ETV Bharat / state

'बंडोबा' होणार 'थंडोबा'? विजय शिवतारे यांची शिंदे-फडणवीस-पवारांशी सकारात्मक चर्चा - Vijay Shivtare news

शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे हे आज पत्रकार परिषद घेऊन बारामती लोकसभेबाबत भूमिका स्पष्ट करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची समजूत घातल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे विजय शिवतारे हे बंडाची तलवार म्यान करणार असल्याची शक्यता आहे.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 28, 2024, 9:29 AM IST

Updated : Mar 28, 2024, 10:14 AM IST

Vijay Shivtare news
Vijay Shivtare news

मुंबई : शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांची समजूत घालण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'वर्षा' या निवासस्थानी बुधवारी विशेष बैठक पार पडली. या बैठकीली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहिले. या बैठकीवेळी शिवसेना आमदार भरतशेठ गोगावले हेदेखील उपस्थित होते.

'वर्षा' येथे झालेल्या बैठकीत विजय शिवतारे यांच्या पुरंदर तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्यांबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. विजय शिवतारे यांच्या मनातील सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्यात यश आल्याचं सूत्रानं सांगितले. या बैठकीतील चर्चेबाबत पत्रकार परिषद घेऊन माध्यमांसमोर विस्तृतपणे भूमिका मांडणार असल्याचे शिवतारे यांनी ठरवलं आहे.

विजय शिवतारे यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत- बारामती लोकसभा मतदारसंघाकडं संपूर्ण राज्याचं लक्ष असताना शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी बारामतीमधून अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोंडी झाली. शिंदे गटाचे नेते शिवतारे यांच्या भूमिकेमुळे प्रसंगी महायुतीमधून बाहेर पडू असा राष्ट्रवादीनं ( अजित पवार गट) इशारा दिला. तरीही शिवतारे हे लोकसभा लढविण्यावर ठाम राहिले. तर महायुतीत मतभेद निर्माण होण्याची चिन्हे असताना शिवसेना शिंदे गटानं थेट शिवतारे यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले होते.

बारामती मतदारसंघात बदल हवा- यापूर्वी दोन वेळा विजय शिवतारेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आपली भूमिका मांडली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी युतीधर्म पाळावा लागेल, असा सल्ला दिला. त्याचप्रमाणे महायुतीमधील उमेदवाराचा बारामती लोकसभा निवडणुकीत प्रचार करावा लागेल, असं मुख्यमंत्र्यांनी विजय शिवतारेंना सांगितलं होते. दुसरीकडं शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना कारवाईला सामोरे जाण्याची तयारी दर्शविली. बारामती मतदारसंघात बदल हवा असून तशी जनभावना असल्याचा त्यांनी दावा केला.

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी केली होती टीका- विजय शिवतारे यांची मनधरणी करताना शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना कसरत करावी लागली. बारामती लोकसभा मतदारसंघात विजय शिवतारे यांनी दौरा करताना अजित पवार आणि शरद पवार कुटुंबावर टीका केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुनील तटकरेंनी "माणसाच्या मनस्थितीवर परिणाम झाला की अशी वक्तव्ये बाहेर येतात," असा टोला विजय शिवतारेंना लगावला होता.

हेही वाचा-

  1. युतीधर्म न पाळल्यास पक्षाकडून कारवाईचा बडगा; कारवाईवर नेमकं काय म्हणाले शिवतारे? वाचा सविस्तर - Vijay Shivtare News
  2. विजय शिवतारेंना पक्षाकडून थेट अल्टीमेटम; युतीधर्म न पाळल्यास कारवाईचा बडगा? नेमकं काय म्हणाले शंभूराज देसाई? - Shambhuraj Desai On Vijay Shivtare
  3. मनस्थितीवर परिणाम झाल्यामुळं अशी वक्तव्य; सुनील तटकरेंची विजय शिवतारेंवर टीका - Sunil Tatkare on Vijay Shivtare

Last Updated : Mar 28, 2024, 10:14 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.