नवी दिल्ली : एका महत्त्वपूर्ण निर्णयात, केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं (CCPA) Ola ला तक्रार निवारण प्रक्रियेदरम्यान ग्राहकांना त्यांच्या पसंतीच्या पद्धतीनुसार थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये किंवा कूपनद्वारे परतावा प्रदान करण्याचे निर्देश दिले आहेत. याव्यतिरिक्त, ओलाला त्यांच्या सेवांमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी प्लॅटफॉर्मवरून बुक केलेल्या सर्व ऑटो राइड्ससाठी ग्राहकांना बिलं प्रदान करण्याचं निर्देश देण्यात आले आहेत.
परतावा करण्याचे निर्देश : केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं (CCPA) राइड-हेलिंग प्लॅटफॉर्म, Ola ला ग्राहकांना पसंतीची परतावा पद्धत निवडता येणार आहे. कारण CCPA नं कंपनीला तक्रार निवारण प्रक्रियेदरम्यान ग्राहकांना त्यांच्या बँक खात्यात किंवा कूपनद्वारे त्यांच्या पसंतीचा परतावा करण्याचे निर्देश दिले आहेत. ओलाला त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून बुक केलेल्या सर्व ऑटो राइड्ससाठी ग्राहकांना बिलं, पावत्या देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या शिफारशींमुळं कंपनीच्या सेवांमध्ये अधिक पारदर्शकता येण्याची शक्यता आहे.
त्याच फॉर्ममध्ये परतावा द्या : कोणत्याही ग्राहकानं ओला ॲपवर परताव्याची तक्रार केल्यास, कंपनी त्याला परतावा म्हणून एक कूपन देतं, ज्याचा वापर तो ओला ॲपवरील त्याच्या पुढील राइडसाठीच करू शकतो. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं (सीसीपीए) रविवारी (13 ऑक्टोबर) कंपनीला हा आदेश जारी केला. नियामकानं सांगितलं की, 'ग्राहकानं थेट त्याच्या बँक खात्यात परतावा देण्याची विनंती केल्यास Ola Cabs ला त्याच फॉर्ममध्ये परतावा द्यावा लागेल.'
ग्राहकांच्या हक्कांचं उल्लंघन : रिफंडचा पर्याय न देणं, हे ग्राहकांच्या हक्कांचं उल्लंघन आहे, असं ग्राहक मंत्रालयानं म्हटलं आहे. CCPA मुख्य आयुक्त निधी खरे यांनी Ola ला त्यांच्या प्लॅटफॉर्मवर बुक केलेल्या सर्व ऑटो राइड्ससाठी ग्राहकांना बिले किंवा पावत्या देण्याचे निर्देश दिले आहेत.एखाद्या ग्राहकाला प्लॅटफॉर्मवर बुक केलेल्या ऑटो राइडसाठी कूपन घ्यायचं असेल, तर ॲप 'ऑटो सर्व्हिस नॉर्म्समधील बदलचा हवाला देऊन तसं करण्यास नकार देते.
2 हजारांहून अधिक तक्रारी : या वर्षी 9 ऑक्टोबरपर्यंत कंपनीविरोधात 2 हजारांहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या वर्षी 9 ऑक्टोबरपर्यंत, राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन (NCH) वर Ola विरुद्ध 2,061 तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या, त्यापैकी बहुतांश भाडं बुकिंग आणि ग्राहकांना परतावा न मिळण्याशी संबंधित होत्या. त्यामुळं गेल्या आठवड्यात कंपनीला सीसीपीएनं कारणं दाखवा नोटीस बजावली होती. गेल्या आठवड्यात, CCPA नं ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीला ग्राहक हक्कांचं उल्लंघन, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि अनुचित व्यापार पद्धतींबद्दल कारणं दाखवा नोटीस जारी केली होती. NCH वर सूचीबद्ध कंपन्यांच्या विरोधात 10 हजारांहून अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत.
ओला पैसे कसे कमवते? : ओला फक्त कॅब बुकिंग सेवा देते. कंपनीकडं कोणतीही कार नाही. असं असूनही कंपनी पैसे कसे कमवते? ग्राहक आणि ड्रायव्हर्सना त्याच्या ॲपद्वारे जोडणे हे ओलाचं काम आहे. ओला ॲपवर केलेल्या बुकिंगमधून टक्केवारी कमिशन घेते. अशा प्रकारे कंपनी कमाई करते. भारताव्यतिरिक्त, Ola ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युनायटेड किंगडममध्ये देखील सेवा प्रदान करते. ऑस्ट्रेलियातील 7 शहरांमध्ये ओला आहे. ऑस्ट्रेलियात ओला ॲपवर 41 हजार ड्रायव्हर्स उपलब्ध असल्याचा कंपनीचा दावा आहे. कंपनीनं 2019 मध्ये युनायटेड किंग्डममध्ये ऑटो-रिक्षा सुरू केलीय.
हे वाचलंत का :