हैदराबाद : भारतातील आघाडीची दुचाकी उत्पादक TVS Motors नं TVS Apache RTR 160 4V ही 160 cc सेगमेंट बाइक अपडेटसह लॉंच केलीय. त्यात कोणत्या प्रकारची वैशिष्ट्ये आणि तांत्रिक बदल करण्यात आले आहेत? बाइक कोणत्या किंमतीला खरेदी करता येईल? या बातमीतून जाणून घेऊया...
Unstoppable Power. Unmatched Control.
— TVS Apache Series (@TVSApacheSeries) November 19, 2024
Introducing India’s most powerful 160cc motorcycle, TVS Apache RTR 160 4V now with Upside Down Suspension, refreshed race graphics and attractive colours.
Standout features:
17.55 PS power | 3 Ride Modes | Dual Channel ABS | Bluetooth… pic.twitter.com/B1G8iCIe4d
TVS RTR 160 4V अपडेटसह लाँच : TVS Motors नं 160 cc नेकेड बाइक सेगमेंटमध्ये ऑफर केलेली TVS Apache RTR 160 4V बाइक एका अपडेटसह भारतीय बाजारात लॉंच केली आहे. कंपनीनं अपडेटमध्ये काही नवीन फीचर्स आणि तंत्रज्ञान जोडले आहे. TVS Apache RTR 160 4V बाईकमध्ये 159.7 cc क्षमतेचं ऑइल-कूल्ड फ्युएल इंजेक्टेड 4 वाल्व्ह इंजिन आहे. यामुळं, बाइकला 17.55 पीएस पॉवर आणि 14.73 न्यूटन-मीटर टॉर्क मिळतं.
Unstoppable Power. Unmatched Control.
— TVS Apache Series (@TVSApacheSeries) November 19, 2024
Introducing India’s most powerful 160cc motorcycle, TVS Apache RTR 160 4V now with Upside Down Suspension, refreshed race graphics and attractive colours.
Standout features:
17.55 PS power | 3 Ride Modes | Dual Channel ABS | Bluetooth… pic.twitter.com/B1G8iCIe4d
काय आहेत फीचर : या दुचाकीत उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत. ज्यामध्ये सेगमेंटमध्ये पहिला 37 मिमी USD फोर्क देण्यात आला आहे. याशिवाय बाइक चालवण्यासाठी स्पोर्ट, अर्बन आणि रेन असे तीन मोड देण्यात आले आहेत. बाईकमध्ये TVS SmartXonnect तंत्रज्ञान देण्यात आलं आहे. या तंत्रज्ञानासह, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, कॉल आणि एसएमएस अलर्ट आणि व्हॉइस सहाय्य उपलब्ध आहे. बाईकमध्ये जीटीटी तंत्रज्ञान असून दुचाकी ट्रॅफिकमध्ये चालवणे सोपं होणार आहे. तसंच तुम्हाला ॲडजस्टेबल क्लच सुविधा यात मिळेल. सुरक्षेसाठी, बाइकला आरएलपी, एलईडी हेडलाइट आणि ड्युअल चॅनल एबीएससह टेल लॅम्पसह बुलपअप एक्झॉस्ट देण्यात आला आहे.
TVS Apache RTR 160 4V अपग्रेड : टीव्हीएस मोटर्सचे प्रीमियम बिझनेस हेड विमल सुंबळे म्हणाले की, आम्ही अत्याधुनिक वैशिष्ट्ये आणि प्रगत तंत्रज्ञानासह TVS Apache RTR 160 4V च्या अपग्रेडची घोषणा करण्यास उत्सुक आहोत. तंत्रज्ञान आणि शैली एकत्रित करून आमच्या ग्राहकांच्या विकसित होत असलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आम्ही भारतात परफॉर्मन्स दुचाकीसाठी नवीन मानके सेट केली आहेत.
काय किंमत आहे : TVS नं अपडेटेड Apache RTR 160 4V बाइकची एक्स-शोरूम किंमत 1.40 लाख रुपये ठेवली आहे.
रंग पर्याय : TVS Apache RTR 160 4V बाईक ग्रेनाइट ग्रे, मॅट ब्लॅक आणि पर्ल व्हाईट या रंगांमध्ये लॉंच करण्यात आली आहे. यासोबतच यात रेस-प्रेरित ग्राफिक्स, गोल्डन फिनिश USD फोर्क्स आणि लाल अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत.
हे वाचलंत का :