ETV Bharat / state

नाशिकमध्ये कोयता गँगची दहशत; टोळक्याकडून तरुणाला मारहाण - Nashik Koyta Gang - NASHIK KOYTA GANG

नाशिक शहरात आठ जणांच्या कोयता गँगनं एका तरुणाला हॉकी स्टिक,स्टम्प व कोयत्याच्या साहाय्यानं मारहाण केल्याची घटना घडली आहे.

NASHIK KOYTA GANG
कोयता गँगची दहशत (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 4, 2024, 5:37 PM IST

नाशिक : नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. शहरातील सातपूर भागातील धात्रक चौकामध्ये आठ जणांच्या कोयता गँगनं एका तरुणाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. नवरात्रीनिमित्त सर्वत्र उत्साहाचं वातावरण असताना या कोयता गँगनं दहशत पसरवून नागरिकांना भयभीत करून सातपूर पोलिसांना आव्हान दिलंय. या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय.

नेमकं प्रकरण काय? : याबाबत अधिक माहिती अशी की, सातपूर भागातील धात्रक चौकामध्ये अ‍ॅक्टिवावरून श्रमिकनगरच्या दिशेनं जाणाऱ्या तीन तरूणांवर पाठीमागून पाठलाग करत आठ जणांच्या टोळक्यानं हल्ला केला. अ‍ॅक्टिवावरील दोघांनी जीव वाचवण्यासाठी पळ काढला. मात्र, अतुल खरे या तरुणास आठ जणांनी हॉकी स्टिक, स्टम्प व कोयत्याच्या साहाय्यानं डोकं, पाठ व पायावर जबरी वार केले. तरूणाच्या मदतीला येणाऱ्या नागरिकांना कोयते दाखवून घाबरवल्यामुळं कोणीही यात पडण्याची हिंमत केली नाही.

जखमीची प्रकृती चिंताजनक : अतुल सोबत असलेल्या दोघांनी त्याला जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. अतुलची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

घटना सीसीटीव्हीमध्ये कैद : अतुल खरे या युवकावर झालेला हल्ला जवळ असलेल्या एका दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झालाय. पोलिसांनी हे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. आरोपींना पकडण्यासाठी पथकं इतरत्र रवाना करण्यात आल्याचं सातपूर पोलिसांनी सांगितलं.

दोन दिवसांपूर्वी तरूणाची हत्या : दोन दिवसांपूर्वी शहरातील पंडित कॉलनी भागात आकाश धनवटे या तरूणाची अथर्व दाते व त्याच्या तीन साथीदारांनी पूर्व वैमन्यसातून भररस्त्यात कोयत्यानं प्राणघातक हल्ला करत हत्या केली होती. पोलिसांनी या घटनेतील सर्व आरोपींना ताब्यात घेतलं आहे. गेल्या अनेक दिवसापासून शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तसंच कोयता गँगची दहशत देखील निर्माण झाली आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नसल्याचं चित्र बघायला मिळत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

हेही वाचा

  1. संजय राठोड यांच्या कारचा भीषण अपघात : कारची पिकअपला धडक - Sanjay Rathode Car Accident
  2. बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार; नराधमांवर गुन्हा - Woman Gang Raped In Pune
  3. स्फोटक बाळगल्याप्रकरणी साताऱ्यातील दोघांना अटक; स्फोटाचे नमुने तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला - Satara Explosion

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.