ETV Bharat / state

पोलीस शोध घेताना आरोपी मिहीर टीव्हीवरून पाहायचा गुन्ह्याचा तपास, वरळी हिट अँड रनचा मुख्य आरोपी कसा पकडला? - Worli Hit and Run Case - WORLI HIT AND RUN CASE

Worli Hit and Run : वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला अखेर अटक करण्यात आली आहे. मिहीर शाह हा गेल्या दोन दिवसांपासून पोलिसांना चकवा देत होता. पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफीनं अटक केली आहे.

Worli Hit and Run
Worli Hit and Run (Source - ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 10, 2024, 8:17 AM IST

मुंबई Worli Hit and Run : वरळीमध्ये दुचाकीवरुन जात असलेल्या महिलेला बीएमडब्ल्यू खाली चिरडून पसार झालेला मुख्य आरोपी मिहीर शहा (वय 23) याला वरळी पोलिसांनी विरार फाटा येथून बेड्या ठोकल्या आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांनी दिली. मिहिरचा शोध घेत असताना शहापूर येथील रिसॉर्ट वरून पोलिसांनी मिहिरच्या कुटुंबाला ताब्यात घेतलं आहे. किंजल शहा (बहिण), पुजा शहा (बहिण), मिनी शहा (आई) आणि अवदीत (मित्र) यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

आई, बहिणींना घेतलं ताब्यात : अपघातग्रस्त बीएमडब्ल्यूमधून वांद्रे कलानगरपर्यंत गेलेला मिहीर तेथून पसार झाला होता. गेले दोन दिवस आरोपी, त्याची आई, बहिणी पोलिसांना सापडत नव्हते. हे सर्वजण आणि मिहीर शहापूर, मुरबाड येथील गावात एका मित्राच्या रिसॉर्टवर थांबले होते. ते सर्व जण टीव्हीवरुन गुन्ह्याच्या तपासाची माहिती घेत होते. पोलिसांनी मिहीरच्या अटकेसाठी स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखा अशी एकूण 16 पथके रवाना केली होती. याबाबत माहिती समजताच मिहीर सोमवारी रात्रीच रिसॉर्टमधून विरारला पळाला.

72 तासांनंतर अटक : पोलीस मिहीरच्या मागावर होते. मात्र, मिहीर त्याचे कुटुंबीय आणि मित्रानं त्यांचे मोबाइल बंद ठेवल्यामुळं पोलिसांना त्यांचा ठावठिकाणा लागत नव्हता. मिहीर त्याच्या पालघर आणि बोरिवलीच्या मित्राच्या वेगळ्या नंबरच्या फोनवरून आवश्यकवेळी संवाद साधत होता. याचदरम्यान, मंगळवारी सकाळी अवघ्या 15 मिनिटांसाठी मिहिरच्या मित्रानं त्याचा बंद ठेवलेला मोबाईल सुरू केला. हा मोबाईल पोलिसांच्या सर्वेलन्सवर होता. पोलिसांना त्या मोबाईलचं लोकेशन सापडलं. पण, अवघ्या 15 मिनिटांत तो फोन पुन्हा बंद करण्यात आला. पोलिसांनी या मोबाईलचा माग काढत त्याच्या मित्रांना आणि आई, बहिणींना ताब्यात घेतलं. त्यानंतर मिहीर हा विरार फाटा येथे असल्याचं उघड होताच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी मिहिरला घटनेच्या 72 तासांनंतर अटक केलीय. त्यामुळं त्याच्या रक्तातील अल्कोहोल शोधणं कठीण झालं आहे. मिहीर ड्रायव्हिंग करताना दारूच्या नशेत होता, हे न्यायालयात सिद्ध करणं पोलिसांसाठी मोठं आव्हान असणार आहे.

तीन मित्रांनाही घेतलं ताब्यात : मुंबई पोलिसांनी मिहीरची आई, बहीण आणि तीन मित्रांना शाहपूर येथील एका रिसॉर्टमधून ताब्यात घेतलं. एका अधिकाऱ्यानं खुलासा केला की, मिहिर हा मित्राच्या रिसॉर्टमध्ये लपला होता. रविवारी गोरेगाव येथे आपल्या मैत्रिणीला भेटल्यानंतर मिहीर त्याची आई आणि दोन बहिणींसह रिसॉर्टमध्ये गेला. तेथे त्याचे अन्य तीन मित्रही सामील झाले. एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, पोलीस पकडतील या भीतीनं मिहीर सोमवारी रात्री रिसॉर्टमधून निघून गेला.

वैद्यकीय तपासणी होणार : पोलिसांनी शाहपूर येथील रिसॉर्टमध्ये पोहोचून मिहीरची आई, बहीण आणि तीन मित्रांना ताब्यात घेतलं. तेव्हा त्यांनी मिहीरबद्दल कोणतीही माहिती नसल्याचा दावा केला. मात्र, त्यानंतर त्यांनी मिहीर त्याच्या एका मित्रासोबत असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्याच्या मित्राच्या मोबाईलच्या लोकेशनच्या आधारे पोलिसांनी मिहीरला विरार नाका येथून अटक केली. मिहीरची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचं पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं. पोलिसांनी मिहीरला परत मुंबईत आणलं पण त्याला अज्ञातस्थळी ठेवलं आहे.

असा होता घटनाक्रम : मद्यधुंद अवस्थेत बीएमडब्ल्यू कार घेऊन वरळीतील डॉ. ॲनी बेझंट रोडवरून भरधाव वेगानं जात असताना मिहीरनं वरळी कोळीवाड्याच्या दिशेनं दुचाकीवरून चाललेले प्रदिप नाखवा (वय 50) आणि कावेरी नाखवा (वय 45) या दाम्पत्याच्या दुचाकीला जोराची धडक दिली. अपघात झाल्यानंतर मिहीरनं कार थांबवली नाही त्याने महिलेच्या अंगावर गाडी चालवत तिला 1.5 किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आलं आहे. रविवारी वरळी परिसरात शिवसेना नेते राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शहा यानंं स्कूटरवरून जाणाऱ्या जोडप्याला जोरदार धडक दिली. या अपघातात कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला. तर पती प्रदीप नाखवा जखमी झाले.

पबमध्ये मद्यप्राशन केलं- एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, " घटनेच्या दिवशी मिहीर आणि त्याच्या तीन मित्रांनी जुहू येथील वाईस ग्लोबल तपस बारमध्ये मद्यप्राशन केलं. मद्यपान केल्यानंतर मिहीर आणि त्याचे मित्र रात्री 1.15 वाजण्याच्या सुमारास पबमधून बाहेर पडले. ते मर्सिडीज कारनं बोरिवलीला गेले. मिहीरनं बोरिवली येथे राहणाऱ्या त्याच्या तीन मित्रांना त्यांच्या घरी सोडले. घरी पोहोचल्यानंतर मिहीरनं मर्सिडीज कार पार्क केली. त्यानं बीएमडब्ल्यू कार घेतली. मिहीर आणि त्याचा ड्रायव्हर रात्री मरीन ड्राईव्हला गेले. तिथे थोडा वेळ घालवून ते घरी परतत असताना अपघात झाला. मिहीरला वरळी सी-लिंक मार्गे जायचे होते. पण वरळीतील अट्रिया मॉलजवळ मागून ॲक्टिव्हाला धडक दिली."

आरोपीच्या वडिलांची जामीनावर सुटका : अपघाताच्या वेळी मिहीरचा ड्रायव्हर राजऋषीही उपस्थित होता. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. शिवसेना नेते राजेश शहा यांनाही अटक करण्यात आली होती. परंतु 24 तासांनंतर 15,000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्यात आली. या घटनेनंतर मिहीर शह फरार झाला होता. सोमवारी पोलिसांनी त्याच्या मैत्रिणीची चौकशी केली. त्याच्याविरुद्ध लुकआउट सरक्यूरल जारी केलं. तपासादरम्यान मिहिरनं वापरलेल्या बीएमडब्ल्यू कारचा विमा संपल्याचं निष्पन्न झालं आहे.

हेही वाचा

  1. नाशिकमध्ये हिट अँड रनची घटना, बारदान फाट्याजवळ महिलेला कारची धडक, आरोपी फरार - Nashik Hit and Run
  2. राजधानीनंतर आता उपराजधानीतही 'हिट अँड रन'च्या दोन घटना, दोघांचा मृत्यू - Hit and Run
  3. हिट अँड रनमध्ये पती-पत्नीचा मृत्यू; अपघातापूर्वीची 'सोन्याचा संसार' इन्स्टा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल - Chhatrapati Sambhajinagar Accident

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.