ETV Bharat / technology

भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत तेजी, कार विक्रीत 2.27 टक्के वाढ - Electric vehicle sales

author img

By ETV Bharat Tech Team

Published : 2 hours ago

Electric vehicle sales : मागील वर्षी म्हणजेच 2023-24 मध्ये दुचाकी वाहनांमध्ये 5.12 टक्के, तीनचाकी वाहनांमध्ये 54.8 टक्के, मालवाहू तीनचाकी वाहनांमध्ये 41.55 टक्के, प्रवासी कारमध्ये 2.27 टक्के वाढ झालीय.

Electric vehicle sales
प्रातिनिधिक फोटो (source AI)

हैदराबाद Electric vehicle sales : भारतात इलेक्ट्रिक (EVs) वाहनांची मागणी वाढत आहे . मागील वर्षी म्हणजेच 2023 मध्ये दुचाकी इलेक्ट्रिक वाहनांमध्ये 5.12 टक्के, तीनचाकी वाहनांमध्ये 54.8 टक्के, मालवाहू तीनचाकी वाहनांमध्ये 41.55 टक्के आणि प्रवासी कारमध्ये 2.27 टक्के वाढ झाल्याचं दिसून आलंय.

दुचाकीच्या विक्रित वाढ : या वर्षी जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान, Hero MotoCorp च्या एकूण विक्रीमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वाटा 0.74 टक्के होता, तर बजाज ऑटोच्या एकूण विक्रीमध्ये EV चा वाटा 8.32 टक्के होता, जो गेल्या वर्षी 4.04 टक्के होता. त्याचप्रमाणे, प्रवासी तीनचाकी वाहनात, महिंद्राच्या इलेक्ट्रिक विक्रीत 96.75 टक्के झालीय. बजाजची विक्री गेल्या वर्षीच्या 1.21 टक्क्यांवरून यंदा 7.7 टक्क्यांपर्यंत वाढली आहे.

प्रवासी कारची विक्री 2.39 टक्क्यांवर : प्रवासी कारमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा प्रवेश देखील 2023 मधील 2.27 टक्क्यांवरून या वर्षी आतापर्यंत 2.39 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. यावर्षी आतापर्यंत टाटा मोटर्सच्या एकूण विक्रीत इलेक्ट्रिक वाहनांचा वाटा 12.05 टक्के आहे, जो गेल्या वर्षीच्या 12.61 टक्क्यांपेक्षा थोडा कमी आहे. परंतु JSW MG मोटर ही वेगानं वाढणारी कंपनी म्हणून उदयास आली आहे. या वर्षी आतापर्यंत तिची इलेक्ट्रिक वाहन विक्री एकूण वाहनांच्या 33.77 टक्के आहे, जी गेल्या वर्षी 23.75 टक्के होती.

विक्रीत लक्षणीय वाढ : देशातील इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत लक्षणीय वाढ होत आहे. 2030 पर्यंत इलेक्ट्रिक वाहनांची विक्री एक कोटीपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. देशात जवळपास 30 लाख ईव्ही इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली आहे. भारतीय ऑटोमोबाईल उद्योग हा देशाच्या अर्थव्यवस्थेत 6.8 टक्के देत आहे. तसंच हा उद्योग सर्वाधिक वेगानं वाढतोय.

हे वाचलंत का :

  1. नवीन फोन खरेदी करताय? मग 'या' गोष्टींचा नक्की विचार करा,...अन्यथा एक चूक पडेल महागात - New mobile phone
  2. इतर देशांपेक्षा भारतात आयफोन का विकला जातो महाग?, जाणून घ्या कारण - Apple iPhone 16 series price
  3. अमेरिकन कंपन्यांच्या सीईओंसोबत 'सार्थक' गोलमेज बैठकीत मोदींनी घेतला भाग - Prime Minister Modi US Visit

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.