ETV Bharat / state

उद्धव ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, आदित्य ठाकरेंनी प्रकृतीबाबत सांगितली 'ही' माहिती - UDDHAV THACKERAY DISCHARGED

उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना मंगळवारी रात्री सुटी देण्यात आली. उद्धव ठाकरे यांची प्रकृती आता ठीक आहे.

Uddhav Thackeray Discharged
उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 16, 2024, 9:48 AM IST

मुंबई : उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना सोमवारी नियमित चेकअपसाठी मुंबईतील एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान, उद्धव ठाकरे यांची सर्व वैद्यकीय चाचणी तपासणी व्यवस्थित पार पडल्यानंतर मंगळवारी रात्री उद्धव ठाकरेंना एच एन रिलायन्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीबाबत सोशल माध्यमातून माहिती दिली आहे.

Uddhav Thackeray Discharged
उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे (Reporter)

उद्धव ठाकरेंवर झाली होती अँजिओप्लास्टी : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर 12 नोव्हेंबर 2021 रोजी एच एन रिलायन्स रुग्णालयात मानेच्या दुखण्यावरील उपचारासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. उद्धव ठाकरे यांच्यावर सर्वाइकल स्पाईनबाबत शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान, आता नियमित चेकअपसाठी त्यांना सोमवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. धमन्यामधील ब्लॉकेज तपासण्यासाठी त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. तसेच हार्ट ब्लॉकेजशी संबंधित आणि हृदयाशी संबंधित इतर अन्य वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या, असं रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं आहे. परंतु आता उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठीक असून, मंगळवारी रात्री त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कामावर परतण्यासाठी सज्ज : उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीबाबत आमदार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, "सोमवारी सकाळी उद्धव ठाकरे यांना रुग्णालयात रेगुलर तपासणीसाठी आणि काही वैद्यकीय चाचण्यासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांमुळे ते आता ठीक आहेत... आणि ते कामावर परतण्यासाठी आणि लोकांची सेवा करण्यास पूर्णपणे सज्ज आहेत," असं आदित्य ठाकरेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांना रुग्णालयातून सुटी मिळाली असली, तरी त्यांना आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. उद्धव ठाकरे रिलायन्स रुग्णालयात दाखल, आदित्य ठाकरेंनी तब्येतीबाबत दिली मोठी अपडेट
  2. "दिघे असते तर शिंदेला गोळी घातली असती"; उद्धव ठाकरेंचा नेमका कोणावर निशाणा?
  3. "उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेर पडले नाहीत, एकनाथ शिंदे म्हणजे 'पुष्पा' "; राज ठाकरेंनी डिवचलं

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.