हैदराबाद Sight connect App For Eye : आता डोळ्यांची प्राथमिक तपासणी करण्यासाठी तुम्हाला नेत्र तपासणी केंद्रात जाऊन रांगेत उभं राहण्याची गरज नाही. आता तुम्ही घरबसल्या डोळ्यांची तपासणी करू शकता. एवढेच नाही तर समस्या काही मिनिटांतच ओळखू शकता. नुकतेच LV Prasad Eye Institute द्वारे 'Sight connect App' नावाचं विशेष ॲप लाँच करण्यात आलं आहे. या ॲपच्या मदतीनं तुम्ही घरबसल्या डोळ्यासंबंधित समस्या ओळखू शकता तसंच डोळ्यांची प्राथमिक तपासणी देखील करू शकता. इन्फोसिसच्या सहकार्यानं हे ॲप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे.
Sight connect App ॲप कसं कार्य करते?
स्मार्ट फोन मधील गुगल प्ले स्टोर (Google Play Store) आणि ॲपल स्टोर (Apple Store) येथे 'साइट कनेक्ट' नावाचं हे ॲप्लिकेशन उपलब्ध आहे. त्यावरून हे आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून इन्स्टॉल करून घ्यावं.
ॲप सुरू करण्यासाठी त्यामध्ये तुम्हाला तुमचा फोन नंबर टाकावा लागेल. फोन नंबर टाकल्यावर पडताळणीसाठी ओटीपी (OTP) मिळेल. तो विचारलेल्या जागी प्रविष्ट करावा.
मूल्यांकन प्रक्रिया: एकदा लॉग इन केल्यानंतर, वापरकर्त्यांना 21 प्रतिमा दाखवल्या जातील. प्रत्येक चित्रानंतर एक प्रश्न विचारण्यात येईल. हे चित्र पाहून आणि प्रश्नांची उत्तरे देऊन, वापरकर्ते त्यांच्या डोळ्यांच्या आरोग्याची प्राथमिक तपासणी करू शकतात.
फायदे आणि वैशिष्ट्ये
तत्काळ परिणाम: Sight connect App वापरकर्ते फक्त 5 मिनिटांत आपल्या डोळ्यांची समस्या शोधू शकतात.
सल्ला पर्याय: ॲपला संभाव्य दृष्टीदोष (नजीक दृष्टिदोष) आढळल्यास, वापरकर्त्यांना सर्वसमावेशक डोळ्यांच्या तपासणीसाठी नेत्ररोग तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचा सल्ला दिला जातो.
यूजर फ्रेंडली: ॲप अशा प्रकारे डिझाइन केलं आहे की, तंत्रज्ञानाशी फारसे परिचित नसलेले लोकदेखील तो वापरू शकतात.
डोळ्यांच्या सामान्य समस्यांवर उपाय: वायुप्रदूषण, कुपोषण, व्हिटॅमिन-ए ची कमतरता इत्यादींमुळे डोळ्यांच्या वाढत्या समस्या लक्षात घेऊन हा ॲप विकसित करण्यात आला आहे. डोळ्यांची समस्या जसे की, मोतीबिंदू आणि कॉर्नियाच्या नुकसानीचे निदान केले जाऊ शकते. पण बरेच लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी कालांतराणे मोठी समस्या निर्माण होते. त्यामुळे तुम्ही Sight connect App वापरून प्राथमिक तपासणी करू शकता आणि समस्या गंभीर होण्यापासून स्वतःच बचाव करू शकता.
डोळ्यांच्या आरोग्याच्या जागरूकतेवर परिणाम: वयानुसार दृष्टी कमकुवत होते. बरेच लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि डॉक्टरांचा सल्ला घेत नाहीत. अशा दुर्लक्षामुळे गंभीर समस्या आणि अंधत्व येऊ शकते. अशा परिस्थितीत, Sight connect Appडोळ्यांच्या समस्या शोधण्यात आणि त्यानुसार उपचार करण्यात मदत करते.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचकांसाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा. )
हेही वाचा