ETV Bharat / state

वादग्रस्त विधानं करणाऱ्या कंगना रणौतला भाजपानं का दिली उमेदवारी, जाणून घ्या कारणं... - Kangana Ranaut for Lok Sabha - KANGANA RANAUT FOR LOK SABHA

Kangana Ranaut for Lok Sabha : वादग्रस्त विधानं करुन सतत चर्चेत राहणारी, अनेकांना एकाचवेळी छेडून सतत वादात वावरणाऱ्या कंगना रणौतला भाजपानं लोकसभेचं तिकीट जाहीर केलं आहे. हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून ती निवडणूक लढवणार आहे. तिच्याकडे अशी कोणती पात्रता आहे की ज्यामुळं आजवर राजकारणात सक्रिय नसणाऱ्या कंगनाला थेट लोकसभेत पाठवण्याचा विचार भाजपानं केला? हेच जाणून घेण्यासाठी वाचा ही बातमी....

MP ticket to Kangana Ranau
कंगना रणौत
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 26, 2024, 4:15 PM IST

Updated : Mar 26, 2024, 6:50 PM IST

मुंबई Kangana Ranaut for Lok Sabha : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून देशात जवळपास (काही अपवाद वगळता) सर्वच राज्यातील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपाकडून लवकरच अंतिम यादी जाहीर होणार आहे. मात्र, जाहीर झालेल्या यादीमध्ये बॉलीवूडमधील वादग्रस्त अभिनेत्री कंगना रणौत हिला हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. कंगनाच्या उमेदवारीवरून विरोधकांनी भाजपावर निशाणा साधला आहे. सतत वादाच्या भोवऱ्यात अडकणाऱ्या कंगनाला कोणत्या कारणामुळे लोकसभा उमेदवारी मिळाली? काय आहेत कारणे? हे जाणून घेऊयात...

हिंदुत्वाचा उघडपणे प्रचार : बॉलीवूडमधील वादग्रस्त अभिनेत्री कंगना रणौत आपल्या सडेतोड आणि रोखठोक वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहे. कंगना ही वादग्रस्त वक्तव्यामुळे सतत चर्चेत असते. तिच्या बिनधास्त बोलण्यामुळं ती अनेकवेळा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तिने केलेल्या अनेक वक्तव्यामुळं तिला टीकेलाही सामोरं जावं लागलं आहे. बॉलिवूडमधूनही तिच्यावर टीका करण्यात आली. 2014 साली भाजपाची केंद्रात सत्ता आली आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. तेव्हापासून अभिनेत्री कंगना रणौत ही भाजपाला पाठिंबा देत असून, मोदींच्या कामाची स्तुती करत आहे. कंगना उघडपणे हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार करत आहे. बॉलीवूडमध्येही कंगनाची कट्टर हिंदुत्ववादी अशी ओळख निर्माण झालेली आहे. कंगनाने उघडपणे हिंदुत्वाचा प्रचार केल्यामुळे तिला सिनेमात काम मिळणार नाही, असंही बोलत जात होतं, पण याची कंगनानं पर्वा केली नाही. मागील काही वर्षापासून कंगनाने काही चित्रपट केले. त्यातून तिनं हिंदू धर्माचा उघड प्रचार केल्याचं दिसून येतं.

हिंदुत्वाची भूमिका कंगनाच्या पथ्यावर? : अभिनेत्री कंगना रणौत ही वारंवार हिंदू धर्माबद्दल बोलत असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची ती अधूनमधून भेट घेत असते. 370 कलम रद्द केल्यानंतर केंद्रातील भाजप सरकारचे आणि मोदींचं कंगनानं कौतुक केलं. आपल्या बोलण्यातून आपण कट्टर हिंदू आहोत हे ती सतत दाखवत असते. हेच भाजपाने हेरून कंगनाला मंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. हिंदुत्ववादी भूमिकेमुळे कंगनाची लोकसभा उमेदवारीची वर्णी लागली असा आरोपही काँग्रेसनं केला आहे.

कंगनाच्या उमेदवारीवरुन काँग्रेसची टीका : काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाते यांनी इन्स्टाग्रामवरून कंगना रणौतचा फोटो पोस्ट करत आक्षेपार्ह कॅप्शन लिहिली होती. या पोस्टवरुन भाजपा आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. कंगनाच्या उमेदवारीवरुन टीका करणाऱ्या काँग्रेसला भाजपाने सडेतोड उत्तर दिलं आहे. 2019 साली अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला काँग्रेसमधून उमेदवारी देण्यात आली होती. मग तुम्ही पण एका अभिनेत्रीला त्यावेळी कशी काय उमेदवारी दिली? असा सवाल भाजपाने उपस्थित करत, काँग्रेसला जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे.

शेवटी कलाकारालाही विचारधारा असतेच : कुठल्याही क्षेत्रातील व्यक्ती असो किंवा कलावंत प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असतं. कलाकारालाही त्याची वैयक्तिक भूमिका आणि विचारधारा असतेच. कंगनाही एक माणूस आहे... जर तिने हिंदुत्वाचा पुरस्कार केला आणि हिंदुत्वाची भूमिका घेतली तर त्यात तिला आपण चुकीचे ठरवणारे कोण? असं सिनेतज्ञ श्रीराम खाडीलकर यांनी म्हटलं आहे. कोणत्या पक्षाने कुठल्या कलावंताला उमेदवारी द्यायची तो त्या पक्षाचा प्रश्न आहे. परंतु कोणीही कलाकार एखाद्या पक्षाचे समर्थन करत असेल किंवा एखादी भूमिका घेत असेल तर त्यात गैर काय? असंही खाडीलकर यांनी म्हटलंय. आता कंगनाला मंडीमधून उमेदवारी मिळाली आहे. परंतु मंडीमधून तिला लोकं स्वीकारतात का? तिला मतदान मिळते का? आणि ती विजयी होते का? हेही पाहणे महत्त्वाचे आहे. पण कंगना हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार करते म्हणून तिला भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली, असं म्हणणे चुकीचे आहे. कारण भाजपा पक्षाची विचारधारा आणि भूमिका वेगळी आहे. भाजपाची भूमिका आणि विचारधारा जर कंगनाला पटत असेल तर त्यात वावगं काय? दोन माणसांची एकसारखी भूमिका असू शकते किंवा दोन माणसांची वेगवेगळी भूमिका आणि मतं असू शकतात. त्यामुळे शेवटी कलाकार हा देखील एक माणूस आहे... त्यालाही अभिव्यक्ती स्वातंत्र असतं. त्याची एक वेगळी विचारधारा असू शकते, असंही 'ईटीव्ही भारत'शी बोलताना श्रीराम खाडीलकर यांनी म्हटलं आहे.

मंडी मतदारसंघात काय आहेत समीकरणं? : हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. येथून हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह सलग ६ वेळा खासदार होते. त्यानंतर त्यांच्या पत्नी प्रतिभा सिंह या सलग ३ वेळा खासदार राहिल्या आहेत. त्यामुळं काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी भाजपाने थेट सेलिब्रिटी कंगनाला तिकिट दिलं आहे. त्यामुळं कंगना येथून निवडून येते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

इंडस्ट्रीवर घराणेशाहीचा आरोप : अभिनेत्री कंगना रणौत हिने बॉलीवूडमधील अनेक कलाकारांना अंगावर घेत त्यांच्यावर टीका केली आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये 'सेलिब्रिटी किड्स' यांनाच संधी मिळते. अन्य लोकांना बॉलीवूडमध्ये संधी मिळत नाही. त्यामुळे अन्य कलाकारांवर अन्याय होतो. बॉलिवूडमध्ये देखील घराणेशाही आहे, असं म्हणत परंपरागत घराणेशाहीतून पुढे येणारे कलाकार आणि त्यांच्या कुटुंबावर कंगनाने आगपाखड केली होती. कंगनाच्या या वक्तव्यावरून बॉलिवूडमध्ये दोन गट निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. त्यावेळी बॉलीवूडमधून कंगनावरही टीका करण्यात आली होती. पण कंगनाने त्याला भीक घातली नाही... तिला सिनेमा मिळतच गेले. असं असलं तरी अलिकडच्या काळात तिचा बॉक्स ऑफिसवर करिश्मा दिसून आलेला नाही.

काय आहेत कंगनाची वादग्रस्त वक्तव्य? : मंडी ते दिल्ली आणि दिल्ली ते मुंबई असा कंगनाचा इंडस्ट्रीतील प्रवास आहे. २००६ मध्ये 'गँगस्टर' सिनेमातून कंगनानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमासाठी कंगनाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. आतापर्यंत कंगनाला ५ वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. मात्र अभिनेत्री कंगना रणौत आणि वाद हे समीकरणच झालं आहे. ती सतत वादग्रस्त वक्तव्यामुळं वादात सापडत असते. "भारताला १९४७ मध्ये भीक मागून स्वातंत्र्य मिळालं होतं. खरं स्वातंत्र्य हे २०१४ मध्ये मिळालं", असं वक्तव्य कंगनाने केल्यानंतर बराच वाद निर्माण झाला होता. तसंच तिला टीकेला सामोरं जावं लागलं. यानंतर "गांधीजी हे चालाख आणि सत्तेसाठी भुकेलेले होते. तुम्हाला एका गालावर मारलं, तर दुसरा गाल पुढे करा... यामुळं केवळ स्वांतत्र्य नाही तर भीक मिळते. त्यामुळे तुमचे हिरो समजदारीने निवडा", असं कंगनाने म्हटलं होतं. यावर देखील बराच वाद झाला होता. यानंतर ममता बॅनर्जी यांच्यावरही वादग्रस्त पोस्ट केली होती. यावरुन कंगनाला ट्रोल करण्यात आलं होतं. या ट्विटनंतर अधिकृतरित्या तिचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं होतं. पंजाब, हरियाणा आणि उत्तर भारतातील शेतकऱ्यांनी जेव्हा दिल्लीत आंदोलन केलं तेव्हा आंदोलकांना उद्देशून तिनं केलेली वक्तव्यंही वादग्रस्त ठरली होती.

कंगनाविरोधात मानहानीचा गुन्हा : गीतकार जावेद अख्तरनी कंगनाविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल केला होता. कंगनाने अख्तर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केलं होतं. २०१९ मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर शबाना आजमी पाकिस्तानात कार्यक्रमासाठी जाणार होत्या. त्यावरुन कंगनाने शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांच्यावर टीका केली होती. तर मणिकर्णिका सिनेमा प्रदर्शित होण्याआधी करणी सेनेकडून कंगनाला धमकी देण्यात आली होती. "मी राजपूत आहे... मला त्रास देणं बंद केलं नाही, तर एकेकाला बर्बाद करेन..." असं कंगनाने प्रतिउत्तर दिलं होतं. मविआ सरकारच्या काळात "मला मुंबईत सुरक्षित वाटत नसून, मुंबई हा पाकिस्तानचा भाग असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यानंतर मुंबई पालिकेनं कंगनाचं अनधिकृत कार्यालय तोडलं होतं. त्यावेळी कंगनाने उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं की, 'आज मेरा घर टुटा है... कल तेरा घमंड टुटेगा'. अभिनेता हृतिक रोशनवर कंगनाने विविध आरोप केले आहेत. वरील विविध वक्तव्यामुळं कंगनाने अंगावर वाद ओढवून घेत टीकेची धनी झाली होती.

हेही वाचा -

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ स्टारर 'बडे मियाँ छोटे मियाँ'चा ट्रेलर रिलीज, पाहा व्हिडिओ - Bade Miyan Chote Miyan Trailer OUT

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आलियानं लग्नाचा 14 वा वाढदिवस केला साजरा, फोटो पाहून चाहते चकीत - Nawazuddin Siddiqui and Aaliya

राम चरणच्या वाढदिवसाच्या निमित्त 'गेम चेंजर'मधील पहिलं गाणं होईल रिलीज - Ram Charan CDP birthday Celebration

Last Updated : Mar 26, 2024, 6:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.