ETV Bharat / technology

तुम्ही 5 नाही, तर व्हॉट्सॲपवर एकाच वेळी पाठवा अनेकांना मॅसेज, जाणून घ्या पद्धत - WHATSAPP TRICKS

WhatsApp : व्हॉट्सॲपवर तुम्हाला एकाच वेळी फक्त पाच जणांनाच मॅसेज पाठवता योतो. मात्र, तुम्ही पाच नाही तर एकाच वेळी अनेकांना मेसेज पाठवू शकता. जाणून घ्या.

WhatsApp
WhatsApp (Getty)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Oct 11, 2024, 5:39 PM IST

हैदराबाद WhatsApp : व्हॉट्सॲप हे जगातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या मेसेजिंग ॲप्सपैकी एक आहे. एकट्या भारतात 500 दशलक्षाहून अधिक सक्रिय व्हॉट्सॲपचे वापरकर्ते आहेत. व्यावसायिक असो किंवा वैयक्तिक, सोशल मीडियाच्या इन्स्टंट मेसेजिंग ॲपनं सगळीकडं लोकांचं जीवन खूप सोपं केलं आहे.

ब्रॉडकास्ट लिस्ट तयार करा : सण,उत्सवात व्हॉट्सॲपचा वापर अधिकच वाढतो. आता देशात दिवाळीचा सण जवळ येत आहे. आपल्यापैकी बहुतेकजण व्हॉट्सॲपच्या मदतीनं आपल्या मित्रांसह कुटुंबातील सदस्यांना शुभेच्छा पाठवता. पण, सगळ्यात मोठी समस्या उद्भवते, जेव्हा आपल्याला एकाच वेळी अनेकांना मेसेज करावा लागतो. मात्र, व्हॉट्सॲपवर फक्त पाचच जणांना मॅसेज एका वेळी पाठवता योतो. आपल्यापैकी बहुतेकजण याचं पद्धतीचा वापर करतात. मात्र, आज तुम्ही ही बातमी वाचल्यानंतर एकाच वेळी अनेकांना संदेश पाठवू शकता. तुम्हाला एकाच वेळी अनेक लोकांना मेसेज पाठवायचा असेल, तर तुम्ही व्हॉट्सॲपवर ब्रॉडकास्ट लिस्ट तयार करू शकता. ती लिस्ट कशी करायची ते आम्ही तुम्हाला सांगतो.

  • पायरी 1 : तुमच्या मोबाइलवर व्हॉट्स ॲप उघडा आणि सेटिंग्जवर जा.
  • पायरी 2 : 'ब्रॉडकास्ट लिस्ट' पर्याय निवडा आणि तुम्हाला ज्यांना दिवाळीच्या शुभेच्छा पाठवायच्या आहेत, त्यांची एक नवीन यादी तयार करा.
  • पायरी 3 : संपर्क जोडण्यासाठी टिक मार्कवर क्लिक करत रहा.
  • पायरी 4 : एकदा तुम्ही ब्रॉडकास्ट सूची तयार केल्यावर, तुम्ही ब्रॉडकास्ट सूचीमध्ये जोडलेल्या सर्व मित्रांसह नातेवाईकांना संदेश किंवा शुभेच्छा पाठवू शकता.

ब्रॉडकास्ट सूची वापरून, तुम्ही ग्रुप न बनवता एकाच वेळी अनेक संपर्कांना मेसेज सहज पाठवू शकता. हे तुम्हाला सणाच्या शुभेच्छा आणि संदेश सहज पाठवण्यास मदत करू शकतं. हे लक्षात घेण्यासारखं आहे की व्हॉट्सॲप ब्रॉडकास्टमध्ये प्रति सूची 256 संपर्कांची मर्यादा आहे, जी वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही खात्यांना लागू होते.

हे वाचलंत का :

  1. स्मार्टफोन बाजारात मोठा धमाका, 'या' फोल्डेबल स्मार्टफोनची एंन्ट्री
  2. निहोन हिडांक्यो या जपानी संस्थेला शांततेचा नोबेल
  3. मेटा, इंस्टाग्राम रील्स डायरेक्ट थ्रेड्सवर पोस्ट करता येणार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.