ETV Bharat / technology

ब्लॅक फ्रायडे सेलच्या निमित्तानं एअर इंडियाच्या तिकिटांवर बंपर सवलत, ऑफर मर्यादित कालावधीसाठी - AIR INDIA BLACK FRIDAY SALE

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. ब्लॅक फ्रायडे सेलच्या निमित्तानं एअर इंडियाच्या तिकिटांवर बंपर सूट मिळतेय. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी लागू आहे.

Air India
एअर इंडिया (Etv Bharat MH Desk)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Nov 30, 2024, 1:19 PM IST

हैदराबाद Air India Black Friday Sale : एअर इंडिया कंपनीनं ब्लॅक फ्रायडे सेलची घोषणा केली. या सेल अंतर्गत, देशांतर्गत उड्डाणांवर प्रवाशांना 20% पर्यंत सवलत मिळणार आहे. तसंच यूएसए, युरोप (यूकेसह) ऑस्ट्रेलिया, दक्षिण पश्चिम आशिया आणि दक्षिण आशिया यांसारख्या आंतरराष्ट्रीय उड्डाणावर12% पर्यंत सूट देण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे.

2 डिसेंबरपर्यंत मिळणार ऑफर : एअर इंडियानं प्रवाशांना मूळ भाड्यावर 20% पर्यंत सूट देण्यासाठी 96 तासांचा ब्लॅक फ्रायडे सेल सुरू केला आहे. विशेष सेल अंतर्गत, पुढील वर्षी 30 जून 2025 पर्यंतच्या प्रवासाचे बुकिंग 29 नोव्हेंबर रोजी दुपारी 12.01 ते 2 डिसेंबर रोजी रात्री 11.59 पर्यंत प्रवाशांना करता येणार आहे. ही ऑफर 30 ऑक्टोबर 202,5 ​​पर्यंतच्या प्रवासासाठी भारत, ऑस्ट्रेलिया भारत आणि उत्तर अमेरिकासाठी उपलब्ध असेल.

कुठं बुक करू शकता टीकीट ? : एअर इंडियाच्या वेबसाइट आणि मोबाइल ॲपवर प्रवासी तिकीट बुक करू शकतात. कंपनीनं सांगितलं की, ही विशेष टीकीट सवलत एअर इंडियाच्या अधिकृत वेबसाइटसह आणि iOS आणि अँड्रॉइड मोबाइल ॲपवर उपलब्ध आहे. ऑफरमधील जागा मर्यादित आहेत. यासोबतच कंपनी डिस्काउंटही देत ​​आहे.

विशेष पेमेंट-आधारित सूट : एअर इंडिया ब्लॅक फ्रायडे सेल दरम्यान विशेष पेमेंट-आधारित सूट देत आहे. UPI द्वारे पेमेंटसाठी, प्रवासी प्रोमो कोड UPIPROMO वापरून देशांतर्गत फ्लाइट्सवर 400 रुपये आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइटसाठी 1200 रुपये वाचवू शकतात. त्याचप्रमाणे, इंटरनेट बँकिंगद्वारे पेमेंट केल्यावर, देशांतर्गत उड्डाणांवर 400 रुपये आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर 1200 रुपयांची समान सूट मिळतेय. याशिवाय, बचत आणखी वाढवण्यासाठी, एअर इंडियाने विक्रीच्या कालावधीत वेबसाइट किंवा ॲपद्वारे केलेल्या सर्व बुकिंगसाठी सुविधा शुल्क माफ केलं आहे. यामुळं देशांतर्गत फ्लाइटवर ₹399 पर्यंत आणि आंतरराष्ट्रीय बुकिंगवर ₹999 पर्यंत अतिरिक्त बचत प्रावाशी करू शकता.

विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांनाही सुट : एअर इंडियानं विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांनाही दिलासा दिला आहे. या ऑफरसोबत सध्याच्या सवलती एकत्र करून त्यांना अधिक बचत करता येणार आहे. विद्यार्थ्यांना मूळ भाड्यात २५% पर्यंत बचत करता येणार आहे शकतात, तर ज्येष्ठ नागरिकांना ५०% पर्यंत सूट मिळणार आहे.

हे वाचलंत का :

  1. ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये स्मार्टफोन, टीव्ही, इअरबड्सवर 65% पर्यंत सूट; वाचा सविस्तर बातमी..
  2. Black Friday Sale 2024 : ब्लॅक फ्रायडे सेलचा धमका, 'कुठं' मिळतेय चांगली सूट? जाणून घ्या..
  3. 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी, सरकारच्या निर्णयाला 'मेटा'चा विरोध

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.