ETV Bharat / technology

बजाज 100cc मध्येही CNG मोटरसायकल लाँच करणार - Bajaj 100cc CNG Motorcycle

author img

By ETV Bharat Tech Team

Published : Aug 27, 2024, 5:31 PM IST

Bajaj 100cc CNG Motorcycle : देशांतर्गत दुचाकी आणि तीनचाकी वाहन उत्पादक बजाज ऑटो पर्यायी इंधनावर भर देत आहे. बजाजनं फ्रीडम 125 सीएनजी दुचाकी लाँच केल्यानंतर, आता कंपनी 100cc आवृत्तीवर देखील काम करत आहे.

Bajaj 100cc CNG Motorcycle
बजाज 100cc मोटरसायकल (Etv Bharat national Desk)

हैदराबाद Bajaj 100cc CNG Motorcycle : देशांतर्गत वाहन उत्पादक बजाज ऑटो कंपनी पर्यायी इंधनामध्ये प्रयत्न करत आहे. यामुळं, एंट्री-लेव्हल कम्युटर सेगमेंट लक्षात घेऊन, कंपनी आता एक नवीन CNG मोटरसायकल विकसित करत आहे. कंपनी इथेनॉलवर चालणारी दुचाकी आणि तीनचाकी वाहने बाजारात आणण्यासाठी प्रयत्नशिल आहे. बजाज ऑटोचे सीईओ राजीव बजाज यांनी CNBC-TV18 ला दिलेल्या मुलाखतीत याची पुष्टी केलीय. कंपनी या वर्षी जुलैमध्ये बजाज फ्रीडम 125 CNG लाँच केल्यानंतर आपली CNG श्रेणी वाढवण्याचा विचार करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

नवीन सीएनजी मोटरसायकल : फ्रीडम 125 सीएनजी लॉन्च करताना, बजाज ऑटोनं 100cc सेगमेंटला लक्ष्य करत सीएनजी मोटरसायकल रेंजचा विस्तार करण्याचा आपला इरादा जाहीर केला होता. हिरो स्प्लेंडरनं एंट्री-लेव्हल कम्युटर सेगमेंटवर वर्चस्व कायम राखलं असताना, बजाज स्वतःच्या 100cc CNG मोटरसायकलसह हिरोला आव्हान देण्याची तयारी करत आहे. Hero Splendor+ ची किंमत 75,441 रुपये आहे. एक्स-शोरूम, बजाजच्या नवीन 100cc CNG मोटरसायकलला या सेगमेंटमध्ये लक्षणीय एंट्री करण्यासाठी स्पर्धात्मक किंमतीसह ऑफर देणं आवश्यक आहे. आत्तापर्यंत, बजाज ऑटोनं या मोटरसायकलची लॉन्च टाइमलाइन उघड केलेली नाही.

इथेनॉल वाहने देखील सादर केली जाणार : बजाज कंपनी पुढील महिन्यात दिल्ली येथे इथेनॉल वाहनांचं प्रदर्शन करणार आहे. बजाज ऑटो दुचाकी आणि तीनचाकी दोन्ही वाहनं या आर्थिक वर्षात प्रदर्शित करण्याची शक्यता आहे. बजाज कंपनी 1 लाख स्वच्छ ऊर्जा युनिटची मासिक विक्री गाठण्याचा प्रयत्न करत असल्याचं कंपनीचे सीईओ राजीव बजाज यांनी म्हटलं आहे.

'हे' वचालंत का :

  1. ऑटोपायलट मोडमुळं ड्रायव्हरचा वर्कलोड कमी : टेस्ला मॉडेल 3 काय आहे ऑटोपायलट फिचर - Tesla Full Self Driving mode
  2. टाटा कर्व्ह आयसीई, मारुती डिझायरसह 'या' 6 कार पुढील महिन्यात होणार लॉन्च - NEW CAR LAUNCHES IN SEP 2024
  3. भारतीय वंशाचे केवन पारेख Apple चे नवे CFO - Apple new CFO

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.