नागपूर Maharashtra Weather Update : नागपूर आणि विदर्भात अचानक थंडीचा जोर चांगलाचं वाढलाय. आज नागपुरात ८.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासात नागपूरमध्ये ५.९ अंशाने तापमानात घट झाल्याने बोचऱ्या थंडीचा अनुभव हा नागपूरकरांना येत आहे.
तापमानात होणार आणखी घट : उत्तरेकडील राज्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार हिमवृष्टी सुरू आहे. त्यामुळं थंड वारे विदर्भाच्या दिशेने वाहत आहेत. विदर्भातील अनेक जिल्ह्यातील तापमान १० डिग्रीपर्यंत खाली आलं आहे. पुढील काही दिवस तापमानात आणखी मोठी घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
विदर्भ गारठला, तापमानात घट : विदर्भात आज नागपूर येथे सर्वात नीचांकी ८.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. या हंगामातील हे सर्वात कमी तापमान आहे. तर गोंदिया आणि अकोलामध्ये ९.५ अंश तापमान नोंदवण्यात आले आहे. यवतमाळ जिल्ह्यात ९ अंश तापमान नोंदवण्यात आले आहे. अमरावती १२, बुलढाणा १०, चंद्रपूर ११, वर्धा १०.६, गडचिरोली ११.२ तर वाशीमचं तापमान १४ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं आहे.
तापमानात घट कायम राहणार : गेल्या २४ तासात नागपूरसह विदर्भात सरासरी ५ अंश सेल्सिअस तापमानाची घट झाली आहे. पुढील काही दिवस आणखी थोडी तापमान घट होण्याचा अंदाज आहे. उत्तर भारतात आलेल्या शीत लहरीमुळे या भागात किमान तापमानाचा पारा चांगलाच खाली आलाय. त्यामुळं विदर्भात कडाक्याची थंडी पडू लागली आहे. पुढील काही दिवस उत्तरभारतात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे. देशातील काही भागात थंडीची तीव्र लाट आहे. त्यामुळं विदर्भातील अनेक जिल्ह्यात किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली आले आहे.
हेही वाचा -