ETV Bharat / technology

20 डिसेंबर रोजी आतापर्यंतचं सर्वोत्तम बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर लॉंच होणार - NEW CHETAK SCOOTER LAUNCH DATE

बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर देशात वेगानं लोकप्रिय होत आहे. कंपनी या स्कूटरचे अनेक प्रकार विकत आहे. त्यामुळंच कंपनी नविन चेतक इलेक्ट्रिक स्कूटर लॉंच करणार आहे.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Dec 7, 2024, 8:51 AM IST

हैदराबाद : बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर देशात नविन ईव्ही लॉंच करण्याची तयारी करत आहे. कंपनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये अपडेट चेतक ईव्ही समाविष्ट करणार आहे. कंपनी या महिन्यात 20 डिसेंबर रोजी ही नवीन स्कूटर लॉंच करणार आहे. या स्कूटरला नवीन चेसिस आणि मोठी बूट स्पेस मिळेल. मात्र, त्याची रचना सध्याच्या मॉडेलप्रमाणेच असेल. इतकेच नाही तर त्याची किंमतही सध्याच्या मॉडेलप्रमाणे असू शकते.

नवीन डिझाइन : आजकाल Ather Rizza, Ola S1, आणि TVS iQube सारखे स्पर्धक चेतकला टक्कर देताय. त्यामुळं बजाजला चेतकमध्ये अधुनिक वैशिष्ट्याचा समावेश करावा लागतोय. त्यामुळंच कंपनीनं नवीन चेतकसाठी चेसिस डिझाइन केलीय. ज्यामुळं ग्राहकांना अधिक बूट स्पेस मिळणार आहे. चेसिस डिझाइन, नवीन बॅटरी पॅक डिझाइनमधील बदलांमुळं त्याची कार्यक्षमता देखील वाढू शकते. बजाज चेतक सध्या मॉडेलवर अवलंबून 123 ते 137Km ची दावा केलेली IDC श्रेणी ऑफर करते. स्कूटरच्या डिझाइनसह इतर गोष्टी पूर्वीसारख्याच राहण्याची शक्यता आहे. चेतकची एक्स-शोरूम किंमत 96 हजार ते 1.29 लाख रुपये असू शकते.

3 लाखांहून अधिक इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री : बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरनं भारतीय बाजारपेठेत 3 लाख युनिट्सच्या विक्रीचा टप्पा ओलांडला आहे. जानेवारी 2020 मध्ये लॉंच झाल्यापासून, दुचाकी उद्योगासाठी SIAM घाऊक डेटानुसार चेतकनं ऑक्टोबर 2024 पर्यंत एकूण 3 लाख 3 हजार 621 युनिट्सची विक्री केली आहे. बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरची ऑक्टोबर 2024 मध्ये सर्वाधिक मासिक शिपमेंट आहे. हा टप्पा गाठण्यासाठी बजाज चेतकला जवळपास 5 वर्षे लागली आहेत. जून 2024 मध्ये 2 लाख युनिटचा टप्पा ओलांडल्यानंतर, बजाज चेतकनं केवळ चार महिन्यांत शेवटच्या 1 लाख युनिट विक्री केलीय.

हे वचालंत का :

  1. Xiaomi Pad 7 आणि Xiaomi Pad 7 Pro लवकरच लॉंच होणार
  2. Myntraची 'M-Now' सेवा सुरू, 30 मिनिटांत होणार डिलिव्हरी
  3. Realme 14x लॉंचसह संभाव्य वैशिष्ट्ये आले समोर, जाणून घ्या काय असेल खास?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.