ETV Bharat / technology

इतर देशांपेक्षा भारतात आयफोन का विकला जातो महाग?, जाणून घ्या कारण - Apple iPhone 16 series price - APPLE IPHONE 16 SERIES PRICE

Apple iPhone 16 series price : जगभरात iPhone 16 सिरिजच्या किंमती कमी असूनही भारतात iPhone च्या किमत अधिक आहे. अमेरिका, संयुक्त अरब अमिराती (UAE), मलेशिया आणि थायलंड या देशांत किमत कमी असताना भारतात आयफोनची किंमत अधिक आहे. या मागचं कारण काय आहे? iPhone च्या किंमती भारतात कमी होईल का? चला जाणून घेऊया...

Apple iPhone
आयफोन (Etv Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Sep 23, 2024, 1:40 PM IST

हैदराबाद Apple iPhone 16 series price : भारतात प्रथमच Apple कंपनीनं प्रो आणि प्रो मॅक्ससह संपूर्ण iPhone 16 सिरिज असेंबल करण्याचा निर्णय घेतला आहे. चीन व्यतिरिक्त कंपनीनं भारतातच फक्त मोबाईल फोनचं असेंबल घेण्याचं बोललं जातंय. कंपनीनं भारतात महागड्या मॉडेल्सच्या किरकोळ किमती कमी केल्या असल्या तरी, iPhone ची किंमत जगातील अनेक देशांपेक्षा भारतात महाग आहेत. अमेरिका, संयुक्त अरब अमिराती (UAE), मलेशिया आणि थायलंड या देशांमध्ये आयफोची किमत कमी आहे. भारतात iPhone वर सर्वाधिक कर (GST) द्यावा लागत असल्यामळं फोनच्या किमती वाढल्या आहेत.

यामुळं होणार कमी किमंत : आयफोन 16 प्रो आणि प्रो मॅक्स लवकरच भारतात असेंबल करण्यात येणार आहे. त्यामुळे, आयफोन 15 मॉडेलच्या तुलनेत भारतात असेंबल केलेल्या iPhone 16 मॉडेल्सची किंमत कमी होणार आहे. त्यामुळं तुम्ही iPhone 16 Pro फक्त Rs 1 लाख 19 हजार 900 मध्ये खरेदी करू शकता. जो iPhone 15 Pro च्या सध्याच्या किमतीपेक्षा सुमारे 7.6 टक्के स्वस्त आहे. केंद्रीय अर्थसंकल्पानंतर फोनच्या सुट्या भागांवरील आयात शुल्कात कपात झाली असली, तरी या दोन्हींमध्ये खूप फरक आहे. जर आम्ही शुल्क कपात करण्यापूर्वी किंमत पाहिली तर, आयफोन 16 प्रो आयफोन 15 प्रो सीरिजच्या सुरुवातीच्या किंमतीपेक्षा 15 हजार रुपये कमी आहे.

GST मुळं खिशाला भुर्दंड : हीच गोष्ट iPhone 16 Pro Max वर लागू होते. हे मॉडेल आता पूर्वीच्या iPhone 15 Pro Max च्या तुलनेत 9 हजार 100 रुपयांनी स्वस्त झालं आहे. ही किंमत बजेटनंतरची आहे. 15 प्रो मॅक्स गेल्या वर्षी बाजारात लॉन्च करण्यात आला होता. सुरुवातीच्या किमतीच्या तुलनेत, 16 प्रो मॅक्स 15 स्वस्त आहे. मात्र, यावर 18 टक्के जीएसटी आकारण्यात आला असून त्याचा बोजा पूर्णपणे ग्राहकांच्या खांद्यावर पडला आहे. त्यामुळं भाव जास्त झाले आहे. याशिवाय चीनमधून येणाऱ्या भागांवर 7 ते 8 टक्के आयात शुल्क आहे. याचा मोठ्या प्रमाणात भार कंपनीनंच उचलला आहे. पण फोनवर डीलर मार्जिन देखील 10 ते 12 टक्के आहे.

इतर देशात आयफोन स्वस्त का? : भारतात कंपनीच्या मालकीची फक्त दोन स्टोअर आहेत. पण अमेरिकेसारख्या बाजारपेठेत, 95 टक्के विक्री टेलिकॉम कंपन्यांद्वारे होते. तिथं 247 पेक्षा जास्त कंपनीच्या मालकीची स्टोअर्स आहेत. मग त्या देशांमध्ये आयफोन स्वस्त का? पहिलं कारण म्हणजे कमी स्थानिक कर. अमेरिकेत जीएसटीऐवजी मूल्यवर्धित कर लागू केला जातो, जो राज्यानुसार बदलतो. पण तो 5 ते 9 टक्के म्हणजे भारतात जीएसटीच्या निम्मा आहे. Apple नं जाहीर केलेल्या मूळ किमतीत 7 टक्के सरासरी मूल्यवर्धित कर जोडला गेला तरीही, सुरुवातीच्या मॉडेलच्या किमतीत 4 हजार 700 रुपये आणि टॉप एंड मॉडेलमध्ये 7 हजार रुपयांचा फरक असेल. तरीही अमेरिका आणि भारतातील आयफोनच्या किमतीतील तफावत खूप जास्त असेल.

दुबईत आयफोनवर फक्त 5 टक्के कर : आयफोन खरेदी करणाऱ्यांसाठी दुबई देखील आकर्षक आहे. अनेक भारतीय तेथून आयफोन खरेदी करतात. दुबईत आयफोनवर फक्त 5 टक्के आणि थायलंडमध्ये 7 टक्के कर आहे. मलेशियामध्ये त्याचा दर 6 टक्के आणि व्हिएतनाममध्ये 10 टक्के आहे. कॅनडामध्ये तुम्ही 5 ते 15 टक्के करासह आयफोन खरेदी करू शकता. UAE (दुबई), थायलंड, मलेशिया, व्हिएतनाम सारख्या देशांमधून आयफोन खरेदी करण्याचा फायदा असा आहे, की त्यांनी परतताना काही अटी पूर्ण केल्यास त्यांना भरलेल्या स्थानिक कराचा परतावा मिळतो. त्यामुळं, त्या देशांमध्ये Apple फोनची मूळ किमतीत तुम्हाला फोन मिळतो.

का वाढली iPhone ची किमंत : भारतातील विविध करांमुळं आयफोनच्या किमती इतर देशांपेक्षा अधिक महाग आहे. iPhones मध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रिंटेड सर्किट बोर्ड असेंबलीवर (PCBA) 20% आयात शुल्क आकारलं जातंय. आयफोन चार्जर्सवरही 20% आयात शुल्क आहे.18% वस्तू आणि सेवा कर (GST) iPhones लागू आहे. सध्या प्रो सीरीज iPhones भारतात असेंबल केले जात नाहीत, त्यामुळं त्यांच्यावर 22% आयात शुल्क आणि 2% सामाजिक कल्याण कर लागतो. आयफोनचे डिस्प्ले सॅमसंगनं बनवले आहेत, ज्यावर 20% आयात शुल्क देखील लागू होतं. सर्किट बोर्ड, ट्रान्झिस्टर आणि प्रोसेसरवरही आयात शुल्क आणि जीएसटी लागू आहे. या सर्व करांमुळं आयफोनची किंमत वाढली आहे.

हे वाचलंत का :

  1. अ‍ॅपलची 16 सिरीज लॉन्च, काय आहेत वैशिष्ट्ये?, तज्ज्ञांनी काय म्हटलंय? - iPhone 16 Sale
  2. आयफोन खरेदीसाठी नागरिकांची झुंबड, रात्रीपासूनच नागरिकांच्या लांबच लांब रांगा - iPhone 16 sale in India
  3. Apple iPhone 16 मालिकासह AirPods, स्मार्टवॉच लॉन्च - Apple AirPods 4 launched

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.