मुंबई Dhananjay Munde Name Fraud : कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या बनावट शिफारस पत्राचा वापर करून महिला अधिकाऱ्याला २५ लाखांचा गंडा घालण्यात आलाय. आमदार कोट्यातून घर देण्याच्या नावाखाली ही फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात (kalachowki Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२५ लाखांची केली फसवणूक : आमदार कोट्यातून ७५ लाखांचं घर हे केवळ ४५ लाखांत मिळवून देण्याचं आमिष दाखवून विधी खात्यातील एका ३२ वर्षीय महिला अधिकाऱ्याची २५ लाखांची फसवणूक करण्यात आली. जानेवारी २०२१ पासून ही फसवणूक सुरू होती.
दोघांविरोधात गुन्हा दाखल : विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या बनावट शिफारस पत्राचा वापर केला. या प्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात गोविंद गांगण आणि कमलाकर भुजबळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती काळाचौकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोहिते यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असल्याचा दावा करत गोविंद गांगण हा आरोपी फसवणूक करत असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा -
- ड्रग्ज मिळून आल्याची बतावणी करत डॉक्टर, उद्योजकाला 31 लाखांचा गंडा - Nashik Crime
- 17 कोटी 94 लाख 75 हजारांचा गंडा : आरोपीला पोलिसांनी तिरुपतीत बेड्या ठोकल्या, एक वर्षापासून होता फरार - Fraud of investors in Mumbai
- ऑनलाइन शेअर मार्केटमध्ये नफ्याचं दाखवलं आमिष; 23 जणांना 14 कोटींचा गंडा - Nashik Fraud News