मुंबई Ajit Pawar At Lalbaugcha Raja : बाप्पाच्या विसर्जनाला आता अवघे काही तास उरलेले असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी 'लालबागचा राजा'चं दर्शन घेतलं. अजित पवार नेहमीच सकाळी लवकर आपल्या कामाला सुरुवात करतात. आजच्या दिवसाच्या कामाची सुरुवात अजित पवार यांनी 'लालबागचा राजा'चं दर्शन घेऊन केली आहे. सध्या 'लालबागचा राजा'ला राजाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाली. राजाचं यंदाचं रूप आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मुंबईकर 'लालबागचा राजा'च्या दर्शनासाठी दाखल झाले. अशातच अजित पवार यांनी देखील आज सकाळी लालबागचा राजाचं दर्शन घेतलं.
नवसाला पावणारा बाप्पा अशी 'लालबागचा राजा'ची ओळख : नवसाला पावणारा गणपती अशी 'लालबागचा राजा'ची ओळख आहे. त्यामुळे इथं देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपासून ते अगदी सामान्य मुंबईकरांपर्यंत सर्वजण दर्शनासाठी येत असतात. अंबानी कुटुंबीयांपासून ते उपराष्ट्रपती, अनेक केंद्रीय मंत्री यांच्यासह अनेक सेलिब्रिटी देखील दर्शनासाठी येत असतात. अशातच मागील काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेमुळे चर्चेत असलेले अजित पवार आज पहाटे साडेसहा वाजताच राजाच्या दर्शनासाठी दाखल झाले.
बाप्पाच्या विसर्जनाला उरले आता केवळ काही तास : विसर्जनाला आता केवळ अजून काही तास उरलेले आहेत. त्यामुळे भाविकांची गर्दी लक्षात घेता, 'लालबागचा राजा' विश्वस्त मंडळानं आज पहाटेपासूनच बाप्पाच्या चरणस्पर्शाची रांग बंद केली आहे. तर, राजाच्या मुखदर्शनाची रांग आज रात्री बारा वाजल्यानंतर बंद करण्यात येणार आहे. बारा बारा तास तर काही वेळा संपूर्ण दिवसभर देखील रांगेत उभं राहून राजाचे भक्त बाप्पाच्या चरणी आपलं गाऱ्हाणं मांडतात. आता राजाच्या विसर्जनला अवघे काही तास उरलेले असल्यानं बाप्पाचं शेवटचं रूप डोळ्यात साठवण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक लालबाग परिसरात गर्दी करत असल्याचं चित्र आहे.
हेही वाचा :