ETV Bharat / state

राजुऱ्यात फिल्मी स्टाईलनं हत्या; एक वर्षांपूर्वी झाला गोळीबार, आरोपीनं त्याच दिवशी त्याच वेळी घेतला बदला - Rajura Gun Shot Death Case - RAJURA GUN SHOT DEATH CASE

Rajura Gun Shot Death Case : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे फिल्मी स्टाईल हत्याकांड घडलं आहे. यात सुरुवातीला कोळश्याच्या अवैध व्यापारातून त्या दोघांमध्ये वैमनस्य निर्माण झालं. शिवजीत सिंग देवल नावाच्या आरोपीनं एका वर्षापूर्वी लल्ली शेरगिल याच्यावर गोळीबार केला होता. मात्र यात लल्ली बचावला. याचा वचपा काढण्यासाठी आरोपी लल्ली शेरगिल याने काल (23 जुलै) रोजी राजुरा येथे शिवजीतवर गोळीबार करून त्याला ठार मारले. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली.

Rajura Gun Shot Death Case
व्यापारातील वैमनस्यातून हत्या (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 24, 2024, 10:12 PM IST

चंद्रपूर Rajura Gun Shot Death Case : आपल्यावर झालेल्या गोळीबाराचा बदला घेण्यासाठी आरोपीने तोच दिवस आणि तीच वेळ निवडली. राजुरा सारख्या शहरात वर्दळीच्या ठिकाणी गोळीबार करत एका तरुणाचा खून करण्यात आला. ही घटना काल 23 जुलैला सायंकाळी घडली. पोलिसांनी आरोपी लल्ली शेरगिल याला अटक केली आहे. तर मृतकाचं नाव शिवजीत सिंग देवल (वय 25) असं आहे.

अवैध कोळसा व्यापारातून वैमनस्य : राजुरा-बल्लारपूर येथे वेकोलीच्या अनेक कोळसा खाणी आहेत. यात कोळशाची चोरी केली जाते. ह्या कोळशाची चोरी करणाऱ्या अनेक टोळ्या येथे निर्माण झाल्या आहेत. या अवैध व्यापारातून अनेकदा वैमनस्य निर्माण होतं आणि याचे पर्यवसान गॅंगवॉरमध्ये होते. अशा अनेक घटना यापूर्वी देखील झाल्या आहेत. ह्या घटनेला देखील अवैध कोळसा व्यापाराची पार्श्वभूमी आहे. याच वादातून आरोपी लल्ली शेरगिल आणि शिवजीत सिंग देवल यांच्यात वाद निर्माण झाला. आरोपी लल्ली याने शिवजीत याला मारहाण केली.

महिलेचा नाहक बळी : आपल्या भावाला होणाऱ्या मारहाणीचा बदला घेण्याचं लबज्योत सिंग देवल याने ठरवलं. त्याने सोबत एक अल्पवयीन घेतला. 23 जुलै 2023 सायंकाळी राजुरा शहरातील सोमनाथपूर वार्ड मधील रहिवासी लल्ली शेरगिल याच्या घराकडे मोर्चा वळवला. तो बाहेर येण्याची वाट दोघे बघत होते. लल्ली घराबाहेर निघताच त्याच्यावर लबज्योत सिंग देवल आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराने अंदाधुंद गोळीबार सुरू केला. स्वतःला वाचविण्याच्या प्रयत्नात तो शेजारी भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे यांच्या घरी पळत सुटला. यावेळी डोहे यांची पत्नी पूर्वशा डोहे बाहेर होती. मारेकऱ्यांनी अंधाधुंद गोळीबार चालू ठेवल्याने दोन गोळ्या त्यांना लागल्या तर लल्ली देखील गंभीर जखमी झाला. यानंतर मारेकरी दुचाकीने फरार झाले. पूर्वशा हिला उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. आरोपीकडून पोलिसांनी देशी कट्ट्यासहित 3 जिवंत काडतुसे जप्त केली होती. आरोपींनी एकूण 4 राउंड फायर केले होते. बलदेव हा या वादाचं कारण होता.

तोच दिवस, तीच वेळ आणि हत्या : लल्लीने या गोळीबाराचा बदला घेण्याचं ठरवलं आणि यासाठी तोच दिवस आणि तीच वेळ निवडली. 23 जुलैला सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास राजुरा शहरातील आसिफाबाद मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज व्यापार संकुल परिसरात मृतक शिवजीत सिंग देवल (वय 25) हा आला असताना लल्ली आणि त्याचा अल्पवयीन साथीदार हे पाळत ठेऊन होते. दुचाकीने आलेल्या लल्लीने थेट शिवजीतवर गोळीबार सुरू केला. पहिली गोळी चालली असताना आपला बचाव करण्यासाठी शिवजीत एका औषधीच्या दुकानामागे पळाला. मात्र, त्याचा पाठलाग करत हल्लेखोर त्याच्यापर्यंत येऊन पोहोचले आणि त्याच्यावर दोन गोळ्या झाडल्या. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्याच्या रात्रीच पोलिसांनी आरोपी लल्ली शेरगिल आणि त्याच्या साथीदाराला अटक केली.

पोलीस महानिरीक्षकाने दिली घटनास्थळी भेट : ही घटना घडल्यानंतर जिल्ह्यात कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. याची गंभीर दखल पोलीस महानिरीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनी घेतली असून आज त्यांनी राजुरा येथील घटनास्थळी जाऊन पाहणी केली तसेच पोलिसांना देखील याबाबत कडक निर्देश दिले आहेत. या संपूर्ण घटनाक्रमामुळे आता पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालणं गरजेचं झालं आहे.

हेही वाचा :

  1. बसपा नेते के आर्मस्ट्राँग हत्या प्रकरण : पोलिसांनी केलं मारेकऱ्याचं एन्काऊंटर - Rowdy Encounter in Chennai
  2. सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल; 'लॉरेन्स'बाबत पोलिसांचा मोठा दावा - Salman Khan House Firing Incident
  3. मनसे कामगार सेना जिल्हा प्रमुखावर गोळीबार; हल्लेखोरानं झाडल्या दोन गोळ्या, या अगोदर भावावर झाला होता हल्ला - Firing On MNS Leader
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.