ETV Bharat / technology

ॲपलचा पहिला फोल्डेबल फोन 2026 मध्ये लॉंच होण्याची शक्यता, कसा असेल फोन? - APPLE FOLDABLE IPHONE

Apple 2026 मध्ये फोल्डेबल लॉंच करण्याची शक्यता आहे. नवीन अहवालानुसार, Apple foldable iPhone ची वाढती मागणी लक्षात घेऊन कंपनी हा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

Apple foldable iPhone
ॲपलचा पहिला फोल्डेबल फोन (Apple Hub X Account)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Dec 5, 2024, 10:18 AM IST

Updated : Dec 7, 2024, 9:15 AM IST

हैदराबाद Apple first foldable iPhone : फोल्ड स्मार्टफोन मार्केटमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये स्थिर वाढ झालीय. ज्यामध्ये Samsung, Huawei आणि Motorola सारख्या प्रमुख कंपन्यांनी त्यांचे फोल्डेबल फोन बाजारात उतरवले आहेत. विशेषतः, सॅमसंगची Galaxy Z सीरीज बाजारपेठेत धुमाकूळ घालतेय. या सीरीजला ग्राहकांची मोठी पसंती मिळतेय. त्यामुळं कंपनी प्रत्येक सीरीजमध्ये नवीन सुधारित डिझाइनसह नविन फीचर आणत आहे.

2026 पर्यंत लॉंच होण्याची शक्यता : तुम्हीही ॲपलच्या फोल्डेबल आयफोनची वाट पाहत असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. एका नवीन अहवालात Apple चा फोल्डेबल फोन 2026 पर्यंत लॉंच होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, ॲपल कंपनीकडून याबाबत अधिकृत माहिती आलेली नाहीय.

Apple चा फोल्डेबल स्मार्टफोन : ॲपल कंपनी फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये उत्तम फीचर देखील आणण्याची शक्यता आहे. ॲपल कंपनी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरच्या गुणवत्तेसाठी ओळखली जाते. तसंत त्यांच्या फोनचं सुरक्षा फीचर देखील अप्रतिम आहे. यामुळं कपनीच्या फोनला भारतात उत्तम मागणी आहे. अलीकडंच कंपनीनं भारतात Apple फोनचं उत्पादन करण्याची घोषणा केली होती. तसंच भारतीय ग्राहकांची मागणी पाहता त्यांनी कंपनीचे आउटलेट वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. Apple फोल्डेबल आयफोन कसा असेल याची उत्सुकता आता सर्वांनाच आहे. हा फोन इतरांपेक्षा अनोखा असेल, या फोल्डेबल फोनमुळं बाजारात स्पर्धा निर्माण होइल.

फोल्डेबल फोन कसा असेल : DSCC (डिस्प्ले सप्लाय चेन कन्सल्टंट्स) च्या अलीकडील अहवालात फोल्डेबल स्मार्टफोन बाजारातील कमतरता भरून काढेल, असं नमूद करण्यात आलं आहे. फोल्डेबल फोनमध्ये 2019 ते 2023 पर्यंत दरवर्षी 40% वाढ झाल्यानंतर, 2024 मध्ये बाजार केवळ 5% वाढण्याची अपेक्षा आहे. 2025 मध्ये यात 4% नं घट होईल. Q3 2024 मध्ये फोल्ड करण्यायोग्य स्मार्टफोन डिस्प्लेची मागणी वार्षिक 38% असेल, असं अहवालात सांगण्यात आलं आहे.

Apple कडून अपेक्षा : Apple फोल्डेबल फोनमध्ये यात लवचिक OLED डिस्प्ले असेल. जो फोल्ड केल्यानंतरही कोणतंही फोनला नुकसान न करता ग्राहकांना चांगला अनुभव देईल. आयफोनची विद्यमान वैशिष्ट्ये नवीन फोल्डिंग फोनमध्ये असण्याची शक्यता आहे. ॲपलच्या प्रवेशामुळं फोल्डेबल स्मार्टफोन मार्केटला एक नवीन दिशा मिळू शकते, कारण बाजारात ग्राहकांना आणखी एक पर्याय मिळेल.

हे वाचलंत का :

  1. सॅमसंग, वनप्लस मोबाईलच्या खरेदीवर 30 हजारांची सूट - Foldable Phone Offers
  2. संगीत प्रेमींना झिंगाट होण्याची संधी, Xiaomi चा साउंड आउटडोअर वॉटरप्रूफ स्पीकर करतोय एंट्री
  3. OnePlus 12 वर 10 हजारांची सूट, OnePlus 13 लाँच होण्यापूर्वीच किंमत केली कमी

Last Updated : Dec 7, 2024, 9:15 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.