ETV Bharat / entertainment

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरची मुलगी राहा झाली आजी नीतू कपूरला पाहून सरप्राईज, व्हिडिओ व्हायरल - raha kapoor - RAHA KAPOOR

Alia Bhatt Ranbir Kapoor And Raha : आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि त्यांची लाडकी लेक राहा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये आजी नीतू कपूरला अचानक विमानतळावर पाहून राहा आश्चर्यचकित होताना दिसत आहे.

Alia Bhatt Ranbir Kapoor And Raha
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर आणि राहा (कपूर कुटुंब (ANI))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Sep 16, 2024, 11:57 AM IST

मुंबई - Alia Bhatt Ranbir Kapoor And Raha : आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या सुपरस्टार दाम्पत्याची मुलगी राहा कपूर पुन्हा एकदा सोशल मीडियावर प्रसिद्धीझोतात आली आहे. सोमवारी 16 सप्टेंबर रोजी कपूर कुटुंबीय मुंबई विमानतळावर स्पॉट झाले. मुलगी राहासह आलिया आणि रणबीर सर्वात आधी विमानतळावर पोहोचले होते. दरम्यान, रणबीरची आई-अभिनेत्री नीतू कपूर थोड्या वेळाने विमानतळावर पोहोचली. चिमुकल्या राहाने आजीला पाहिलं आणि तिची कळी खुलली. आजीशी बोलताना राहा कॅमेऱ्यात कैद झाली. आलिया आणि रणबीर हे बाहेर जाण्यासाठी विमानतळावर रवाना झाले होते. आता सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

आलिया आणि रणबीरबरोबर राहा झाली स्पॉट : या व्हिडिओमध्ये राहा आई आलियाच्या कडेवर असल्याचं दिसत आहे. तसेच रणबीर हा आलियाच्या मागे असून तो विमानतळाच्या आत प्रवेश करायला जातो, तेव्हा अचानक त्याची आई नीतू कपूर तिथे पोहोचते. आजी नीतू कपूरला राहानं पाहिल्यानंतर ती तिच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करते. व्हायरल व्हिडिओमध्ये राहानं आजी नीतू कपूरला लडिवाळपणे काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला. यानंतर तिच्या आजीनं देखील गोड आवाजात उत्तर दिलं. मनमोहक संवादाचा प्रयत्न करत असताना राहा खूप क्यूट दिसते, हे व्हिडिओतून रणबीर-आलियाच्या चाहत्यांनी पुन्हा एकदा अनुभवलं. या सुंदर क्षणाव्यतिरिक्त, राहा विमानतळावर प्रवेश करण्यापूर्वी पापाराझींचा निरोप घेताना दिसली. आता राहाचा हा व्हिडिओ सोशल मीडिया यूजर्सला खूप आवडत आहे. अनेकजण तिचे सोशल मीडियाच्या माध्यमातून कौतुक करताना दिसत आहेत.

कपूर कुटुंबाचा लूक : राहाचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात आलिया राहाबरोबर कारमधून उतरताना ती दिसत आहे. फॅशनेबल कपूर कुटुंबाच्या एअरपोर्ट लूकबद्दल तर सांगायलाच हवं. आलियानं जाकीटसह टी-शर्ट आणि ट्राउझर्स परिधान केली होती. तसेच रणबीरनं प्लेन व्हाईट टी - शर्ट आणि मॅचिंग शूजसह हिरवं जॅकेट घातलं होतं. दुसरीकडे, नीतू कपूर ऑल-ब्लॅक लूकमध्ये दिसली आणि तिची नात राहानं पांढऱ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता. दरम्यान आलिया आणि रणबीरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर दोघंही 'लव्ह अँड वॉर'मध्ये एकत्र दिसणार आहे. या चित्रपटामध्ये त्यांच्याबरोबर विकी कौशल देखील असणार आहे.

हेही वाचा :

  1. बॉक्स ऑफिसवर 'किंग' विरुद्ध 'लव्ह अँड वॉर', 19 वर्षांनंतर शाहरुख आणि रणबीरमध्ये होईल संघर्ष - SRK and Ranbir Kapoor
  2. रणबीर कपूर आलिया भट्ट, विकी कौशल स्टारर 'लव्ह अँड वॉर'ला मिळाली नवीन रिलीज तारीख - Love and War Release Date
  3. रणबीर कपूर पहिला चित्रपट 'सावरिया'च्या अपयशानं खूश, म्हणाला- 'यामुळे आणखी मजबूत झालो' - ranbir kapoor and saawariya Movie

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.