ETV Bharat / technology

CISF फायरमन प्रवेशपत्र जारी : 'इथं' करा थेट डाउनलोड - CISF FIREMAN ADMIT CARD 2024 OUT

CISF नं कॉन्स्टेबल (फायर)-2021 कागदपत्र पडताळणीसाठी प्रवेशपत्र जारी ( cisf fireman admit card ) केलं. पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट cisfrectt.cisf.gov.in वरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.

CISF
CISF वेबसाइट (CISF)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Dec 16, 2024, 2:15 PM IST

हैदराबाद : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलानं (CISF) कॉन्स्टेबल (फायर)-2021 भरतीसाठी कागदपत्र पडताळणी प्रक्रियेसाठी अधिकृतपणे प्रवेशपत्र जारी (CISF Fireman Admit Card Released) केलं आहे. लेखी परीक्षेसाठी पात्र झालेले उमेदवार आता अधिकृत CISF भरती पोर्टलद्वारे त्यांचं प्रवेशपत्र ऑनलाइन डाउनलोड करू शकतात.

कधी होणार पडताळणी : कागदपत्र पडताळणी प्रक्रिया 24 नोव्हेंबर 2024 ते 20 जानेवारी 2025 दरम्यान देशाच्या विविध भागांमध्ये 11 नियुक्त केंद्रांवर होणार आहे. भरती प्रक्रियेतील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. उमेदवारांनी त्यांची पात्रता पडताळण्यासाठी सर्व आवश्यक कागदपत्रांसह सहभागी होणं अपेक्षित आहे.

किमान पात्रता गुण : कागदपत्र पडताळणी टप्प्यात पात्र, होण्यासाठी उमेदवारांनी लेखी परीक्षेत खालील किमान गुण मिळवलेले असावेत.

UN/EWS/ESM : 35%

SC/ST/OBC: 33%

CISF कॉन्स्टेबल (फायर) प्रवेशपत्र कसं डाउनलोड करावं? :

  • उमेदवारांनी त्यांचं प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या पायऱ्यांचं पालन करावं.
  • cisfrectt.cisf.gov.in या अधिकृत CISF भरती वेबसाइटला भेट द्या.
  • पोर्टलवर लॉग इन करण्यासाठी तुमचा नोंदणी आयडी आणि पासवर्ड टाका.
  • एकदा लॉग इन केल्यानंतर, CISF कॉन्स्टेबल (फायर)-2021 प्रवेशपत्रासाठी लिंक शोधा. त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल. तपशील काळजीपूर्वक तपासा.
  • प्रवेशपत्र डाउनलोड करून प्रिंट काढा. पडताळणी केंद्रावर प्रिंटेड प्रत घेऊन जाणं अनिवार्य आहे.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :

प्रवेशपत्र पोस्टानं पाठवलं जात नाही: प्रवेशपत्र फक्त ऑनलाइन उपलब्ध आहेत. उमेदवारांनी ते CISF वेबसाइटवरून डाउनलोड करावं. कारण कोणत्याही प्रती पोस्टानं पाठवल्या जाणार नाहीत.

प्रवेशपत्राचं तात्पुरतं स्वरूप: प्रवेशपत्र तात्पुरतं जारी केलं जातं. ते उमेदवाराच्या अंतिम निवडीसाठी नसतं. अंतिम निवड कागदपत्रांच्या पडताळणीवर आणि पुढील भरती प्रक्रियेवर अवलंबून असते.

मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करा: कागदपत्र पडताळणी केंद्रावर कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी उमेदवारांनी प्रवेशपत्रात दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचल्या वाचाव्यात.

हे वाचलंत का :

  1. IGNOU च्या ओपन डिस्टन्स लर्निंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरु, असा करा अर्ज
  2. रब्बी पीक विमा काढण्यासाठी फक्त शेवटचे दोन दिवस बाकी, 'इथं' करा थेट अर्ज
  3. RRB JE परीक्षेचं हॉल तिकिट लवकरच प्रसिद्ध होणार, 'इथं' करा थेट RRB JE Admit Card डाउनलोड

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.