संधी मिळाली आहे. भारतात आधीच याबाबत अधिक काम चालू आहे. विशेषत: आयआयटी मद्रासमध्ये यावर संशोधन सुरू आहे. नॅशनल क्वांटम मिशन असलेल्या डीएसटीनं केलेल्या योजनेनुसार, आम्ही इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालय आणि इतर मंत्रालयांसह अनेक प्रकल्पांवर काम करण्यास सुरुवात केलीय. भारतात सुमारे 600 शास्त्रज्ञ आणि 40 ते 50 स्टार्ट-अप क्वांटम तंत्रज्ञानामध्ये काम करत आहेत.

राष्ट्रीय क्वांटम मिशनची घोषणा : “आम्ही क्वांटम तंत्रज्ञानाच्या सर्व भागांची काळजी घेतली जाईल याची खात्री करण्यासाठी काम करत आहोत. नॅशनल क्वांटम मिशन लाँच केल्यानंतर, आम्हाला थीमॅटिक पार्क्स आणि क्वांटम तंत्रज्ञानाच्या इतर क्षेत्रांची स्थापना करण्यासाठी सुमारे 385 प्रस्ताव प्राप्त झाले. आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. लवकरच, राष्ट्रीय क्वांटम मिशनची घोषणा करणार आहे. चार स्वतंत्र विभाग 08 कंपन्या स्थापन करण्याची योजना आहे. संगणन, संप्रेषण, साहित्य असं सर्व संशोधकांना आम्ही हब अंतर्गत एकत्र आणू. शिवाय, स्टार्ट-अप्सचा मोठ्या प्रमाणात समावेश केला पाहिजे. आम्ही सुमारे 40 स्टार्ट-अपना पत्र लिहिलंय.

स्टार्टअपला अनुदान देणार : “पुढील तीन महिन्यांत आम्ही 10 ते 15 चांगल्या स्टार्टअपला अनुदान देणार आहोत. काही चांगली उत्पादने विकसित झाली आहेत. आम्ही विविध सॉफ्टवेअर कंपन्यांना सहभागी करून घेण्यासाठी आणि त्यांना क्वांटममध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी देखील काम करत आहोत. क्वांटम इन्फॉर्मेशन, कम्युनिकेशन आणि कॉम्प्युटिंग (CQuICC) केंद्राच्या स्थापनेद्वारे IIT मद्रास क्वांटम संशोधनात आघाडीवर आहे. ही संस्था क्वांटम क्रिप्टोग्राफी, क्वांटम सेन्सिंग, क्वांटम माहिती सिद्धांत आणि क्वांटम नेटवर्क्समधील अत्याधुनिक संशोधनासह भारत प्रगती करत आहे. ही संस्था भारताच्या राष्ट्रीय क्वांटम मिशनमध्येही महत्त्वाची भूमिका बजावते. या संस्थेनं घरगुती क्वांटम तंत्रज्ञानाच्या विकासात योगदान दिलं आहे.

मोठ्या प्रमाणात डेटा आणि समस्या : तत्पूर्वी बोलताना, आयआयटी मद्रासचे संचालक प्रा. व्ही. कामकोटी म्हणाले, “ही क्वांटम परिषद प्रथमच भारतात आयोजित करण्यात आली आहे. आमच्याकडं मोठ्या प्रमाणात डेटा आणि समस्या आहेत. ज्या आम्ही शास्त्रीय पद्धतीनं संगणनकाच्या माध्यामातून सोडवण्याचा प्रयत्न करत होतो. हार्डवेअरपासून लॉजिस्टिक्स आणि नेटवर्किंग समस्यांपर्यंत यातील अनेक समस्या अत्यंत गुंतागुंतीच्या आहेत. आम्ही ह्युरिस्टिक वापरून त्या सोडवण्याचा प्रयत्न करत होतो.

भागधारकांना एकत्र आणण्याची संधी : उद्घाटनपर भाषण देताना, प्रा. मेटे अतातुरे, अध्यक्ष, सुकाणू समिती, QCMC 2024, केंब्रिज विद्यापीठ, UK म्हणाले, “या परिषदेत केवळ गणितज्ञच नव्हे, तर अभियंते, संशोधक आणि इतर भागधारकांना एकत्र आणण्याची संधी आहे. आमच्याकडं क्वांटम तंत्रज्ञानातील अत्याधुनिक क्षेत्रात चर्चा होत आहे. या परिषदेची व्याप्ती खूप विस्तृत आहे. ही परिषद पॅरिसमध्ये 1990 मध्ये स्थापन झालेली सर्वात जुनी क्वांटम परिषद आहे. जी दर दोन वर्षांनी आयोजित केली जाते. या परिषदेत 16 देशांचे प्रतिनिधी सहभागी होत आहेत.

'हे' वचालंत का :

  1. शास्त्रज्ञांनी संशोधनासाठी वापरलेल्या दुर्मिळ सामग्रीचं प्रदर्शन : डॉ. सी.व्ही. रामन यांनी संशोधनासाठी वापरलेला तबला मुख्य आकर्षण - Science City of Bangalore
  2. टेलिग्रामचे सीईओ पावेल दुरोव यांना अटक, 20 वर्षांपर्यंत होऊ शकते शिक्षा - Telegram founder Pavel Durov
  3. पुण्यातील तरुणानं बनवला विना चालक एआयवर चालणारा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, डिझेल बरोबरच चालकाचा खर्चही वाचणार - Driverless Electric Tractor

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.