ETV Bharat / state

तीन अल्पवयीन वारकरी विद्यार्थ्यांवर महाराजाकडून लैंगिक अत्याचार, भोंदू महाराजावर पोस्को - Sexual abuse of students

Alandi Crime : आळंदीत वारकरी सांप्रदायिक शिक्षण घेण्यासाठी आलेल्या तीन अल्पवयीन वारकरी विद्यार्थ्यांवर संस्थाचालकानंच अनैसर्गिक बलात्कार केल्याची घटना आज उघडकीस आलीय. या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे.

Unnatural Abuse
Unnatural Abuse
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 27, 2024, 8:12 PM IST

पुणे (आळंदी) Alandi Crime : पुणे जिल्ह्यातील आळंदी येथरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तीर्थक्षेत्र आळंदी येथील नामांकित वारकरी संस्थेत तीन विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेबाबत आळंदी शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी संस्थेच्या (52वर्षीय) संचालकाला अटक केली आहे. पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून संस्थेचे संचालक दासोपंत ऊर्फ स्वामी हरिभाऊ उंडाळकर-आळंदीकर (वय ५२) यांच्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार (पोस्को) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित संस्था चालवणाऱ्या तथाकथित महाराजाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.

तीन महिन्यांपासून अत्याचार : संबंधित वारकरी संस्था खूप जुनी असून नुकतीच नोंदणीकृत झाली आहे. ही संस्था मृदुंग वादनाच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध असून आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी या संस्थेत शिक्षण घेतलं आहे. आरोपी दासोपंत उंडाळकर हा मूळचा मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील रहिवासी असून, तीस वर्षांहून अधिक काळ आळंदीत वास्तव्यास आहे. पीडित तिन्ही विद्यार्थी परभणी जिल्ह्यातील आहेत. पोलिसांनी सांगितलं की, आरोपी दासोपंत उंडाळकर यानं गेल्या तीन महिन्यांत पीडित विद्यार्थ्यांवर वारंवार अनैसर्गिक कृत्य केलं होतं. आज विद्यार्थ्यांचे पालक आळंदी पोलिसांत तक्रार देण्यासाठी आले होते. या गुन्ह्याची प्राथमिक माहिती मिळताच पोलीस उपायुक्त शिवाजी पवार, सहायक पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह गौर यांनी पिंपरी पोलिस आयुक्त कार्यालयाला भेट दिली. आरोपी महाराज असल्यानं पोलिसांवर विविध स्तरातून राजकीय दबाव असल्याची चर्चा पोलीस ठाण्याच्या आवारात होती.

तथाकथित महाराज पोलिसांच्या ताब्यात : स्थानिक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील गोडसे यांनी गुन्हा दाखल केला असून, याप्रकरणी संबंधित संस्था चालवणाऱ्या तथाकथित महाराजाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती दिली. त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला ताब्यात घेण्यात आलं त्यांनी सांगितलंय. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिल लोहार करीत आहेत.

हे वाचलंत का :

  1. रामाचं राज्य असतं तर, मराठ्यांवर आंदोलन करण्याची वेळ आली नसती; संजय राऊतांचा टोला
  2. मराठा आरक्षणाबाबतच्या अधिसूचनेविरोधात न्यायालयात जाणार; गुणरत्न सदावर्तेंची भूमिका
  3. मराठ्यांचा ऐतिहासिक विजय! आरक्षणाची अंमलबजावणी होईपर्यंत सर्वांना ओबीसींच्या सुविधा मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.