ETV Bharat / technology

तुमच्या घरात झुरळांचा उपद्रव झालाय? 'या' पाच रासायनिक स्प्रेमुळं मिळणार झुरळांपासून मु्क्ती - How to get rid of cockroaches

author img

By ETV Bharat Tech Team

Published : Sep 6, 2024, 1:06 PM IST

How to get rid of cockroaches : झुरळ हा प्रत्येकाच्या किचनमध्ये आढळणारा प्राणी. मात्र, या झुरळांचा तुमच्या घरात उपद्रव आरोग्यासाठी धोकायदायक ठरू शकतो. त्यासाठी तुम्ही काही रासायनिक फवाण्या करून त्यांच्यापासून सुटका मिळवू शकता. आज आम्ही तुम्हाला अशा पाच रासायनिक स्प्रेबद्दल माहिती देणार आहोत. ज्यामुळं तुम्ही झुराळांपासून सुटका करू शकता.

cockroaches
झुरळ (Etv Bharat MH Desk)

हैदराबाद How to get rid of cockroaches : स्वयंपाकघरातील झुरळांचा उपद्रव आरोग्यासाठी धोकादायक असू शकतो. झुरळांमुळं विविध आजार होऊ शकतात. तसंच ऍलर्जी देखील त्रास होऊ शकतो. जर, तुमच्याही घरात झुरळांनी धुमाकूळ घातला असेल, तर तुम्ही त्यांचा बंदोबस्त करू शकता. त्यासाठी तुम्हाला काही रासायनिक स्प्रेबाबत माहिती असणं आवश्यक आहे.

बोरिक ऍसिड स्प्रे : तुमच्या किचनमध्ये हमखास आढणारा प्राणी म्हणजे झुरळ. मात्र, या झुरळांच्या उद्रेकांपासून तुम्ही देखील मुक्ती मिळवू शकता. त्यासाठी रसायनाची थोडीफार माहिती असणं गरजेचं आहे. बोरिक ऍसिड झुरळांसाठी अतिशय उपयुक्त रसायन आहे. पीठामध्ये बोरिक ऍसिड मिसळून घ्यावं. तसंच पीठात मैदा आणि साखर समान प्रमाणात मिसळावी. नंतर त्याचे लहान गोळे करून ज्या ठिकाणी झुरळं वारंवार येतात अशा ठिकाणी ठेवावी.

बोरॅक्स स्प्रे : बोरिक ऍसिड प्रमाणेच, बोरॅक्स हे रासायन झुरळांचा नायनाट करतं. झुरळांपासून मुक्त होण्यासाठी हे बोरिक ऍसिड सारखच प्रभावी आहे. याकडं झरळं आकर्षित करण्यासाठी बोरॅक्स पावडरमध्ये काहीतरी गोड पदार्थ मिसळायला हवा. त्यानंतर कीचन, बेसीन अशा ठाकाणी याची फवारणी करावी.

अमोनिया सोल्यूशन : ड्रेनेज पाईप्स आणि सिंकमध्ये लपलेल्या झुरळांपासून मुक्तीसाठी अमोनियाचा वापर केला जाऊ शकतो. एका बकेटमध्ये एक कप अमोनिया पाण्यात मिसळा, नंतर ते ड्रेनज पाईपमध्ये फ्लश करावा. त्यामुळं तिथून झुरळं निघून जातील.

लिस्टरिन स्प्रे : लिस्टरिनमध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असतात, जे झुरळांपासून मुक्त होण्यास मदत करतात. एका स्प्रे बाटलीमध्ये अर्धा कप लिस्टरिन पाण्यात मिसळा, नंतर ज्या ठिकाणी वारंवार झुळरांचा वावर आहे, तिथ त्याची फवारणी करावी.

लिक्विड कॉन्सन्ट्रेट्स : लिक्विड कॉन्सन्ट्रेट्स हे सुप्रसिद्ध झुरळ प्रतिबंधक रसायन आहे. हे बहुतेक स्टोअरमध्ये खरेदी केलं जाऊ शकतं. याचं द्रावण तयार करून भेगा, खड्डे अशा ठिकाणी फवारणी करावी.

झुरळांपासून सुटका करण्यासाठी रासायनिक फवारण्या करताना सुरक्षितता, खबरदारीचं पालन कराव. हातमोजे, मास्क, संरक्षणात्मक चष्मा घालावा. घरातील खिडक्या, दरवाजे खुले करावेत. तसंच, पाळीव प्राणी, लहान मुलांना फवारल्या जाणाऱ्या रासायनीक द्रवांपासून दूर ठेवावं. योग्य काळजी न घेतल्यास या रासायनिक फवारण्या तुमचा जीव घेऊ शकतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.