ETV Bharat / state

निवडणुकीपूर्वी राम राम, निवडून आल्यावर मरा-मरा; उद्धव ठाकरेंनी मोदींवर डागली तोफ - Lok Sabha Election 2024

Lok Sabha Election 2024 : शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांनी दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात सभा घेतली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केलाय.

Lok Sabha Election 2024
लोकसभा निवडणूक २०२४ (ETV Bharat Maharashtra)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 12, 2024, 10:55 PM IST

मुंबई Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीचे मुंबई दक्षिण मध्य मतदार संघाचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारार्थ शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांनी ट्रॉम्बे येथे जाहीर सभा घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह तसंच राज्य सरकार यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला. शिवसेना संकटात अधिक ताकदवान बलवान होते. शिवसेनेनं अनेक संकट झेललेली आहेत. परंतू मागील दहा वर्षात पंतप्रधान मोदींनी दिलेली आश्वासन कितपत पूर्ण केली हे आम्हाला सांगावं, असा सवाल उद्धव ठाकरेंनी मोदींना केला आहे.

15 लाखाचं काय झालं? : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 ला देशातील प्रत्येक नागरिकाच्या खात्यात 15 लाख जमा करू, असं आश्वासन दिलं होतं. त्या आश्वासनाचं काय झालं? तसंच मागील दहा वर्षात कित्येक आश्वासन दिली होती. ती आश्वासन पूर्ण का केली नाहीत? असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. मागील दहा वर्षात देशातील महागाईनं डोकवर काढलं आहे. महागाईचा भडका उडाला आहे. बेरोजगारी वाढत आहे. महिलावरील अत्याचार वाढत आहेत. परंतु याकडं मोदीचं लक्ष नाही. ते फक्त धार्मिक विषय काढून मत मागताहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच भाजपाच्या खात्यात कोट्यावधी रुपये कुठून आले, असा सवाल देखील उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय.

कोरोना काळात 17 दिवसात रुग्णालय : कोरोना काळात 'मी' मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात कोरोनाचे अधिक रुग्ण होते. प्रत्येकजण गावी जाण्यासाठी प्रयत्न करत होता, मुंबईत परराज्यात लोक राहत होती. त्या लोकांसाठी जेवणाची सोय आम्ही केली. 17 दिवसात कोविड रुग्णालय उभ केलं. मात्र, दुसरीकडं उत्तर प्रदेशात गंगा नदीत प्रेत वाहत होती. कोरोनाकाळात आमच्या सरकारनं चांगलं काम केलं. परंतु उत्तर प्रदेशात काय झालं?, याबद्दल कोणी बोलत नाही. महाराष्ट्रातील उद्योगधंदे मोदी-शहा गुजरातला घेवून जात आहेत. मोदी महाराष्ट्राचा अपमान करत आहेत, असा प्रहार उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला.

आधी राम राम निवडून आल्यावर मरा मरा : पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणूक आली की, मोदी भारत-पाकिस्तान, चीन, मुस्लिम या विषयावर बोलतात. 2019 मध्ये दिलेली आश्वासन 2024 मध्ये आठवत नाहीत. केंद्रात गजनी सरकार आहे. मुंबईत मोदी रोड शो करणार आहेत, पण माझं त्यांना आवाहन आहे. त्यांनी या ठिकाणी म्हणजे मुंबईतील ट्रॉम्बे येथे रोड शो करावा. म्हणजे त्यांना कळेल की लोक इथे कसे राहतात. सामान्यांना अच्छे दिन आले नाहीत. मोदी-शाहांचे उद्योगपती मित्र आहेत, यांना अच्छे दिन आलेले आहेत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला लगावला. कोळीवाड्यात जाऊन पियुष गोयल नाकाला रुमाल लावतात. त्यामुळं ते मतदारसंघातील प्रश्न कसे सोडवतील, अशी टीका ही उद्धव ठाकरे यांनी पियुष गोयल यांच्यावर केली.

...मग त्यावेळेला कळलं नव्हतं का? : पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्हाला नकली शिवसेना म्हणतात. नकली शिवसेना बाळासाहेबांची नकली संतान असं म्हटलं आहे. परंतु आम्ही तुमच्यासोबत होतो, तेव्हा तुम्हाला कळलं नव्हतं का?. मी असली आहे ते नकली आहे? 2019 रोजी अमित शाहंनी मला त्यांचा अर्ज दाखल करण्यासाठी गुजरातमध्ये बोलावलं होतं. मी तिथे गेलो, यानंतर पंतप्रधान मोदी यांनी वारणासीत अर्ज दाखल करण्यासाठी बोलावलं होतं, त्यावेळी गेलो. त्यानंतर मोदी पंतप्रधानाची उमेदवार होते, तेव्हा मला त्यांनी दिल्लीत बोलावलं, तेव्हाही गेलो. मग जेव्हा-जेव्हा तुम्हाला गरज पडली, तेव्हा मी होतो. तेव्हा बाळासाहेबांचा पुत्र म्हणून मी असली आहे? की नकली आहे? हे तुम्हाला कळलं नव्हतं का? असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी मोदी यांच्यावर टीका केली.

हे वाचलंत का :

  1. पुण्यातील राजकीय वातावरण चिघळलं; रवींद्र धंगेकरांचा पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या, पैसे वाटप झाल्याचा आरोप - Lok Sabha Election 2024
  2. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी सोमवारी मतदान; महाराष्ट्रातील 'या' 11 मतदारसंघांत होणार चुरशीची लढत - Lok Sabha Elections 4th Phase
  3. 12 राज्यांचे मुख्यमंत्री, 20 केंद्रीय मंत्री, 20 किमीचा 'रोड शो'; उमेदवारी अर्ज दाखल करण्यावेळी मोदी करणार शक्तीप्रदर्शन - Lok Sabha Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.