ETV Bharat / state

कोल्हापूरातील क्रीडा कीर्ति स्तंभ अद्यावत कधी होणार? 64 वर्ष जुन्या किर्तीस्तंभाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष - Kirti Stambh Kolhapur

Kirti Stambh Kolhapur : कलानगरी कोल्हापुरची क्रीडा परंपरा खेळाडूंनी सातासमुद्रापार पोहोचवली. ज्या खेळाडूंनी कोल्हापूरचं नाव जागतिक पातळीवर उंचावलं त्या खेळाडूंच्या सन्मानार्थ उभारण्यात आलेला कीर्ति स्तंभचं अडगळीत पडला आहे.

Kirti Stambh Kolhapur
कीर्ति स्तंभ (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Aug 29, 2024, 5:41 PM IST

कोल्हापूर Kirti Stambh Kolhapur : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी राजाश्रय दिलेल्या कलानगरी कोल्हापुरची क्रीडा परंपरा येथील खेळाडूंनी सातासमुद्रापार पोहोचवली आहे. ज्या खेळाडूंनी कोल्हापूरचं नाव जागतिक पातळीवर उंचावलं त्या खेळाडूंच्या सन्मानार्थ 13 फेब्रुवारी 1960 या दिवशी उभारण्यात आलेला भवानी मंडप येथील क्रीडा कीर्ति स्तंभचं अडगळीत पडला आहे, 24 वर्षांपासून या स्तंभाचं अध्ययवतीकरणही झालेलं नाही, आज राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्तानं देशातील एकमेव असलेल्या या कीर्ति स्तंभाला सन्मान कधी मिळणार? असा प्रश्न आता कोल्हापूरकर विचारत आहेत.

कोल्हापूरातील क्रीडा कीर्ति स्तंभ अद्यावत कधी होणार (ETV Bharat Reporter)

स्तंभावर अनेक खेळाडूंची नावं : कोल्हापुरातील भवानी मंडपातील प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर देशभरातून अंबाबाई मंदिरात येणाऱ्या भाविकांचं लक्ष वेधून क्रीडा कीर्ति स्तंभ छत्रपती राजाराम महाराजांच्या कार्यकाळात उभारण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं. 13 फेब्रुवारी 1960 या दिवशी पटियाला संस्थानाचे महाराज यादवींद्र सिंह यांच्या हस्ते या कीर्ती स्तंभाचं उद्घाटन करण्यात आलं होतं. तत्कालीन नगराध्यक्ष रवींद्र सबनीस यावेळी उपस्थित होते. याच स्तंभावर जागतिक पातळीवर कोल्हापूरचं नाव अधोरेखित करणाऱ्या खेळाडूंची नावं कोरली जावीत, या उद्देशानं छत्रपती राजाराम महाराजांनी हा स्तंभ उभारला. कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्यानंतर अनेक खेळाडूंनी कोल्हापूरची क्रीडा परंपरा जागतिक पातळीवर पोहोचवली. मात्र, त्यांची नावं या स्तंभावर कोरण्यात आलेली नाहीत. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिराला भेट देणाऱ्या विदेशी आणि देशभरातील भाविकांचं लक्ष वेधणाऱ्या या स्तंभावर आपलंही नाव असावं अशी अपेक्षा राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून देणारे कुस्तीपटू राम सारंग यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.

आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलेल्या खेळाडूंची नावं असावीत : कोल्हापूरच्या क्रीडा परंपरेला साजेशी कामगिरी करणाऱ्या अनेक कीर्तीवंत खेळाडूंची नावं या स्तंभावर असावीत अशी मागणी कोल्हापूर जिल्हा शहर व कृती समितीचे रमेश मोरे यांनी केली आहे. यात राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धा सुवर्णपदक विजेते राम सारंग, कुस्तीपटू रेश्मा माने, नेमबाज तेजस्विनी सावंत, जलतरणपटू वीरधवल खाडे, राही सरनोबत, बुद्धिबळपटू ऋचा पुजारी, क्रिकेटपटू अनुजा पाटील यांनीही कोल्हापूरचं नाव जागतिक पातळीवर पोहोचवलं आहे, अशा खेळाडूंचाही सन्मान होणं गरजेचं असल्याचं मोरे यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा :

  1. 'बाप्पा'मुळंच सगळं शक्य झालं; ऑलिम्पिकपदक विजेता स्वप्निल कुसाळे 'दगडुशेठ' चरणी लीन - Swapnil Kusale
  2. जय श्रीराम म्हणून हिंदू संस्कृतीचं भक्कमपणे रक्षण केलं तरच हिंदुराष्ट्र मोठं होईल; स्वप्नील कुसाळेचं वक्तव्य चर्चेत - Swapnil Kusale on Hindu Rashtra

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.