नांदेड UBT Leader Beaten In Nanded : सोशल माध्यमांवर केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे जमावानं उबाठा गटाच्या उपतालुका प्रमुखाचं अपहरण करुन जमावानं बोटं छाटल्यानं मोठी खळबळ उडाली. संतोष वडवळे असं अपहरण करुन बोट छाटण्यात आलेल्या उपतालुका प्रमुखाचं नाव आहे. ही लोहा तालुक्यातील नांदेड उस्माननगर रस्त्यावरील एका फार्म हाऊसमध्ये मंगळवारी रात्री घडली. मारहाण करुन संतोष वडवळे यांना एका रुग्णालयात आणून टाकल्याचा दावा त्यांच्या नातेवाईकांनी केला. सध्या संतोष वडवळे यांच्यावर नांदेड इथल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात 8 ते 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपा नेत्यांविरोधात सोशल माध्यमात आक्षेपार्ह पोस्ट : उबाठा गटाचे लोहा उपतालुका प्रमुख संतोष वडवळे यांनी त्यांच्या सोशल माध्यमावर भाजपा नेत्यांविरोधात एक आक्षेपार्ह पोस्ट शेयर केली. त्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केल्याचा दावा संतोष वडवळे यांनी केला. संतोष वडवळे यांनी भाजपाचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे नाव न घेता ही पोस्ट सोशल माध्यमात केल्याची चर्चा आहे. मात्र यामुळे कार्यकर्त्यांनी ही मारहाण केल्याचा दावा संतोष वडवळे यांच्या नातेवाईक करत आहेत.
डोक्यावर दारूची बॉटल ठेवून नाचवलं, नातेवाईकांचा आरोप : उबाठा गटाचे लोहा उपतालुका प्रमुख संतोष वडवळे यांनी काही आक्षेपार्ह पोस्ट सोशल माध्यमावर शेयर केल्या होत्या. या पोस्टमुळे अज्ञात कार्यकर्त्यांनी तुप्पा इथून मंगळवारी रात्री संतोष वडवळे यांचं अपहरण केलं. एका फार्महाऊसवर नेऊन त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या मारहाणीत त्यांचं एक बोट छाटल्या गेलं. दारूची बॉटल डोक्यावर ठेऊन संतोष वडवळे यांना नाचायला लावलं, असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला. संतोष वडवळे यांनी केलेल्या पोस्ट बद्दल माफी मागायला लावली. मारहाण केल्यानंतर एका रुग्णालयात टाकून देऊन आरोपी पसार झाले, असा आरोप जखमीची आई आणि भावानं केला.
हेही वाचा :