ETV Bharat / state

सरकारकडून प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचं खच्चीकरण सुरू; विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल - विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar On Eknath Shinde : अधिकाऱ्यांच्या मनमानी बदल्या आणि नियुक्त्यांमुळं अधिकाऱ्यांचं खच्चीकरण होत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. सरकार मर्जितील अधिकाऱ्यांचे लाड पुरवत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

vijay wadettiwar On Eknath Shinde
संपादित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 4, 2024, 12:59 PM IST

मुंबई vijay wadettiwar On Eknath Shinde : "युएलसी घोटाळा प्रकरणात सक्त वसुली संचालनालयानं ( ED ) चौकशी केलेले अधिकारी दिलीप ढोले यांची सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक पदावर सरकारनं नियुक्ती केली. डॉ. सुधाकर शिंदे यांची बृहन्मुबंई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. अशाप्रकारच्या नियुक्त्यामुळं भारतीय प्रशासकयी सेवेत कार्यरत अधिकाऱ्यांचं खच्चीकरण होत असून मर्जितील अधिकाऱ्यांचा सरकारकडून लाड पुरवला जात आहे," असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

प्रशासकीय अधिकाऱ्यांचं खच्चीकरण : "राज्य सरकारकडून काही नियुक्त्या करण्यात आल्या, त्यात सिडको सहव्यवस्थापकीय संचालक आणि मुंबई महापलिका अतिरिक्त आयुक्त पद समाविष्ट होतं. अशा प्रकारच्या नियुक्तीमुळं भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी वर्गाचं खच्चीकरण होतय. सरकारकडून महत्वाच्या पदांचं अवमूल्यन केलं जात असून मर्जीतील अधिकाऱ्यांचे सरकार लाड पुरवतंय," अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केली आहे.

अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य नियुक्तीमुळं खच्चीकरण : वडेट्टीवार पुढं म्हणाले की, "वास्तविक पाहता ढोले हे राज्य कर उपायुक्त (वस्तू व सेवाकर) या विभागातील अधिकारी असून सदरचे पद वर्ग एक दर्जाचे आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे असल्यानं आस्थापना संबंधतील सर्व नियम बाजूला ठेवून सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको या भारतीय प्रशासकीय सेवेतील समकक्ष पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वीही देखील सर्व नियम डावलून ढोले यांची मीरा-भाईंदर महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. भा.प्र.से. कॅडरच्या पदावर भा.प्र.से. सेवेत नसलेल्या अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य नियुक्तीमुळं सनदी सेवेतील अधिकाऱ्यांचं मनोधैर्य खच्चीकरण होत आहे," असा घणाघात वडेट्टीवार यांनी सरकार वर केला आहे.

मर्जितील अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द करा : मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून डॉ. सुधाकर शिंदे यांची नियुक्ती केलीय. खरंतर शिंदे हे भारतीय प्रशासकीय सेवतील अधिकारी नाहीत, ते भारतीय महसूल सेवेतील अधिकारी असतानाही इतर सनदी अधिकाऱ्यांना डावलून केवळ राजकीय पाठबळावर शिंदे यांची नियुक्ती चुकीची असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. सरकारनं मर्जितील अधिकाऱ्यांच्या बदल्या तत्काळ रद्द कराव्या, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी सरकारकडं केली आहे.

हेही वाचा :

  1. महायुती सरकारचा अँम्ब्युलन्स घोटाळा, 8 हजार कोटी कंत्राटदाराच्या घशात - वडेट्टीवार
  2. "इथेच आणायचा होता का महाराष्ट्र माझा?", भाजपा आमदाराच्या गोळीबारावरून विरोधक आक्रमक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.