ETV Bharat / state

मान्सून ट्रीप बेतली जीवावर; माळशेज घाटात बसची दुचाकीला भीषण धडक, तरुण-तरुणी ठार - Malshej Ghat Accident

Malshej Ghat Accident : माळशेज घाटात गुरुवारी दुपारी एसटी बसनं दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन जण ठार झाले. कल्याण-नगर महामार्गावरील वैशाखरे गावाजवळ नाणेघाट रस्त्यावर हा अपघात झाला. रोहित डिंगणकर (23) तसंच नंदिनी मायांगडे (24) अशी मृतांची नावं आहेत, दोघेही मुंबईतील सांताक्रूझमधील रहिवासी आहेत.

Malshej Ghat Accident
माळशेज घाट अपघात (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 21, 2024, 5:30 PM IST

ठाणे Malshej Ghat Accident : माळशेज घाटात पावसाळी सहलीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या सांताक्रूझमधील तरुण-तरुणीचा अपघातात मृत्यू झाला आहे. दुचाकीवरून घरी निघालेल्या दोघांना भरधाव बसनं धडक दिल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी टोकावडे पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित रमेश डिंगणकर (वय 24 वर्षे) तसंच नंदिनी मयांगडे (वय 23 वर्षे), अशी मृतांची नावं आहेत. तर संजय पवार असं, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एस. टी. बस चालकाचं नाव आहे.

नाणेघाट जवळ झाली धडक : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक रोहित रमेश डिंगणकर तसंच नंदिनी मयांगडे दोघेही मुंबईतील सांताक्रूझ-वाकोला भागात राहतात. ते गुरुवारी (20 जून रोजी) माळशेज घाटात दुचाकी क्रमांक (एमएच 02 एफपी 7446) वरून पावसाळी सहलीसाठी आले होते. दुपारपर्यंत सहलीचा आनंद घेतल्यावर दोघेही त्याच दुचाकीवरून घराच्या दिशेनं निघाले होते. त्यावेळी नाणेघाट जवळ त्यांच्या दुचाकीची एसटी-बसला समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच टोकावडे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, दोघांचे मृतदेह मुरबाड शहरातील शासकीय उप-जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

बस चालकाची चौकशी सुरू : "बस कल्याणहून नगरकडं जात होती. कल्याण-माळशेज घाट रस्त्यावर कमी रहदारीमुळं वाहनं भरधाव वेगानं चालवली जातात. मात्र, हा रस्ता अरुंद, वळणदार असल्यानं वाहनचालकांना येणारे वाहन लवकर दिसत नाही. त्यामुळं येथे अपघातांचं प्रमाण अधिक आहे. या प्रकरणात बस चालक संजय पवार तसंच वाहक उषा मुंडलिक यांची चौकशी सुरू आहे", असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनकर चकोर यांनी सांगितलं. दुसरीकडं गेल्याच आठवड्यात माळशेज घाटातील दरड कोसळ्यानं रिक्षामधील 5 प्रवाश्यांपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे.

'हे' वाचलंत का :

  1. माळशेज घाटात टेम्पो आणि दुधाच्या टँकरची समोरासमोर धडक; तिघांचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी - Malshej Ghat Accident
  2. Waterfall In Malshej Ghat : माळशेज घाटातील धबधब्यावर हुल्लडबाज पर्यटकांना रोखण्यासाठी ग्रामीण पोलीस सज्ज
  3. Bus Truck Accident : माळशेज घाटात भरधाव बस व ट्रकची समोरासमोर धडक; 15 प्रवासी गंभीर जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.