ETV Bharat / state

Womens Day 2024 : मुंबईकरांचा सुखकर प्रवासासाठी धडपडणारी खतरोंकी खिलाडी 'अनुपमा'; एकमेव महिला मेकॅनिक - Womens Day 2024

Womens Day 2024 : लोकल ट्रेन मुंबईची जीवनवाहिनी समजली जाते. त्यातच दर रविवारी मेगा ब्लॉकच्या बातम्या आता मुंबईकरांसाठी रोजच्या झाल्या आहेत. या कामांमध्ये रेल्वेच्या रुळांची डागडुजी करणे, सिग्नल प्रणाली सुरळीत करणे, या कामांसोबतच आणखी एक महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे रेल्वे ज्या विजेवर चालते त्याच्या ओव्हर हेड तारांचं जाळं संपूर्ण मुंबईभर पसरलं आहे, त्याची डागडुजी करणे इत्यादी काम येतात. हे काम करणारी एक महिला आहे.

Womens Day 2024: मुंईकरांच्या सुखकर प्रवासासाठी धडपडणारी खतरोंकी खिलाडी 'अनुपमा'

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 7, 2024, 9:21 PM IST

Updated : Mar 7, 2024, 10:17 PM IST

अनुपमा सिंग

मुंबई Womens Day 2024 : लोकल ट्रेन मुंबईची जीवनवाहिनी समजली जाते. अशात दर रविवारी मेगा ब्लॉकच्या बातम्या आता मुंबईकरांसाठी रोजच्या झाल्या आहेत. रविवारी कोणत्या मार्गावर किती वेळासाठी मेगाब्लॉक आहे? याचा आढावा घेऊनच मुंबईकर रविवारच्या दिवसाची प्लॅनिंग करत असतात. या बातम्या जेव्हा तुमच्यासमोर येतात तेव्हा रेल्वेच्या तांत्रिक कामांसाठी मेगा ब्लॉक घेतल्याचं कारण सांगितलं जात. मात्र, हे तांत्रिक काम म्हणजे नेमकं काय? हे फारसं कुणाला माहीत नाही. या कामांमध्ये रेल्वेच्या रुळांची डागडुजी करणे, सिग्नल प्रणाली सुरळीत करणे, या कामांसोबतच आणखी एक महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे रेल्वे ज्या विजेवर चालते त्याच्या ओव्हर हेड तारांचं जाळं संपूर्ण मुंबईभर पसरल आहे, त्याची डागडुजी करणे इत्यादी काम येतात. हे काम करणारी एक महिला असून तिचं नाव आहे 'अनुपमा सिंग'.

टीममध्ये एकमेव महिला मेकॅनिक : एक काळ असा होता रेल्वे म्हणजे केवळ पुरुषांची मक्तेदारी समजली जायची. मात्र, आज घडीला रेल्वेच्या प्रत्येक विभागात महिला कार्यरत आहेत. यात मध्य रेल्वेच्या टॉवर वॅगनची दुरुस्ती करणाऱ्या अनुपमा सिंग या एकमेव महिला मेकॅनिकल आहेत. 'ईटीव्ही भारत'शी बोलताना अनुपमा यांनी सांगितलं की, "2012 मध्ये मी रेल्वेत भरती झाले. 2018 मध्ये मला टॉवर वॅगन मेकॅनिकल या पदावर बढती देण्यात आली आणि कामाला सुरुवात केली. सध्या मी कुर्ला विभागात कार्यरत असून, टॉवर वॅगन मेकॅनिकलची आमची 18 जणांची टीम आहे. यात मी एकमेव महिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते दिवा स्थानक या भागात कोणताही बिघाड झाल्यास तिथं टॉवर वॅगन कार घेऊन जाणे आणि तो बिघाड दुरुस्त करणे हे माझं काम आहे."

टॉवर वॅगन कार नेहमीच सज्ज ठेवणं महत्त्वाचं : मुंबई लोकल मधून दररोज लाखो प्रवासी ये जा करत असतात अशात एखाद्या ठिकाणी बिघाड झाल्यास ती समस्या तात्काळ सोडवणं फार महत्त्वाचं असते. अन्यथा घड्याळाच्या काट्याप्रमाणे धावणाऱ्या मुंबईकरांचं वेळापत्रक बिघडतं. त्यामुळं टॉवर वॅगन कार नेहमीच सज्ज ठेवणं अतिशय महत्त्वाचं असतं. ही कार नेहमी सज्ज ठेवण्याची जबाबदारी अनुपमा यांच्यावर आहे. अनुपमा या टॉवर वॅगन कार ची दुरुस्ती देखभाल अशी सर्व कामं करतात. "मुंबईकरांना विना खंडित सेवा देणं हे आमचं काम आहे. त्यासाठी केव्हा केव्हा आम्हाला बारा बारा तास देखील फिल्डवर काम करावं लागतं. एखादा तांत्रिक बिघाड मोठा असल्यास त्यात अधिक वेळ जातो. त्यावेळी तुम्हाला तुमच्या शिफ्टच्या विचार करुन चालत नाही," असं अनुपमा सांगतात.

सुरुवातीला संशय : आपल्या अनुभवाबद्दल अनुपमा सांगतात, "मी सुरुवातीला जेव्हा मेकॅनिकल म्हणून रुजू झाले तेव्हा अनेकांना एक महिला हे काम कसं करु शकेल का अशी शंका होती. कारण, इथं अनेक अवजड पार्ट असतात. ते उचलनं एका जागेवरुन दुसऱ्या जागेवर नेणं ही काम एक महिला करु शकेल का? अनेकांना असे प्रश्न होते. काही काही भाग तर 30 ते 40 किलोचे देखील असतात. मात्र, माझ्या वरिष्ठांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मी आज यशस्वीरीत्या मुंबईच्या जीवनवाहिनीची देखभाल करत आहे. या कामात जोखीम देखील तितकीच असल्यानं माझ्या घरचे याला परवानगी देतात का अशी माझ्या मनात शंका होती. मात्र, माझ्या संपूर्ण कुटुंबानं मला पाठिंबा दिल्यानं आज मी हे काम करु शकते."

हेही वाचा :

  1. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर अखेर महिला धोरण जाहीर, मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

Last Updated : Mar 7, 2024, 10:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.