ETV Bharat / state

"नराधमांना पाठीशी घालणारं सरकार...", भर पावसात उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल - MVA Protest In Maharashtra

Uddhav Thackeray On Maharashtra Bandh : महाराष्ट्रात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचा निषेध करण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या वतीनं महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांनीही मुंबईत भरपावसात आंदोलन केलं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार निशाणा साधला.

MVA Protest In Maharashtra
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 24, 2024, 4:12 PM IST

मुंबई Uddhav Thackeray On Maharashtra Bandh : बदलापूर येथील शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या वतीनं राज्यभर काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात येत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनासमोर काळ्या फिती बांधून आणि झेंडा हातात घेऊन आंदोलन करण्यात केलं. मुसळधार पावसातही शिवसैनिकांनी या आंदोलनात मोठी गर्दी केली होती. तसंच या आंदोलनात उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई, खासदार संजय राऊत, आमदार मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.

सरकार आरोपींच्या कृत्यावर पांघरूण घालतय : यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार निशाणा साधला. ते म्हणाले, "हे सरकार निर्लज्ज आणि भ्रष्ट आहे. आरोपींना कठोर शिक्षा होणं गरजेचं आहे, मात्र हे सरकार आरोपींच्या कृत्यावर पांघरूण घालण्याचं काम करत आहे. सरकारनं आरोपींच्या विरोधात भूमिका घ्यायला हवी होती. आज कडकडीत बंद असणार होता, पण या बंदला तोंड देण्याची ताकद सरकारमध्ये नाही. त्यामुळे त्यांनी आपले चेलेचपाटे कोर्टात पाठवून अडथळे निर्माण केले आणि न्यायालयानेही बंदला रोखण्याचं काम केलं," असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारसोबत उच्च न्यायालयावरही टीका केली.

बंदच्या आड येणारेही तेवढेच विकृत : राज्यातील प्रत्येक घरात अत्याचार आणि मिंधे सरकारच्या विरोधात संतापाची मशाल धगधगत आहे. दोन-चार दिवसांपूर्वी भारत बंद काही राज्यात पुकारला. त्यावेळी रेल्वे बंद झाल्या होत्या. तेव्हा हे याचिकाकर्ते कुठे गेले होते? बंदला विरोध करणारे याचिकाकर्तेही तितकेच विकृत आहेत. सरकार यात राजकारण आणतय. पण हे आंदोलन थांबता कामा नये. इतकं निर्लज्ज सरकार महाराष्ट्रानं कधीच पाहिलं नव्हतं, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

काही लोक सरकारची 'सदा आवडती' : "काही लोकांना चांगल्या गोष्टी सहन होत नाहीत. प्रत्येक गोष्टीमध्ये आड येतात. मराठा आरक्षण असो, एसटीचा प्रश्न असो किंवा आजचा हा बंद प्रत्येक गोष्टीत आडकाठी आणत आहेत. काही लोक सरकारची "सदा आवडती" झाली आहेत, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. "आज तुम्हाला महाराष्ट्रातील महिला जाब विचारत आहेत, का आमच्या सुरक्षेच्या आड येताय? बंद होऊ नये, म्हणून तुम्ही कोर्टात का गेला? पण हे आंदोलन थांबता कामा नये. माझं महाराष्ट्रातील जनतेला, माता-भगिनींना आवाहन आहे की, या घटनेविरोधात बस डेपो, रिक्षा स्टँड, चौकात आणि सार्वजनिक ठिकाणी एक 'स्वाक्षरी मोहीम' राबवा आणि आंदोलन करा."

सरकारला घालवावेच लागेल : "विकृत सरकारनं लाडकी बहीण योजना आणली, पण लाडकी बहीण सुरक्षित आहे का? या राज्यानं एवढं निर्लज्ज सरकार कधी पाहिलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. परंतु या महाराष्ट्रात विकृत सरकारमुळे नराधमांना गैरकृत्य करण्याचं धाडस होत आहे. कायद्याचा धाक राहिला नाही. हे सरकार बहिणींची सुरक्षा करण्यात अपयशी ठरलं आहे. या निर्ढावलेल्या आणि निर्लज्ज सरकारला घालवावेच लागेल आणि चांगलं सरकार आणावंच लागेल," असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा

  1. राज्य सरकारविरोधात महाविकास आघाडी आक्रमक; शरद पवार, सुप्रिया सुळेंचं भरपावसात आंदोलन, उद्धव ठाकरेंचं मुंबईत आंदोलन - MVA Protest In Maharashtra
  2. महिला अत्याचाराच्या निषेधार्थ उद्धव ठाकरेंकडून मुंबईत आंदोलन; नागपुरात राज ठाकरेंनी काढली आंदोलनाची हवा - Uddhav Thackeray Protest In Mumbai
  3. आदित्य ठाकरेंच्या विरोधातही देणार उमेदवार; अत्याचार अगोदरही होते, निवडणूक आल्यानं विरोधक सरकारला बदनाम करताय का ?, राज ठाकरेंचा हल्लाबोल - Raj Thackeray Slams MVA Leaders
  4. चौथीतील 3 विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार: जिल्हा परिषदेच्या शिक्षकाचा प्रताप, पोलिसांनी ठोकल्या बेड्या - ZP School Teacher Abused Girls

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.