ETV Bharat / technology

मोबाईलच्या अतिवापरामुळं होतोय कर्करोग? फोनचा मानवी आरोग्यावर घातक परिणाम - Does mobile phones cause cancer - DOES MOBILE PHONES CAUSE CANCER

Does mobile phones cause cancer : मोबाइल फोनच्या अतिवापरामुळं मानवी जीवनावर गंभीर परिणाम होताना दिसताय. मोबाईलच्या अतिवापरामुळं कर्करोग, न्यूरोलॉजिकल विकार, पुनरुत्पादक क्षमता, मानसिक आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. मात्र यावर अजून ठोस संशोधन झालेलं नसल्याचं (WHO) नं म्हटलं आहे.

Representative photograph
प्रातिनिधिक छायाचित्र (ETV BHARAT MH Desk)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Sep 4, 2024, 12:58 PM IST

हैदराबाद Does mobile phones cause cancer : आजच्या डिजिटल युगात मोबाईल फोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. या उपकरणांच्या अतिवापरामुळं मानवी आरोग्यावर घातक परिणाम होत आहेत. शारीरिक आजारांपासून ते मानसिक आरोग्याच्या चिंतेपर्यंत, याचे दूरगामी आणि चिंताजनक परिणाम आहेत.

कर्करोगाची चिंता : वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नं मोबाइल फोनद्वारे उत्सर्जित होणाऱ्या रेडिओफ्रिक्वेंसी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डचं वर्गीकरण केलं आहे. "दीर्घकाळ फोन वापरल्यामुळं मेंदूचा कर्करोग, डोके तसंच मानेचा कर्करोग, ल्युकेमियाचा धोका वाढण्याची शक्यता असल्याचं एका अभ्यासांमध्ये आढळून आलं आहे. तसंच मोबाईलमधील रेडिओफ्रिक्वेंसी मणुष्यासाठी कर्करोगजन्य असू शकते, असं देखील (WHO) नं म्हटलंय.

न्यूरोलॉजिकल विकार : मोबाइल फोनमधील रेडिएशनच्या संपर्कात आल्यास अल्झायमर, पार्किन्सन्स, मल्टिपल स्क्लेरोसिस,अमायोट्रॉफिक, लॅटरल स्क्लेरोसिस (ALS) यासह न्यूरोलॉजिकल विकार होण्याची दाट शक्यता असते.

पुनरुत्पादक समस्या : मोबाईल फोनचा वापर वंध्यत्व, गर्भपात यासह प्रजनन क्षमतेवर देखील परिणाम करू शकतो. फोनद्वारे उत्सर्जित होणारे रेडिएशन शुक्राणूंना नुकसान पोहोचवू शकतात. तसंच गर्भाच्या रेडिएशन विकासावर परिणाम करू शकतं.

शारीरिक आरोग्याचे धोके : दीर्घकाळापर्यंत फोनचा वापर केल्यास आरोग्याच्या अनेक समस्यांशी निर्माण झाल्या आहेत.

  • सतत खाली वाकल्यामुळं मान तसंच पाठदुखीचा त्रास होतोय.
  • मोबाईलमधील निळ्या प्रकाशामुळे डोळ्यांवर ताण येतो तसंच दृष्टी देखील कमी होते.
  • लठ्ठपणा तसंच हृदय, रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्याची समस्या
  • झोपेचा त्रास आणि थकवा

मानसिक आरोग्याची चिंता : अत्याधिक फोन वापरामुळं मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतात.

  • सोशल मीडियाच्या दबावामुळं वाढलेला ताण आणि चिंता
  • सतत विचलित होणं, कमी कामात लक्ष नसणे
  • एकाकीपणा
  • महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आणि नातेसंबंधांकडे दुर्लक्ष
  • सायबर गुंडगिरी आणि ऑनलाइन छळ, ज्यामुळं नैराश्य आणि आत्महत्येचे विचार येणे

काय आहेत उपाय : "अत्याधिक फोनचा वापर हे सार्वजनिक आरोग्य संकट आहे," असं सेंटर फॉर इंटरनेट अँड टेक्नॉलॉजी ॲडिक्शनचे संस्थापक डॉ. डेव्हिड ग्रीनफिल्ड यांचं मत आहे. "फोन वापरासाठी आम्हाला काही मर्यादा घालून घेण आवश्यक आहे."

  • मोबाईलचं वेळापत्रक सेट करा
  • जास्तीत जास्त शारीरिक हालचाल तसंच बाहेरच्या कामात स्वत:ला गुंतवा
  • माइंडफुलनेस तसंच ध्यानाचा सराव करावा.
  • फोन-फ्री झोनचा वापर करावा.

मोबाईल फोननं संवाद तसंच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे. परंतु त्यांच्या अतिवापरामुळं मानवी आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. हे धोके ओळखून फोनच्या सवयी अंगीकारून तुम्ही आरोग्यात सुधारणा करू शकता.

हे वाचलंत का :

तुमचा फोन वारंवार गरम होतो? 'या' सेटिंग्ज बदला,...अन्यथा होणार मोठा घात - phone overheats

स्मार्टफोनवर गेम खेळण्याची खूप आवड आहे? घ्या 'हे' बेस्ट गेमिंग स्मार्टफोन - Best gaming smartphone

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.