नवी दिल्ली Nitin Gadkari on EVs : भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्यानं वाढत आहे. सरकारही या वाहनांवर सातत्यानं लक्ष केंद्रित करत आहे. पुढील 2 वर्षात इलेक्ट्रिक वाहनांची किंमत पेट्रोल आणि डिझेल कार सारखीच असेल, असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज 64 व्या एसीएमए वार्षिक अधिवेशनात बोलत होते.
इलेक्ट्रिक वाहनांवर सबसिडी : गडकरी पुढे म्हणाले की, "अर्थमंत्र्यांनी इलेक्ट्रिक वाहनांवर सबसिडी दिल्यानं कोणतीही अडचण नाहीय. ईव्ही उत्पादकांना यापुढं अनुदानाची गरज नाही. कारण त्यांचा उत्पादन खर्च कमी झाला आहे. ग्राहक आता इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय निवडत आहेत. गेल्या वर्षी, भारतातील इलेक्ट्रिक वाहनांचा बाजार हिस्सा 6.3 टक्के होता, जो मागील वर्षाच्या तुलनेत 50 टक्के अधिक आहे".
'जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करावे लागेल' : "मी पेट्रोल आणि डिझेलच्या विरोधात नाही, पण भारताला जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करावं लागेल. ज्याची किंमत सध्या 22 लाख कोटी रुपये आहे, असंही गडकरी यांनी स्पष्ट केलंय. यासोबतच इलेक्ट्रिक वाहनं आणि इथेनॉलसारख्या जैवइंधनांचा अवलंब करण्यावर" त्यांनी भर दिला.
'इथेनॉल उत्पादनाचा शेतकऱ्यांना फायदा' : नुकत्याच लाँच झालेल्या जगातील पहिल्या सीएनजी बाईक बजाज सीएनजीचं उदाहरण देत नितीन गडकरी म्हणाले, "या दुचाकीला 1 रुपये प्रति किमी खर्च येतोय, तर पेट्रोल दुचाकीला 2 रुपयांपेक्षा जास्त खर्च यतो. इथेनॉल उत्पादनाचा फायदा शेतकऱ्यांना होत असल्याचा दावा गडकरींनी यावेळी केला. जैव इंधन म्हणून इथेनॉलच्या वाढत्या मागणीमुळं मक्याच्या किमती दुपटीनं वाढल्याचं ते म्हणाले.
'हे' वाचंलत का :