ETV Bharat / state

देशात सर्वात कमी मतदान महाराष्ट्रात झाल्याचं खापर कोणावर फुटणार? निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह - voting turnout in Maharashtra

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सर्वात कमी मतदान मुंबईसह महाराष्ट्रात झाले. मतदानादिवशी नेमकं काय झाले? मतदान कमी होण्याची कारणे काय आहेत? जाणून घ्या सर्व माहिती.

Maharashtra voting turnout lowest
महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी (Source- ANI/ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 21, 2024, 10:54 AM IST

मुंबई : देशभरातील राजकीय वर्तुळाच लक्ष लागलेल्या मुंबईत दिवसभरात संथगतीनं मतदान सुरू होतो. यावरून अनेक मतदारांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांनी संथ गतीनं मतदान सुरू असल्यानं निवडणूक आयोगावर सोमवारी टीका केली. या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनीदेखील उत्तर दिलं आहे.

अंधेरीत कर्कग्रस्त नागरिकाचं मतदान- अंधेरी गांधीनगर येथे राहणाऱ्या 68 वर्षीय दशरथ भालेराव यांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दोन वेळा मतदान केंद्रावर हजेरी लावली. कर्कग्रस्त असून दशरथ भालेराव यांनी नाकावर नळी लावून वांद्रे पूर्व येथील नवजीवन विद्यामंदिर येथे प्रथम हजेरी लावली होती. मात्र, त्यांच्याकडे ओळखपत्र नसल्यानं त्यांना पुन्हा घरी जाऊन आधार कार्ड हे ओळखपत्र म्हणून घेऊन यावे लागले. दोन वेळा मतदार केंद्रावर फेरी मारून दशरथ भालेराव यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे.

मोबाईलची परवानगी नसल्यानं नागरिकांची गैरसोय- नाशिकमध्ये मतदान केंद्रावर मोबाईल बंदी केल्यानं अनेक मतदारांनी नाराजी व्यक्त करीत उपस्थित पोलिसांशी वाद घातला. मात्र पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्यानंतर काहीजण मतदान न करताच माघारी फिरले. यामुळे मतदानची टक्केवारी कमी झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मतदार केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई असल्याची माहिती मतदारांपर्यंत पोहचली नाही. अनेक मतदार मोबाईल घेऊन मतदान केंद्रावर आले होते. मात्र पोलिसांनी मोबाईल मतदान केंद्रात नेण्यासाठी मज्जाव केल्याने मोबाईल कुठे ठेवावा,असा प्रश्न निर्माण झाल्याने मतदारांनी मोबाईल साठी मतदान न करता माघारी फिरले. मात्र जे सहपरिवार मतदान करण्यासाठी आले त्यांनी एकमेकांचे मोबाईल सांभाळून मतदानाचा हक्क बजावला. तर अनेकांनी मोबाईल सायलेंट किंवा बंद करून मतदान करून आले. एकमेकांचे मोबाईल सांभाळण्यात दोन तास वाया गेल्याचं एका मतदारानं सांगितलं.

सावलीचीसह पाण्याची सुविधा नाही..राज्यात नाशिकसह मुंबईमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमान होतं. सकाळपासूनच उकाडा जाणवत होता. अशाच मतदान केंद्रावर मोठी गर्दी होती. मतदान करण्यासाठी एक तासाहून अधिक वेळ लागत होता. मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या पाण्याची आणि सावलीची व्यवस्था नसल्यानं नागरिकांना बराच वेळ उन्हात उभे राहावे लागले. त्यामुळे खूप त्रास झाला, असे नाशिकमधील एका मतदारांनी सांगितलं.

विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप- मुंबईत मतदान मोठ्या प्रमाणामध्ये पार पडत असताना मतदारांचा उत्साह दिसून आला. परंतु अनेक ठिकाणी मतदान संथ गतीनं होत असल्याकारणानं मतदारांनी नाराजी व्यक्त केली. तीन तीन तास रांगेत उभे राहावं लागल्यानं ज्येष्ठ नागरिक मतदार मतदान न करता निघून गेले आहेत. याबाबत निवडणूक आयोगावर टीका केली. शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत निवडणूक आयोगावर टीका केली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील निवडणूक आयोग केवळ भाजापाचे ऐकत असल्याचा आरोप केला. संथगतीनं मतदान ही भाजपाची स्ट्रॅटजी आहे का? असा सवाल करत ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर यांनी भाजपावर निशाणा साधला.

निवडणूक आयोग भविष्यात नक्कीच यातून बोध घेईल- ठाकरे गटाच्या टीकेला भाजप नेते तथा आमदार प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिले आहे. "उत्तर मुंबईमध्ये पीयूष गोयल आणि आम्ही आमदारांनी येथील स्वयंसेवी संस्थांना सांगून मतदारांना पाणी आणि नाष्टा अशा सुविधा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. परंतु आम्हाला सुद्धा आचारसंहितेच्या मर्यादा येतात. एका मर्यादेच्या बाहेर आम्हाला काही करता येत नाही. परंतु निवडणूक आयोगाला एक सांगावसं वाटतं की त्यांनी मतदानाच्या स्थळी असलेल्या परिस्थितीचा व्यवस्थित आढावा घेतलेला नाही. त्यामुळे मतदारांना तीन तीन तास रांगेत उभे राहावे लागले. आम्ही मतदारांसमोर नतमस्तक होतो. कारण लोकशाहीचा उत्सव साजरा करत असताना त्रास होतही मतदार तीन तास रांगेत उभे राहिले. हे खरोखर अभिमानास्पद आहे. निवडणूक आयोग भविष्यात नक्कीच यातून बोध घेईल, अशी अपेक्षा करतो.

कायदा करावा-पुष्कर श्रोत्री -केंद्र सरकारनं मतदान करण्याबाबतचा निर्णय घ्यावा, अर्थात कायदा करावा असं परखड मत मराठी अभिनेता पुष्कर श्रोत्री यांनी व्यक्त केले. "लोकसभा निवडणुकीमध्ये देशाचा पंतप्रधानपदी कोणाला विराजमान करणार यासाठी तुमचं प्रत्येक मत महत्त्वाचं असतं. माझ्या देशातील प्रगती कशी असावी त्यासाठी कोण काम करू शकतो, यांचा विचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे मतदान करणे हे आपलं कर्तव्य आहे. विदेशात तुम्ही जर मतदान केलं नाही तर सरकारी सवलती आणि योजनांपासून तुम्ही वंचित राहता. विदेशात मोठ्या प्रमाणावर 100% मतदान होत असतं. तशा प्रकारे भारतात तशाच प्रकारे निर्णय केला पाहिजे. तशा प्रकारे कायदा केला पाहिजे," अशी अपेक्षा अभिनेता पुष्कर श्रोत्री यांनी व्यक्त केली.

मतदान न करणाऱ्यांना फटले मारले पाहिजे - जयवंत वाडकर- संविधानानं दिलेल्या मतदानाचा हक्क प्रत्येक भारतीयांनी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदान करून बजावला पाहिजे, असं मत मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते जयवंत वाडकर यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले, " गेल्या अनेक पंचवार्षिक निवडणूक मध्ये निवडणुकीमध्ये मी मतदान करत आलो आहे. यावेळेस माझ्या मुलीनंदेखील पहिल्यांदा मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. केंद्र सरकारनं मतदान न करणाऱ्या मतदारांना सरकारच्या दिल्या जाणाऱ्या सरकारी योजना, सेवा आणि सवलती सुविधा बंद होईल, अशा प्रकारचं धोरण सरकारने राबविले पाहिजे." विकेंड म्हटल्यानंतर मुंबईतील अनेक जण बाहेर आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी मतदानाकडे पाठ फिरवली आहे. यावर बोलताना जयंत वाडकर म्हणाले की," मतदानाला न येणाऱ्यांना फटके मारले पाहिजे," अशा प्रकारची मिश्किल प्रतिक्रिया त्यांनी मतदान न करणाऱ्यांवर केली आहे.

मतदान केंद्रावर ढिसाळ कारभार- अतीशा नाईक- एका बाजूला सगळ्या मतदान केंद्रावर सोई सुविधा अगदी व्यवस्थित पद्धतीने पुरवण्यात आल्या आहेत, असा निवडणूक आयोगाकजून दावा करण्यात आला. दुसऱ्या बाजूला गोरेगाव इथल्या बिंबीसर मतदान केंद्रावर ज्येष्ठ, विकलांग लोकांना सध्या सुविधा पुरविल्या नाहीत. त्यामुळे मतदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. बिंबिसार मतदान केंद्रावरील ढिसाळ कारभारावर अभिनेत्री अतीशा नाईक यांनी खंत व्यक्त केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.