ETV Bharat / state

गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर, लालबागच्या राजाचं घेणार दर्शन, राजकीय खलबतं रंगणार ? - Amit Shah Mumbai Visit

Amit Shah Mumbai Visit : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवस मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. या भेटीत अमित शाह हे लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत. त्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भेट देऊन गणरायांचं दर्शन घेणार आहेत.

Amit Shah Mumbai Visit
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 8, 2024, 10:10 AM IST

मुंबई Amit Shah Mumbai Visit : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर येत असून ते 'लालबागचा राजा'च्या चरणी नतमस्तक होणार आहेत. त्यानंतर ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी जाऊन बाप्पांचं दर्शन घेणार आहेत. अमित शाह दरवर्षी 'लालबागचा राजा'च्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मुंबईमध्ये सहकुटुंब येतात, त्याच प्रकारे यंदाही त्यांचा दौरा असला, तरी सुद्धा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा हा दौरा फार महत्त्वाचा मानला जात आहे.

Amit Shah Mumbai Visit
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Reporter)

रंगणार राजकीय खलबतं : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे गणेशोत्सवात दरवर्षी 'लालबागचा राजा'च्या दर्शनाला येततात. राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर 'लालबागचा राजा'च्या दर्शनासाठी हा त्यांचा तिसरा दौरा आहे. आज सायंकाळी अमित शाह मुंबईत येत असून सायंकाळी साडेसात वाजता मुंबईतील सांताक्रुज एअरपोर्ट शेजारी असलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये ते एक डॉक्युमेंटरी लॉन्च करणार आहेत. त्यानंतर आज रात्री त्यांचा मुक्काम राज्य सरकारच्या सह्याद्री या अतिथी गृहात असणार आहे. याच दरम्यान आज रात्री उशिरा आणि उद्या सकाळी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी अमित शाह यांच्यासोबत होणार आहेत. या चर्चेमध्ये विधानसभा निवडणुकीची रणनीती आखली जाणार आहे. विशेष म्हणजे महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न अमित शाह या दौऱ्यात करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली : सोमवारी सकाळी अमित शाह हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगला या शासकीय निवासस्थानी गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहेत. नंतर ते मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्या वांद्रे इथल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देणार आहेत. राज्यात सध्या बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार आणि मालवण, राजकोट इथं कोसळलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात संघर्ष पेटलेला आहे. अशात होत असलेला अमित शाह यांचा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे.

हेही वाचा :

  1. भारतीय क्रिकेट संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाणार? अमित शाह यांच्या वक्तव्यानं चित्र स्पष्ट - Amit Shah on Champions Trophy 2025
  2. "माझ्यावर टीका करणारे गुजरातमध्ये तडीपार होते", शरद पवारांचा अमित शाहांवर हल्लाबोल - Sharad Pawar on Amit Shah
  3. अमित शाहांच्या भेटीसाठी अजित पवारांनी मध्यरात्री दिल्ली का गाठली?; भेटीमागचं नेमकं कारण काय? - AJIT PAWAR AMIT SHAH VISIT

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.