ETV Bharat / technology

एलोन मस्कच्या SpaceX नं रचला इतिहास, प्रथमच खाजगी क्रू अवकाशात पाठवले - Polaris Dawn Mission Launch - POLARIS DAWN MISSION LAUNCH

Polaris Dawn Mission Launch : इलॉन मस्कची कंपनी SpaceX नं मंगळवारी इतिहास रचला. कंपनीनं प्रथमच चार जणांना अंतराळात पाठवलं. हे जगातील पहिलं व्यावसायिक अंतराळ उड्डाण आहे. SpaceX चं हे पोलारिस डॉन मिशन इतर अनेक मार्गांनी देखील महत्त्वाचं आहे. हे संपूर्ण अभियान पाच दिवस चालणार आहे. सर्व प्रवासी SpaceX च्या शक्तिशाली क्रू ड्रॅगन स्पेसक्राफ्टमध्ये आहेत.

SpaceX
Polaris Dawn Mission Launch (SpaceX)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Sep 11, 2024, 4:59 PM IST

वॉशिंग्टन Polaris Dawn Mission Launch : अमेरिकन उद्योगपती एलोन मस्क यांच्या कंपनी स्पेसएक्सनं पोलारिस डॉन मिशन लाँच केलं आहे. मात्र, हवामानामुळं प्रक्षेपण सुमारे दोन तास उशीर झाले. हे अभियान पाच दिवस चालणार आहे. यात चार जण आहे. या मोहिमेचा उद्देश नवीन स्पेससूट डिझाइनची चाचणी घेणं आहे. हा जगातील पहिला खाजगी स्पेसवॉक असेल. सर्व प्रवाशांनी SpaceX च्या क्रू ड्रॅगन कॅप्सूलमधून उड्डाण केलं. हे तेच कॅप्सूल आहे ज्याद्वारे, नासा सुनीता विल्यम्सला अवकाशातून परत आणण्याच्या योजनेवर काम करत आहे.

'या' चौघांनी केलं उड्डाण : क्रूमध्ये एक अब्जाधीश उद्योजक, एक निवृत्त लष्करी फायटर पायलट, दोन SpaceX कर्मचारी आहेत. अब्जाधीश जेरेड इसाकमन, मिशन पायलट स्कॉट पोटेट, SpaceX कर्मचारी सारा गिलिस आणि अण्णा मेनन यांनी कॅप्सूलमध्ये उड्डाण केलं. स्कॉट पोटेट, हे अमेरिकन हवाई दलाचं निवृत्त लेफ्टनंट कर्नल आहेत. गिलिस आणि अण्णा मेनन हे स्पेसएक्सचं वरिष्ठ अभियंते आहेत. इसाकमन आणि गिलिस अंतराळयानातून बाहेर पडतील आणि स्पेसवॉक करतील, तर पोटेट आणि मेनन केबिनमध्ये राहतील. चार अंतराळवीर तेथे वैज्ञानिक प्रयोगही करतील. कॉस्मिक रेडिएशन आणि स्पेस यांचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

पाचवं धोकादायक मिशन : क्रू ड्रॅगनचं हे आतापर्यंतचं पाचवं आणि सर्वात धोकादायक वैयक्तिक मिशन आहे. प्रक्षेपणानंतर काही मिनिटांत अंतराळात पोहोचल्यानंतर, हे वाहन अंडाकृती कक्षेत स्थापित केलं जाईल. हे यान पृथ्वीच्या 190 किमी जवळून आणि 1,400 किमी अंतरावर जाईल. 1972 मध्ये यूएस अपोलो मून कार्यक्रमानंतर मानवानं केलेलं, हे सर्वात जास्त अंतर असेल. हे अभियान गेल्या महिन्यात सुरू करण्याचं नियोजन होतं. मात्र हेलियम लिकेजमुळं प्रक्षेपण पुढं ढकलावं लागलं.

पहिला अमेरिकन स्पेसवॉक 1965 मध्ये : या मोहिमेपूर्वी केवळ उच्च प्रशिक्षित आणि सरकारी अंतराळवीरांनीच स्पेसवॉक केलं होतं. 2000 मध्ये चिनी अंतराळवीरांनी आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर सुमारे 270 स्पेसवॉक आणि बीजिंगमधील तिआंगॉन्ग स्पेस स्टेशनवर 16 स्पेसवॉक केलं होतं. पोलारिस डॉन स्पेसवॉक मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी, अंतराळयान 700 किमी उंचीवर पोहोचेल. पहिला अमेरिकन स्पेसवॉक 1965 मध्ये जेमिनी कॅप्सूलमध्ये करण्यात आला होता.

'हे' वाचलंत का :

  1. तुम्हालाही शांत झोप येत नाहीय का? ऍपल वॉचमधील स्लीप एपनिया डिटेक्शन ठेवणार तुमच्या झोपीवर लक्ष - Apple Watch Series 10 Launch
  2. मारुती सुझुकीच्या कारवर मिळतेय बंपर सूट, ग्राहकांचे वाचणार पैसे - discount on Maruti Suzuki cars
  3. Hyundai Alcazar लाँच ; स्मार्टफोन, स्मार्टवॉचच्या माध्यमातून दरवाजे होतील लॉक अनलॉक - Hyundai Alcazar facelift Launched

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.