ETV Bharat / state

पंढरपुरात विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनास सुरुवात; भाविकांमध्ये मोठा उत्साह - Vitthal Rukmini Mandir

Vitthal Rukmini Mandir : लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणीच्या गाभाऱ्याचं मूळ रूप भाविकांच्या समोर आलय. आजपासून पंढरपुरात विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनास (Pandharpur Padasparsha Darshan) सुरुवात झाली असून भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.

Vitthal Rukmini Mandir
विठुरायाच्या पदस्पर्श दर्शन (ETV BHARAT Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 2, 2024, 8:26 PM IST

पंढरपूर Vitthal Rukmini Mandir : पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन (Pandharpur Padasparsha Darshan) आज पासून सुरू झाल्यानं भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. पहाटे चार वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत विठ्ठलाची पूजा करण्यात आली. त्यानंतर पदस्पर्श दर्शनाला सुरूवात झाली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणावर भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. याचा पंढरपूरच्या अर्थकारणावर चांगला परिणाम होणार असल्याचं दिसतंय.

पंढरपुरात विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनास सुरुवात (ETV BHARAT Reporter)

महापूजेनंतरच पदस्पर्श दर्शनाला झाली सुरुवात : 15 मार्चपासून विठ्ठल मंदिरमध्ये जतन आणि संवर्धन करण्यासाठी तसेच मूळ रुप देण्यासाठी मंदिरात काम सुरू होतं. आज पहाटे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या उपस्थितीत विठ्ठलाची नित्य महापूजा पार पडली. या महापूजेनंतरच पदस्पर्श दर्शनाला सुरुवात झाली. यावेळी वारकरी सांप्रदायिक प्रमुख महाराज मंडळीही उपस्थित होते. यावेळी मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. तर मंदिरामध्ये पहाटेपासूनच भक्तांची गर्दी होती. पदस्पर्श दर्शनासाठी रात्रीपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.

विविध फुलांची सजावट : मंदिराच्या गाभऱ्यामध्ये विविध फुलांची सजावट पुण्यातील थोरात व निकाळजे या दोन भाविक भक्तांनी केली होती. यासाठी तब्बल दोन टन विविध प्रकारची फुले वापरण्यात आली होती. पंढरीच्या विठ्ठलाचं आणि भाविकांचे अतूट नातं हे अनेक दिवसांपासून दिसून येत आहे. मात्र, दुरुस्तीच्या काळात यामध्ये खंड पडला होता. मात्र पालकमंत्र्यांच्या उपस्थित मध्ये आज नित्य पूजा सुरू झाल्यानं विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन सुरू झाले. 75 दिवसांनी विठ्ठलाचे दर्शन घेत असताना भाविकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. विठ्ठल दर्शनाची ओढ नागरिकांना लागली होती. ती दर्शनाने आज पूर्ण झाल्याचं दिसून आले.

हेही वाचा -

  1. पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराला मिळालं 700 वर्षांपूर्वीचं रूप; असा आहे गाभारा - Vitthal Rukmini Mandir
  2. Pandharpur Temple News: बुलेट प्रुफ काचेमध्ये पंढरीचा विठ्ठल उभा राहिला! मुर्तीचं संरक्षण करण्याकरिता काम सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.