ETV Bharat / technology

Realme Narzo 70 Turbo 5G फोनचा आज भारतात सेल सुरू, 2 हजारांची मिळणार सूट? - Realme Narzo 70 Turbo 5G sale

Realme Narzo 70 Turbo 5G : तुम्ही नवीन गेमिंग फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही 15 हजार रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये Realme चा नवीन लॉन्च केलेला गेमिंग फोन Realme Narzo 70 Turbo 5G घेऊ शकता. Realme चा हा फोन मोटर-स्पोर्ट्स डिझाइनसह येतो. फोन तीन रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करता येईल. आज या फोनची थेट विक्री सुरू होणार आहे.

Realme Narzo 70 Turbo 5G
Realme Narzo 70 Turbo 5G (Realme)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Sep 16, 2024, 11:35 AM IST

हैदराबाद Realme Narzo 70 Turbo 5G : Realme चा नुकताच लॉन्च केलेला फोन Realme Narzo 70 Turbo 5G फोन भारतात 9 सप्टेंबर रोजी लॉन्च झाला होता. आज म्हणजेच 16 सप्टेंबर रोजी या फोनची थेट विक्री होणार आहे. तुम्ही ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon वरून फोन घेऊ शकता. या फोनची पहिला सेल आज दुपारी 12 वाजता लाइव्ह होईल. Realme चा हा फोन आज 15 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत सादर केला जात आहे. चला फोनचे स्पेसिफिकेशन, किंमत आणि विक्री यासंबंधीच्या तपशीलांवर एक नजर टाकूया...

Realme Narzo 70 Turbo 5G चं प्रोसेसर : Realme Narzo 70 Turbo फोनमध्ये डायमेंसिटी 7300 एनर्जी 5G चिपसेट, 4nm प्रोसेस, ऑक्टा-कोर, 2.5GHz पर्यंत CPU आणि आर्म माली-G615 GPU मिळतोय. ज्यामुळं वापरकर्त्यांना चांगला अनुभव मिळेल.

डिस्प्ले : फोनचा 6.67 इंच 120Hz OLED Esports डिस्प्ले आहे. याचा 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट आणि 1080, 2400 FHD+ रिझोल्यूशनसह 2000nits पीक ब्राइटनेससह येतो.

रॅम आणि स्टोरेज : Realme फोन 6GB/8GB/12GB LPDDR4X रॅम आणि 128GB/256GB UFS 3.1 स्टोरेजसह उपलब्ध आहे.

कॅमेरा : फोनमध्ये 50MP AI कॅमेरा + 2MP पोर्ट्रेट कॅमेरा आणि सेल्फीसाठी 16MP सेल्फी कॅमेरा दिलेला आहे.

बॅटरी : गेमिंग फोनला 5000mAh शक्तिशाली बॅटरी आणि 45W फास्ट चार्ज सपोर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं फोनची चार्जिंग लवकर होते. तसंच चार्जिंग बराच काळ टिकण्याचा दावा कंपनीनं केलाय.

फोनची किंमत : कंपनीनं Realme Narzo 70 Turbo 5G ला 16 हजार 999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत आणलं आहे. फोन तीन प्रकारांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो.

6Gb+128GB व्हेरिएंट 16 हजार 999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो.

8Gb+128GB व्हेरिएंट 17 हजार 999 रुपयांना खरेदी करता येईल.

12Gb+256GB व्हेरिएंट 20 हजार 999 रुपयांना विकत घेता येईल.

आज सेलमध्ये, प्रत्येक व्हेरियंटवर 2000 रुपयांची सूट मिळू शकते. म्हणजेच तुम्ही नवीन Realme फोन रु. 14 हजार 999 च्या सुरुवातीच्या किमतीत घरी घेऊन जाऊ शकता. हा फोन टर्बो यलो, टर्बो ग्रीन आणि टर्बो पर्पल या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करता येईल.

हे वाचलंत का :

  1. थोड्याच वेळात वॉटरप्रूफ रेटिंगसह Motorola Edge 50 Neo लॉन्च होणार - Motorola Edge 50 Neo
  2. Honor 200 Lite 5G लाँचची तारीख जाहीर, 108MP रियर कॅमेरा - Honor 200 Lite 5G
  3. Realme P2 Pro 5G लॉंन्च, 80 वॅट फास्ट चार्जिंगची सुविधाही - Realme P2 Pro 5G Launch

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.