हैदराबाद : भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ही दळणवळण (Communication field) क्षेत्रात मागास समजली जाणारी सरकारी दूरसंचार कंपनी आता वेगानं सुधारणा करत आहे. कंपनी 4G आणि 5G नेटवर्कवर काम करत आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला 5G नेटवर्क लॉंच होण्याची शक्यता आहे. मात्र, आता BSNL नं देशातील निवडक भागात पहिली फायबर आधारित इंट्रानेट टीव्ही सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे.
#BSNL redefines home entertainment with IFTV – India’s First Fiber-Based Intranet TV Service! Access 500+ live channels and premium Pay TV content with crystal-clear streaming over BSNL’s FTTH network. Enjoy uninterrupted entertainment that doesn’t count against your data limit!… pic.twitter.com/ScCKSmlNWV
— BSNL India (@BSNLCorporate) November 11, 2024
BSNL ची राष्ट्रीय वाय फाय रोमिंग सेवा : कंपनीनं ही सेवा IFTV या नावानं सुरू केली आहे. बीएसएनएलच्या नवीन लोगोच्या अनावरणासह इतर सहा नवीन सेवा गेल्या महिन्यात पहिल्यांदा लॉंच करण्यात आली होत्या. हे बीएसएनएलचं फायबर-टू-द-होम (FTTH) नेटवर्क वापरणाऱ्या वापरकर्त्यांना थेट टीव्ही सुविधा प्रदान करणार आहे. त्यातच BSNL नं राष्ट्रीय वाय फाय रोमिंग सेवा देखील सुरू केली आहे. ज्यामुळं कंपनीच्या ग्राहकांना देशभरातील BSNL हॉटस्पॉट्सवर हाय-स्पीड इंटरनेट वापरण्याची परवानगी मिळणतेय. तसंच ग्राहकांच्या डेटाची बचत देखील यामुळं होतेय.
BSNL IFTV सेवा : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर एका पोस्टमध्ये, BSNL नं ही माहिती दिलीय. BSNL ची नवीन IFTV सेवा मध्य प्रदेश आणि तामिळनाडूमधील ग्राहकांना 500 हून अधिक थेट टीव्ही चॅनेलचा आनंद घेता येणार आहे. याशिवाय, ते पे टीव्ही सामग्री (Pay TV content) देखील प्रदान करेल. Reliance Jio आणि Bharti Airtel द्वारे ऑफर केलेल्या इतर लाइव्ह टीव्ही सेवांप्रमाणे स्ट्रीमिंगद्वारे वापरला जाणारा डेटा मासिक कोट्यातून वजा केला जातो. तसा डेटा BSNL वजा करणार नाहीय.
डेटा कापला जाणार नाही : बीएसएनएलचे म्हणणे आहे की, टीव्ही स्ट्रीमिंगसाठी वापरलेला डेटा त्यांच्या डेटा पॅकमधून कापला जाणार नाही. विशेष बाब म्हणजे बीएसएनएल टीव्ही स्ट्रीमिंगसाठी अमर्यादित डेटा देईल. थेट टीव्ही सेवा कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय केवळ BSNL FTTH ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली जात आहे.
IFTV Android TV वर उपलब्ध : सेवा BNSL नं पुष्टी केली आहे की ते लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म आणि स्ट्रीमिंग ॲप्स जसं की Amazon Prime Video, Disney+ Hotstar, Netflix, YouTube आणि ZEE5 साठी समर्थन देईल. याशिवाय कंपनी यासोबत गेमही सादर करणार आहे. IFTV सेवा सध्या फक्त Android TV वरच काम करेल. Android 10 किंवा त्यानंतरचे टीव्ही असलेले ग्राहक Google Play Store वरून BSNL Live TV ॲप डाउनलोड करू शकतात. BSNL च्या IFTV सेवेची सदस्यता घेण्यासाठी, ग्राहक Play Store वरून BSNL Selfcare ॲप डाउनलोड करू शकतात आणि त्यासाठी नोंदणी करू शकतात.
'हे' वाचलंत का :