मुंबई- शिवसेना आमदारांच्या माहितीनुसार महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचे 12 आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रवादीचे 9 आमदार मंत्रिपदाचे शपथ घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी दिली. तर भाजपाच्या 19 आमदारांना फोन आल्याची माहिती मिळत आहे.
शिवसेना आमदार भरतशेठ गोगावले यांनी सांगितलेल्या माहितीनुसार पक्षाचे बारा आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यापैकी सात नवीन चेहरे आहेत. शिवसेना आमदार भरतशेठ गोगावले म्हणाले, " आज दुपारी 4 वाजता शपथविधी होणार आहे. त्यामुळे आम्ही सर्व नागपुरात आलो आहोत. मंत्रिपदाची शपथ घेणारे 7 जण नवीन आहेत. तर 5 जण पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत". भाजपाचे संकटमोचक म्हटले जाणारे आमदार गिरीश महाजन यांचादेखील मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. त्यांनी वृत्तसंस्थेला याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, " भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मला फोन केला. मंत्रिपदाची दुपारी 4 वाजता शपथ घ्यायची आहे, असे त्यांनी मला सांगितलं. मी तिसऱ्यांदा मंत्री म्हणून शपथ घेणार आहे. मी पक्षाचे आभार मानतो".
योगेश कदम यांना फोन कॉलची प्रतिक्षा- शिवसेनेचे आमदार योगेश रामदास कदम यांनी वृत्तसंस्थेला सांगितले," जर मला शिवेसेनेतील सर्वात तरुण आमदार म्हणून मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली तर मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आभारी राहीन. भाजपाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी वृत्तसंस्थेला सांगितले, " पक्ष नेतृत्वाकडून मला फोन आला नाही. मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आहेत. काय होते, ते पाहू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाचे सर्वजण पालन करणार आहेत".
- मंत्रिमंडळ विस्तारावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी अद्याप फोन आलेला नसल्याचं सांगितलं. शिवसेनेचे अध्यक्ष एकनाथ शिंदे जे जबाबदारी सोपवतील ते सर्व जबाबदारी चोख पार पाडणार असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. ज्यांना फोन येईल ते शपथ घेणार आहेत, असेदेखील उदय सामंत यांनी सांगितलं.
महायुतीत शपथ घेण्यासाठी कोणाला फोन?
- भाजपाच्या या नेत्यांना मंत्रिपदासाठी फोन- चंद्रशेखर बावनकुळे, पकंज भोयर, पंकजा मुंडे, नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, अतुल सावे, माधुरी मिसाळ, मंगल प्रभात लोढा, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे-पाटील, जयकुमार रावल, मेघना बोर्डीकर, गणेश नाईक, संजय सावकारे, अशोक उईके, आशिष शेलार, आकाश फुंडकर आणि जयकुमार गोरे
- शिवसेनेच्या 12 जणांना मिळणार मंत्रिपद - मंत्रिमंडळातील मंत्री अब्दुल सत्तार आणि दीपक केसरकर यांना अद्यापपर्यंत शपथ घेण्यासाठी फोन गेलेला नाहीय. या दोघांना पक्षसंघटनेसाठी मोठी जबाबदारी मिळणार असल्याचं बोललं जातंय. संजय राठोड, प्रकाश अबिटकर, दादा भुसे, उदय सामंत, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, आशिष जैस्वाल, भरत गोगावले, प्रताप सरनाईक आणि योगेश कदम यांची मंत्रिपदाकरिता नावे चर्चेत आहेत. मात्र, काही आमदारांना अद्याप फोन आले नसल्याची माहिती मिळत आहे.
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या 7 जणांना फोन-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शपथविधीसाठी सहा जणांना फोन गेल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये आदिती तटकरे, अनिल पाटील, हसन मुश्रीफ, बाबासाहेब पाटील, नरहरी झिरवाळ, मकरंद पाटील आणि दत्ता भरणे यांचा समावेश आहे. अद्यापर्यंत छगन भुजबळ आणि दिलीप वळसे-पाटील यांना शपथ घेण्यासाठी फोन आलेला नाही. त्यामुळं नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय.
हेही वाचा-