लखनौ hypervelocity expansion tunnel - आयआयटी कानपूरनं देशातील पहिला हायपरवेलोसिटी विस्तार टनेल असलेली यंत्रणा विकसित केली आहे. त्याची चाचणी करण्याबरोबरच कॅम्पसमध्ये यशस्वीरित्या यंत्रणा बसविण्यात तज्ज्ञांना पूर्णपणं यश मिळालं आहे. या यंत्रणेला सध्या S-2 हे नाव देण्यात आलं. या यंत्रणेच्या मदतीनं भविष्यात वाहने, स्क्रॅमजेट फ्लाइट, बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या वातावरणात प्रवेश होताना उद्भवणाऱ्या हायपरसॉनिक परिस्थितीचं आकलन होऊ शकणार आहे.
S-2 टनेल तीन ते 10 किलोमीटर प्रति सेकंद उड्डाणाचा वेग निर्माण करण्यास सक्षम असल्याची माहिती आयआयटी कानपूरचे संचालक प्रा. एस गणेश यांनी दिली. आयआयटी कानपूरच्या प्राध्यापकांनी आपल्या संशोधनानं देशात पुन्हा एकदा इतिहास रचल्यानं त्यांनी समाधान व्यक्त केलं. आयआयटी कानपूरच्या माहितीनुसार ही यंत्रणा हायपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्रांसह भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) मोहिमांसाठी चाचणी उपलब्ध करून देते. 'जिगरथंडा' टोपणनाव असलेली S2 सुविधा देशाचं भारताच्या अंतराळ आणि संरक्षण क्षेत्रातील वाढतं महत्त्व अधोरेखित करते.
स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून यंत्रणा विकसितृ सहयोगी प्राध्यापक इब्राहिम सुगर्नो म्हणाले की, या बोगद्याला सध्या S-2 सुविधा असे नाव देण्यात आले आहे. बोगद्याची लांबी 24 मीटर आहे. ही यंत्रणा एरोस्पेस अभियांत्रिकी विभागाच्या आत आयआयटी कानपूरच्या हायपरसोनिक प्रायोगिक वायुगतिकी प्रयोगशाळेत आहे. या यंत्रणेसाठी एरोनॉटिकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट बोर्ड (ARDB), विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि आयआयटी कानपूर यांच्याकडून निधी पुरविण्यात आला. केवळ तीन वर्षांच्या कालावधीत स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून ही यंत्रणा विकसित करण्यात आली.
कशी आहे रचना?एरोस्पेस अभियांत्रिकी विभाग आणि लेझर आणि फोटोनिक्स सेंटरचे सहयोगी प्राध्यापक इब्राहिम सुगर्णो यांनी या अत्याधुनिक यंत्रणेबाबत माहिती दिली. सुगर्णो यांनी सांगितले की, एस-२ चं बांधकाम करणं हे अत्यंत आव्हानात्मक ठरलं आहे. त्यासाठी भौतिकशास्त्र आणि अचूक अभियांत्रिकीचे सखोल ज्ञान आवश्यक आहे. 'फ्री पिस्टन ड्रायव्हर' प्रणाली परिपूर्ण करणं ही सर्वात महत्त्वाची आणि आव्हानात्मक बाब होती. त्यासाठी 20-35 वातावरणातील उच्च दाबानं 150-200 m/s वेगाने कॉम्प्रेशन ट्यूबच्या 6.5 मीटर खाली पिस्टन सोडणं आवश्यक होते. शेवटी प्रणाली ही 'सॉफ्ट लँडिंग'वर आणणे देखील आवश्यक आहे. मात्र, आमच्या ज्ञानानं आणि कौशल्यानं आम्ही त्यावर मात करू शकलो. आमच्या टीमला या अद्वितीय रचना, बांधणी आणि चाचणी केल्याचा अत्यंत अभिमान वाटत आहे.
हेही वाचा-