हैदराबाद Improve Internet Speed on Mobile : तुम्ही स्मार्टफोनवर 5G नेटवर्कचा आनंद घेत असला, तरी अजूनही देशातील अनेक भागात स्लो इंटरनेटची समस्या आहे. याशिवाय, फोनमुळं काहीवेळा वेगवान इंटरनेट वापरण्यात अडचण येते. अशा परिस्थितीत, तुम्हाला व्हिडिओ स्ट्रीमिंग, सोशल मीडिया ब्राउझिंग किंवा प्रवासात काम करताना खूप अडचणी येतात.
1. फोन रीस्टार्ट करा : तुमचा फोन जुना असल्यास फोनमध्ये सॉफ्टवेअर त्रुटी येऊ शकतात. ज्यामुळं तो स्लो होऊ शकतो. फोनचे सॉफ्टवेअर सतत चालू असलं, तरीही ते खराब होऊ शकतं. सॉफ्टवेअर रिफ्रेश करण्यासाठी तुम्ही तुमचा फोन रीस्टार्ट करू शकता, ज्यामुळं फोन पुन्हा व्यवस्थित चालू होईल.
2. बॅकग्राउंड ॲप्स बंद करा : बऱ्याच वेळा, अनेक ॲप्स तुमच्या फोनच्या बॅकग्राउंडमध्ये चालू राहतात. जे भरपूर डेटा वापरतात. यामुळं तुमच्या फोनचं इंटरनेटही कमी होऊ शकतं. डेटा वाचवण्यासाठी तुमचं इंटरनेट स्पीड वाढवण्यासाठी तुम्ही वापरत नसलेली ॲप्स बंद करावीत.
3. ॲड ब्लॉकरचा वापर : अनेक प्रकारचे ॲड पॉप-अप जसं की चित्रे, लिंक्स स्मार्टफोनवर दिसत राहतात. ज्यामुळं तुमच्या स्मार्टफोनचा डेटा वापरला जातो. त्यामुळं इंटरनेटचा वेग कमी होतो. या जाहिराती थांबवण्यासाठी तुम्ही ॲड ब्लॉकर ॲप्स वापरू शकता. गुगल प्ले स्टोअरवर तुम्हाला अनेक प्रकारचे ॲड ब्लॉकर ॲप्स सापडतील. त्यापैकी तुम्ही एक चांगलं ॲप निवडू शकता.
4. सॉफ्टवेअर अपडेट : कालबाह्य सॉफ्टवेअर हे खराब इंटरनेट कार्यक्षमतेचं एक सामान्य कारण असू शकतं. तुमच्या आजूबाजूचं नेटवर्क चांगलं असलं, तरीही डेटा स्पीड कमी होऊ शकतो. तुम्ही नेहमी सॉफ्टवेअर किंवा ॲप अपडेट्सवर लक्ष ठेवावं.
5. दुसऱ्या नेटवर्कशी कनेक्ट करा : तुमचं वर्तमान नेटवर्क स्लो गती प्रदान करत असल्यास, सार्वजनिक वाय-फाय हॉटस्पॉट किंवा सेल्युलर नेटवर्क सारख्या दुसऱ्या नेटवर्कशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा. समस्या तुमच्या फोनमध्ये आहे, की तुमच्या नेटवर्कमध्ये हे ,ओळखण्यात हे तुम्हाला मदत करू होईल.
6.कॅशे, कुकीज साफ करा : कालांतरानं, तुमचा फोन ॲप्समधून डेटा जमा करत राहतो. ज्यामुळं तुमच्या नेटवर्कवर देखील परिणाम होतो. तसंच इंटरनेटचा वेग कमी होतो. कॅशे, कुकीज साफ केल्यानं फोनची इंटरनेट कार्यक्षमता वाढू शकते.
7. VPN वापरा: VPN मुळं तुमचा इंटरनेटचा वेग कमी होतो, असं मानलं जातं. काही प्रकरणांमध्ये, तुमचं ट्रॅफिक एन्क्रिप्ट करून सुरक्षित सर्व्हरद्वारे राउट करून तुमचा इंटरनेट वेग VPN वाढवू शकतं.
8. कमाल डेटा लोडिंग पर्याय : Android फोनमध्ये, वायरलेस आणि नेटवर्क सेटिंग्ज अंतर्गत 'GPRS टू डेटा प्राधान्य' नावाचं फिचर प्रदान केलं जातं. याला कमाल डेटा लोडिंग पर्याय म्हणून देखील ओळखलं जातं. हे तुमच्या फोनला प्रत्येक साइटवर अधिक डेटा डाउनलोड करण्यास अनुमती देतं. त्यामुळं इंटरनेट गती वाढवते.