ETV Bharat / state

पोहण्याचा मोह जिवावर बेतला; तलावात बुडून दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू - TWO SCHOOL STUDENTS DROWNED

तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना मोहगाव झिलपी तलावात घडली.

TWO SCHOOL STUDENTS DROWNED
तलावात बुडून मृत्यू (Source - ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 14, 2024, 4:57 PM IST

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात असलेल्या मोहगाव झिलपी तलावात दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नागपूर शहरातील दिघोरी आणि खरबी परिसरातील 13 ते 15 वर्षे वयोगटातील नऊ मुलं झिलपी तलावाच्या परिसरात फिरायला आले होते. हे सर्व वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थी असून एकाच परिसरात राहत असल्यानं त्यांची ओळख होती. विरसेन विठोबा गजभिये व गौरव लीलाधर बुरडे (वय 15 वर्षे) या दोघांचा बुडून मृत्यू झालाय.

मित्रांनी रोखण्याचा प्रयत्न केला : चौदा ते पंधरा वर्षे वयोगटातील मित्र मोहंगाव झिलपी तलावाकडे फिरायला गेले होते. विरसेन व गौरवची पोहण्याची इच्छा झाल्यानं तलावात उतरले. इतर 5 जणांनी तलावात जाण्यापासू त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी कुणाचं ऐकलं नाही. त्यामुळं इतर सर्व तलावाच्या काठावर असलेल्या एका झाडाखाली गप्पा मारत बसले होते. पाण्यात काही दूर गेल्यावर हे दोघेही दिसेनासे झाले. काही वेळानंतर ते दिसेनासे झाले त्यामुळं मित्रांनी आरडाओरडा सुरू केला असता त्या दोघांचा बुडून मृत्यू झाल्याचं निष्पनं झालं.

चार तासांनी मिळाले मृतदेह : विरसेन व गौरव दिसेनासे झाले त्यामुळं मित्रांनी आरडाओरडा केल्यानंतर या परिसरात असलेल्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी ही घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती सरपंच प्रमोद डाखळे यांनी हिंगणा पोलिसांना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे यांनी सुद्धा घटनास्थळी धाव घेतली. गावातील तरुणांच्या मदतीनं दोघांचाही मृतदेहाचा शोध घेतला.

हेही वाचा

  1. उद्धव ठाकरे रिलायन्स रुग्णालयात दाखल, आदित्य ठाकरेंनी तब्येतीबाबत दिली मोठी अपडेट
  2. सातपुड्याच्या टोकावर शक्कर तलावात नौका विहार; चिखलदऱ्याच्या थंड हवेत पर्यटनाचा आनंद
  3. नवी मुंबईतील एनआरआय कॉम्प्लेक्समधील इमारतीला भीषण आग

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.