ETV Bharat / state

वरळी हिट अँड रन प्रकरणात आरोपी मिहिर शाह अजूनही फरारच, पोलिसांकडून लूक आऊट सर्क्युलर - Worli Hit and Run Case - WORLI HIT AND RUN CASE

Worli Hit and Run Case Updates : वरळी हिट अँड रन प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी मिहिर शाहच्या विरोधात लूक आऊट सर्क्युलर जारी केली. तर रात्री उशिरा शिवसेनेचे उपनेते राजेश शाह आणि चालक राजेंद्रसिंग बिदावत यांना अटक केली.

Worli Hit and Run Case Updates 'Look out circular' issued against accused Mihir Shah son of shiv sena deputy leader Rajesh Shah
वरळी हिट अँड रन प्रकरण (Source reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 8, 2024, 7:31 AM IST

Updated : Jul 8, 2024, 6:14 PM IST

मुंबई Worli Hit and Run Case Updates : राज्यात मागील काही दिवसांपासून हिट अँड रन प्रकरणाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. पुण्यातील पोर्शे कार हिट अँड रन प्रकरण ताजं असतानाच आता मुंबईतील वरळी येथे हिट अँड रनची घटना घडलीय. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी पालघरचे शिवसेनेचे उपनेते राजेश शाह यांना पोलिसांनी अटक केली. तर यातील मुख्य आरोपी असलेला राजेश शाह यांचा मुलगा मिहिर शाह अद्याप फरार आहे. आरोपी मिहिर शाहच्या नावानं आता मुंबई पोलिसांनी लूक आऊट सर्क्युलर काढलीय. तसंच मुख्य आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सहा पथकं स्थापन केली आहे. गुन्हे शाखादेखील या प्रकरणाचा समांतर तपास करणार आहे.

राजेश शाह यांना जामीन मंजूर : वरळी हिट अँड रन प्रकरणी राजेश शाह यांना शिवडी न्यायालयानं न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तर कारमध्ये उपस्थित असलेल्या राजेंद्रसिंग बिडावत याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, यानंतर राजेश शाह यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. न्यायालयानं राजेश शाह यांना जामीन मंजूर केला आहे. या दोघांना वरळी पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा अटक केली होती. त्यानंतर सोमवारी (8 जुलै) या दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.

नेमकं काय घडलं? : वरळी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप नाखवा आणि कावेरी नाखवा हे दोघं पती-पत्नी दुचाकीवरून वरळी येथील त्यांच्या घरी परतत होते. त्यानंतर ॲनी बेझंट रोडवर अचानक मागून येणाऱ्या बीएमडब्ल्यू कारनं त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात प्रदीप नाखवा जखमी झाले. तर त्यांची पत्नी कावेरीला बीएमडब्ल्यू कारनं सुमारे शंभर मीटरपर्यंत फरफडत नेलं. त्यामुळं महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी पहाटे 5.35 च्या सुमारास घडला.

आरोपीच्या वडिलांना अटक : पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घटना घडली तेव्हा शाह यांचा मुलगा हा मिहिर कार चालवत होता. तर त्या गाडीत चालक बसलेला होता. अपघातानंतर दोघांनीही घटनास्थळावरून पळ काढला. वरळी पोलिसांनी घटनास्थळावरून बीएमडब्ल्यू कार जप्त केली आहे. बीएमडब्ल्यू कारच्या चालकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आलाय. चालक राजऋषी राजेंद्रसिंग बिदावत आणि मिहिरचे वडील राजेश शाह यांना वरळी पोलिसांनी दीर्घकाळ चाललेल्या चौकशीनंतर रात्री उशिरा अटक केली आहे. याप्रकरणी भारतीय न्यायिक संहिता (बीएनएस) च्या कलम 105, 281, 125 (बी), 238, 324 (4) आणि मोटार वाहन कायदा 184, 134 (ए), 134 (बी) आणि 187 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आलाय.

हेही वाचा -

  1. वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्या, मृत महिलेच्या पतीची मागणी; आरोपीनं मद्यप्राशन केल्याचा संशय - Worli Hit And Run Case
  2. 'वरळी हिट अँड रन' प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाईची आदित्य ठाकरेंची मागणी; मुख्यमंत्री म्हणाले, "शिवसेनेचा कार्यकर्ता असला..." - Worli Hit And Run Accident

Last Updated : Jul 8, 2024, 6:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.