हैदराबाद BSNL NEW LOGO : सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी BSNL नं आपला नवीन लोगो आणि घोषवाक्य बदलं आहे. दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मंगळवारी बीएसएनएल मुख्यालय, नवी दिल्ली येथे नवीन चिन्हाचं (LOGO) अनावरण केलं. यावेळी ते म्हणाले की, बीएसएनएलचा नवीन लोगो विकास, पोहोच आणि विश्वासाचं प्रतीक आहे.
ग्राहकांची संख्या 1 कोटी 80 लाख : यावेळी सिंधिया यांना BSNL च्या सात नवीन सेवांचा देखील सुभारंभ केला. यावेळी बोलताना ते म्हणाले, भारताला सुरक्षित, स्वस्त आणि विश्वासार्ह पद्धतीनं जोडण्याचं आमचं ध्येय आहे. भारत संचार निगम लिमिटेडनं 4G नेटवर्क सुरू केल्यापासून, गेल्या सहा महिन्यांत ग्राहकांची संख्या 75 लाखांवरून 1 कोटी 80 लाखांपर्यंत पोहचीय.
Today, @BSNLCorporate is no longer a follower, it is a leader. It is the only telecom service provider to launch a bouquet of 7 services in one day, that is Made in Bharat, Made by Bharat and Made for Bharat. #Connectivity4All #AatmanirbharBharat pic.twitter.com/0bYttXx1R9
— Jyotiraditya M. Scindia (@JM_Scindia) October 22, 2024
BSNL च्या 7 नवीन सेवांचा शुभारंभ : भारत जगातील सहा देशांमध्ये सामील झाला आहे, ज्यांनी स्वतःचं 4-जी नेटवर्क विकसित केलं आहे. लवकरच आपण 5-जी नेटवर्कमध्ये प्रवेश करणार आहोत. सिंधिया यांनी आज लॉन्च केलेल्या बीएसएनएलच्या 7 नवीन सेवांमध्ये स्पॅम मुक्त नेटवर्क, राष्ट्रीय वाय फाय रोमिंग, इंट्रानेट फायबर टीव्ही, सिम किओस्क, थेट-टू-डिव्हाइस सेवा, सार्वजनिक सुरक्षा आणि आपत्तीचा यात समावेश आहे.
Hon'ble Minister of Communications Sh @JM_Scindia launched BSNL's NEW LOGO, in the presence of Hon'ble MoS Dr @PemmasaniOnX
— DoT India (@DoT_India) October 22, 2024
The new logo reflects BSNL's unwavering mission of " connecting bharat – securely, affordably, and reliably” pic.twitter.com/IExoGXJGSR
स्पॅम ब्लॉकिंग सोल्यूशनची घोषणा : स्पॅमची भीती यापुढं तुम्हाला त्रास देणार नाही. स्पॅम-ब्लॉकिंग सोल्यूशनची घोषणा आज करण्यात आलीय. त्यामुळं ग्राहकांना आता फसवणूक किंवा फिशिंगसाठी कॉल केल्यास तो फिल्टर होईन ब्लॉक केला जाईल.
हायस्पीड इंटरनेट देशभरात उपलब्ध : BSNL FTTH (फायबर-टू-द-होम) ग्राहकांसाठी राष्ट्रीय वाय-फाय रोमिंग सेवा देखील जाहीर केली आहे. यामुळं ग्राहकांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय देशभरात हाय-स्पीड इंटरनेटचा वापर करता येईल. यासोबतच BSNL ने 500 हून अधिक लाइव्ह चॅनेलसह आपल्या प्रकारची पहिली फायबर-आधारित इंट्रानेट टीव्ही सेवा सुरू केली. कंपनीनं म्हटलं आहे की टेलिव्हिजनचा वापरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या डेटामुळं ब्रॉडबँड डेटा पॅक कमी होणार नाही.
थेट डिव्हाइस कनेक्टिव्हिटी : BSNL ने डायरेक्ट-टू-डिव्हाइस कनेक्टिव्हिटी सोल्यूशन देखील जाहीर केल, जे कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी उपग्रह आणि स्थलीय मोबाईल नेटवर्क्सना एकत्रित करेल. या सेवेमुळे टेरेस्ट्रियल नेटवर्क नसलेल्या भागात टेक्स्ट मेसेज पाठवणे आणि UPI पेमेंट करणे शक्य होईल.
संकटात मदत होईल : यामुळे आपत्ती आणि संकटात मदत होईल .सरकारी दूरसंचार कंपनी आपत्ती आणि संकटाच्या वेळी सरकार आणि मदत संस्थांसाठी एनक्रिप्टेड संप्रेषण देखील प्रदान करेल. आपत्तींच्या काळात ड्रोन-आधारित सेवा आणि बलून-आधारित प्रणालीचा वापर होईल.
कोळसा खाणीतही नेटवर्क : कंपनीने भारतातील कोळसा खाणींसाठी पहिलं कॅप्टिव्ह 5G नेटवर्क देखील सादर केलं. C-DAC च्या भागीदारीत आणि स्थानिक पातळीवर उत्पादित 5G उपकरणांचा वापर करून, नेटवर्क भूमिगत खाणी आणि मोठ्या ओपनकास्ट खाणींमध्ये प्रगत AI आणि IoT अनुप्रयोग सक्षम करेल. अनुप्रयोगांमध्ये सुरक्षा विश्लेषण, उपकरणांचं रिअल-टाइम रिमोट कंट्रोल आणि ऑगमेंटेड-रिॲलिटी सक्षम रिमोट मेंटेनन्स, फ्लीट ट्रॅकिंग आणि ऑप्टिमायझेशन समाविष्ट आहे.