ETV Bharat / state

साताऱ्यात उदयनराजेंच्या मिरवणुकीत चोरट्यांनी लांबवले 20 तोळ्याचे दागिने - Theft in Udayanraje Bhosale procession

Theft in Udayanraje Bhosale procession : साताऱ्यात चोरीच्या दोन घटना समोर आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर काढण्यात आलेल्या उदयनराजेंच्या मिरवणुकीत आणि मराठी अभिनेत्री श्वेता शिंदेंच्या घरातून 20 तोळ्यांचे दागिने लांबवले आहेत.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 6, 2024, 11:01 PM IST

Theft in Udayanraje Bhosale procession
उदयनराजे भोसले यांच्या मिरणुकीत चोरी (Reporter ETV BHARAT MH Desk)

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्या मिरवणुकीत चोरट्यांनी हात की सफाई करत कार्यकर्त्यांचे 10 तोळ्याचे दगिने लंपास केले. तसंच अभिनेत्री श्वेता शिंदेंचे पिरवाडीतील बंद घर फोडून कपाटातील 10 तोळ्यांचे दागिने लांबवले आहेत. या घटनांची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली आहे. दरम्यान, श्वेता शिंदे यांनी गुरूवारी पोलीस अधीक्षकांची भेट घेवून त्यांना घरफोडीची माहिती दिली.

कार्यकर्त्यांना मिरवणूक पडली महागात : सातारा लोकसभा मतदार संघातून विजयी झाल्यानंतर उदयनराजेंची साताऱ्यात भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीतील गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी हात सफाई करत उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांचे 10 तोळ्याचे दागिने लंपास केले. मिरवणुकीत सहभागी झालेल्या अमर संजय जाधव (रा. कोडोली, सातारा) यांची साडे तीन तोळ्याची चेन आणि नरेश सिताराम अग्रवाल (रा. कराड) यांची साडे चार तोळ्याची चेन चोरट्यांनी लांबवली. त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.

अभिनेत्री श्वेता शिंदेंचं बंद घर चोरट्यांनी फोडलं : अभिनेत्री श्वेता शिंदे यांचे सातारा शहरातील पिरवाडी भागात असलेले बंद घर फोडून चोरट्यांनी 10 तोळ्याचे दागिने लंपास केले. श्वेता शिंदे या आपल्या आई सोबत राहतात. चित्रपट, मालिकेच्या शुटिंगकरिता त्या मुंबईला गेल्या असताना बंद घर फोडून चोरट्यांनी ही चोरी केली. घरातील कपाटाचे ड्रॉव्हर जाळून त्यातील दहा तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. गुरूवारी त्यांनी पोलीस अधीक्षकांना भेटून घरफोडीची माहिती दिली.

हे वाचलंत का :

  1. राष्ट्रवादीचे सर्व आमदार आमच्यासोबत, अजित पवारांचा दावा; म्हणाले, पराभवाची जबाबदारी... - Ajit Pawar on Lok Sabha Results
  2. चलो बुलावा आया है! लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर राणा दांपत्याला दिल्लीत बोलावणं, केंद्रात मंत्रिपद मिळणार? - Navneet Rana Ravi Rana Delhi Visit
  3. भाजपा आमदाराचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप; म्हणाले... - Pravin Pote

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.