ETV Bharat / state

पिण्याचं पाणी मागण्यावरुन झाली बाचाबाची अन् घरमालकानं घेतला मिस्त्रीचा जीव - Youth Killed In Nanded - YOUTH KILLED IN NANDED

Youth Killed In Nanded : घराचं बांधकाम सुरू असताना पिण्याच्या पाण्यावरुन मिस्त्री आणि घरमालकात वाद झाला. या वादातून मिस्त्री तरुणाचा घरमालकाकडून खून करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली. यावेळी घरमालकानं मिस्त्रीसह कामावरील महिलेला मारहाण केली.

Youth Killed In Nanded
मृत मिस्त्री आणि जखमी महिला (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 30, 2024, 11:54 AM IST

नांदेड Youth Killed In Nanded : पाणी मागण्याच्या कारणावरुन मिस्त्री काम करणाऱ्या तरुणाच्या डोक्यात फावडे मारुन घर मालकानं खून केल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना किनवट तालुक्यातील अंबाडी गावामध्ये बुधवार 29 मे रोजी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास घडली. यामध्ये वसीम शेख मेहबूब कुरेशी रा. इस्लामपुरा, किनवट या तरुणााचा जागीच मृत्यू झाला. अंबाडी इथं उत्तम गणपत भरणे याच्या घराचं बांधकाम सुरू आहे. या बांधकामावर वसीम शेख मेहबूब कुरेशी हा मिस्त्री म्हणून कामाला होता. या घटनेत विशाखा भारत मुनेश्वर ही महिला घरमालकाच्या मारहाणीत गंभीर जखमी झाली.

Youth Killed In Nanded
https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/30-05-2024/_30052024092851_3005f_1717041531_533.jpg (Reporter)

पिण्याचं पाणी मागण्यावरुन झाला वाद : पिण्याचं पाणी मागण्याच्या कारणावरुन आरोपी उत्तम भरणे आणि वसीम शेख यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर उत्तम गणपत भरणे यानं वसीम शेख मेहबूब कुरेशी याला फावड्यानं त्याच्या डोक्यात, पोटावर मारहाण केली. या मारहाणीत वसीम शेख हा जागीच मृत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. याशिवाय या घटनेत विशाखा भारत मुनेश्वर ( वय 53 वर्षे, रा. अंबाडी ) या महिलेलाही फावडे मारुन उत्तम भरणे यानं जखमी केलं. या महिलेला तेलंगणा राज्यातील आदीलाबाद इथं उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या घटनेनं किनवट परिसरात एकच खळबळ उडाली.

Youth Killed In Nanded
जखमी महिला (Reporter)

जमावानं मृतदेह आणला पोलीस ठाण्यात : मृत वसीम शेखचा मृतदेह जवळपास 300 ते 400 लोकांच्या जमावानं किनवट पोलीस ठाण्यात आणल्यानंतर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. त्यानंतर आरोपी उत्तम भरणे याला पोलिसांनी तत्काळ अटक करताच तणाव निवळला. मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. किनवटचे पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला आणि त्यांच्या पथकानं या प्रकरणाला योग्य पद्धतीनं हाताळलं. दरम्यान आरोपी उत्तम गणपत भरणे याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

कायदा हातात घ्याल तर कारवाई - कोकाटे : "किनवट तालुक्यातील अंबाडी इथं या घटनेतील आरोपीला पोलिसांनी तातडीनं अटक केली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. वरिष्ठ अधिकारी तिथं दाखल झाले आहेत. पोलीस प्रशासन कायदेशीर काम करत असताना विनाकारण जमाव जमवून कोणी कायदा हातात घेत असेल, तर त्यांच्याविरूद्ध कारवाई केली जाईल. यामुळे नागरिकांनी शांतता ठेवून पोलिसांना सहकार्य करावं," असं आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केलं आहे.

हेही वाचा :

  1. धक्कादायक! गर्लफ्रेंडची हत्या करून व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला लावला फोटो
  2. Nagaur Murder Case : फटाके फोडण्यावरून वाद; युवकाची धारदार शस्त्राने केली हत्या
  3. Pimpri Chinchwad Crime : रस्त्यात का थांबला म्हटल्यानं झाला वाद, चाकूने वार करत तरुणाची हत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.