ETV Bharat / state

अपघाताचा बनाव करून मालवाहू वाहनातील दोघांना लुटले - Amravati Robbed Case

Amravati News: अमरावती येथे रस्त्यात अपघात झालाचा बनाव करून चार लुटारुंनी एका मालवाहू वाहनातील दोघांना लुटल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Amravati  News
दोघांना लुटले (संग्रहित छायाचित्र)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 8, 2024, 10:54 PM IST

अमरावती Amravati Robbed Case : रस्त्यात अपघात झालाचा बनाव करून चार लुटारुंनी एका मालवाहू वाहनातील दोघांना लुटल्याचा प्रकार जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या देवगाव ते उसळगव्हाण मार्गावर घडली. या घटनेत लुटारूंनी मालवाहू वाहनातील दोघांकडून 20 हजार 300 रुपयांचा ऐवज हिसकावून नेला. या प्रकरणात आलेल्या तक्रारीवरून तळेगाव दशासर पोलीस ठाण्यात अज्ञात चौघांविरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

अशी आहे घटना : अकोला येथील ओमप्रकाश गणेश राऊत यांच्यासह मोझरी येथील रहिवासी आशिष आडे हे दोघे अकोला येथून मालवाहू वाहन घेऊन यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडच्या दिशेने निघाले होते. देवगावकडून पुलगावकडं जात असताना उसळगव्हाण येथील कॅनलजवळ त्यांना एक दुचाकी मार्गात पडलेली दिसली. त्या दुचाकीच्या बाजूला दोघेजण पडून असल्याचं त्यांना दिसताच त्यांनी आपलं वाहन थांबवलं आणि ते खाली उतरले. नेमकं काय झालं हे पहात असतानाच ओम राऊत यास मागून पाठीवर एका लुटारूने लाथ मारली. तर जमिनीवर पडलेले दोघे उठून ओम राऊत आणि आशिष आडे यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. या दोघांच्याही डोक्यावर आणि पाठीवर काठीने मारहाण करण्यात आली. लुटारुंनी या दोघांकडून दोन मोबाईल फोन आणि त्यांच्याकडे असणारी रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून पळ काढला.

पोलीस घेत आहेत लुटारूंचा शोध : दरम्यान या प्रकरणात ओम राऊत आणि आशिष आडे यांनी तळेगाव दशासर पोलीस ठाणे गाठून झाल्या प्रकाराची तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेत लुटारूंचा शोध सुरू केला.

हेही वाचा -

  1. मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलेची चोरली साखळी, विरोध करणाऱ्या माणसावर चोरट्याकडून गोळीबार - cctv video of chain snatcher
  2. काय सांगता ! सीबीआयच्या डीएसपीचे २ लाख रुपये सायबर गुन्हेगारांनी लुटले, फसवणुकीची तऱ्हा 'कशी' ठरली निराळी - cyber fraud
  3. तोतया पोलीस पथकाचा कुरियर व्हॅनवर दरोडा; ५ कोटी ४० लाख लुटले, चौघांना अटक - Robber absconded

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.